यासोबत त्याने एक नोटही लिहिली आहे. त्याने लिहिले आहे की, "तुम्ही सर्वांनी दिलेल्या प्रेम आणि आशीर्वादासाठी मी तुमचा आभारी आहे. माझ्यासाठी हे खूप महत्त्वाचे आहे की, दुखापतीतून बाहेर आल्यानंतर मी त्याच फॉर्ममध्ये परत यावे. लोकांना अपेक्षा आहे की मी मैदानावर परत आल्यावर त्याच पद्धतीने खेळेल आणि मी पण तेच करू इच्छितो. मी पुनरागमनावर लक्ष केंद्रित केले आहे. मी प्रत्येक गोष्ट एका वेळी एक एक पाऊल टाकून पुढे जात आहे. माझ्यासाठी सर्वात मोठे आव्हान म्हणजे मानसिकदृष्ट्या मजबूत राहणे. जर तुम्ही शारीरिकदृष्ट्या फिट असाल, तर मानसिकदृष्ट्या फिट मजबूत राहणे. जर तुम्ही शारीरिकदृष्ट्या फिट असाल, तर मानसिकदृष्ट्या फिट राहणे सोपे होते. फ्रॅक्चर ठीक झाल्यावर मी परत येईन. माझी रिकव्हरी हळू होत आहे, मी विश्रांती घेत आहे, दिनचर्या पाळत आहे आणि माझे १००% देत आहे. देशासाठी खेळताना मला अभिमान वाटतो आणि मला आवडणाऱ्या खेळात परत येण्याची मी आतुरतेने वाट पाहत आहे."
कशी झाली होती ऋषभ पंतला दुखापत?
इंग्लंडविरुद्धच्या चौथ्या कसोटी सामन्यात फलंदाजी करताना, ख्रिस वोक्सचा एक चेंडू स्वीप शॉट मारण्याच्या प्रयत्नात ऋषभ पंतच्या पायाच्या बोटाला लागला. यानंतर तो ३७ धावांवर रिटायर्ड हर्ट झाला. दुखापत असूनही, जेव्हा संघाला त्याची गरज होती, तेव्हा तो पुन्हा मैदानात परतला. त्याने अर्धशतक पूर्ण केले आणि भारताला पहिल्या डावात ३५० च्या पुढे धावसंख्या नेण्यात मदत केली. त्याच्या या खेळीचे क्रिकेट तज्ज्ञांनी खूप कौतुक केले.