नवी दिल्ली: लोकसभेत ऑपरेशन सिंदूरवर बहुचर्चित चर्चा आज दुपारी १२ वाजल्यापासून सुरू होणार आहे. ही चर्चा गरजेची कागदपत्रे संसदेच्या पटलावर ठेवल्यानंतर सुरू होईल. या १६ तासांच्या चर्चेची सुरूवात खुद्द संरक्षण मंत्री राजनाथ सिंह करतील. या चर्चेदरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदीही हस्तक्षेप करतील आणि आपली बाजू मांडतील असे सांगितले जात आहे.
आक्रमक भूमिकेसह चर्चेमध्ये उतरणार सरकार
सरकार या चर्चेमध्ये आक्रमक भूमिका मांडणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी या चर्चेआधी सीडीएस जनरल अनिल चौहान, संरक्षण सचिव राजेश कुमार सिंह आणि तीनही दलांच्या प्रमुखांसह अनेक बैठका घेतल्या.
या बैठकांमध्ये सरकारची रणनीतीला अंतिम स्वरूप देण्यात आले. तर ऑपरेशन सिंदूरबाबत विरोधी पक्षगट इंडिया देखील सक्रिय झाले आहे. चर्चेआधी त्यांचीही एक बैठक होत आहे. यातही रणनीतीवर चर्चा होईल.
ऑपरेशन सिंदूरवर सरकारकडून उत्तर मागतायत विरोधी पक्ष
ऑपरेशन सिंदूरची सुरूवात जम्मू-काश्मीरल पहलगाम येथे दहशतवाद्यांनी पर्यटकांवर केलेल्या हल्ल्यानंतर झाली. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी या ऑपरेशनला विजय उत्सव असे म्हटले आहेत. सरकारी रिपोर्ट्सनुसार, ऑपरेशन सिंदूर केवळ २२ मिनिटांत पूर्ण झाले आणि यात सर्व दहशतवाद्यांना ठार करण्यात आले. हे १०० टक्के यशस्वी सैन्य अभियान सांगितले जात आहे. दरम्यान, विरोधी पक्षाने या ऑपरेशनबाबत सरकारला उत्तर मागितले आहे.