नगरमध्ये संविधान भवनासाठी १५ कोटी - उपमुख्यमंत्री पवार

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण


अ.नगर : नगरमध्येही संविधान भवनासाठी १५ कोटी रुपयांचा निधी दिला जाईल. देशाची अखंडता डॉ. आंबेडकर यांच्यामुळे टिकून आहे. त्यांचा समता, बंधुत्वाचा विचार आपणा सर्वांना पुढे घेऊन जायचा आहे, त्यातच सर्वांचे हित आहे, असे प्रतिपादन राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले. डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्मारक उभारत आहे.


नगरमध्येही संविधान भवनासाठी १५ कोटी रुपयांचा निधी दिला जाईल. देशाची अखंडता डॉ. आंबेडकर यांच्यामुळे टिकून आहे. त्यांचा समता, बंधुत्वाचा विचार आपणा सर्वांना पुढे घेऊन जायचा आहे, त्यातच सर्वांचे हित आहे, असे प्रतिपादन राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार नगरमध्येही संविधान भवनासाठी १५ कोटी रुपयांचा निधी दिला जाईल. असे प्रतिपादन राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले.नगर शहरातील मार्केट यार्ड चौक परिसरात महापालिकेच्या माध्यमातून साकारलेल्या भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचा लोकार्पण सोहळा राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते संपन्न झाला. यावेळी पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, आ.संग्राम जगताप, आ.काशिनाथ दाते, माजी खा. डॉ सुजय विखे पाटील, माजी आ.लहू कानडे, जिल्हाधिकारी डॉ पंकज आशिया, मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी,पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे, आयुक्त यशवंत डांगे,माजी उपमहापौर गणेश भोसले,राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष संपत बारस्कर, प्रा.जोगेंद्र कवाडे, भन्ते राहुल बोधी मा.आयुक्त डॉ पंकज जावळे, कृती समितीचे अध्यक्ष सुरेश बनसोडे,अशोक गायकवाड,अजय साळवे,मयूर बांगरे, सुमेध गायकवाड, जल अभियंता परिमल निकम,भाजपचे युवा नेते अक्षय कर्डिले, धनंजय जाधव, मनेष साठे, निखिल वारे, सुनील त्रिंबके, आदींसह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, देशाला एकता, समता आणि बंधुतेच्या नात्याने बांधण्याची ताकद डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांमध्ये आहे. शिक्षण, समता व बंधुता ही बाबासाहेबांची त्रिसूत्री आपल्या मनात कायम जागी ठेवणारे हे स्मारक प्रेरणा देणारे ठरेल देशाचे संविधान बदलले जाईल अशा अफवा पसरवल्या जात आहे, मात्र जोपर्यंत या पृथ्वीवर चंद्रसूर्य अस्तित्वात आहेत तोपर्यंत भारताचे संविधान कधीही बदलले जाणार नाही,असे ते म्हणाले.सुरेश बनसोडे म्हणाले की, भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णाकृती पुतळा शहरात उभारावा यासाठी समाजाने मोठा लढा उभा केला.आंदोलने,पत्र व्यवहार केले आ.संग्राम जगताप यांच्या पाठपुराव्या मुळेच भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा भव्य असा पूर्णाकृती पुतळा उभा राहिला असल्याचे त्यांनी सांगितले. या पुतळ्याच्या माध्यमातून इतिहास लिहिला जात आहे. पूर्वीच्या पुतळ्याला ६० वर्षे झाली होती, त्यामुळे नवीन जागेत स्मारक करण्याचा विचार होता. मात्र, समितीला हिच जागा हवी असल्याने संघर्ष करावा लागला. आता संसदेतील पुतळ्याच्या पाश्र्वभूमीवर येथील पुतळ्याची उभारणी केली आहे. अनावरणाची तारीख ठरली होती. परंतु आमच्या घरात दुःखद घटना घडल्याने ती आंबेडकर प्रेमींनी स्वतःहून पुढे ढकली. आमच्या दुःखात सहभाही झाल्याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो.


संविधान भवनासाठी त्यांनी १५ कोटींची मागणी केली. दादांनी ती दहाच मिनिटांत मंजूर केली.शहरात महापालिकेच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या विकास कामाचे सादरीकरण आयुक्त यशवंत डांगे यांनी प्रास्ताविकात केले. यावेळी अशोक गायकवाड, अजय साळवे, नाथाभाऊ आल्हाट, सुमेध गायकवाड, जल अभियंता परिमल निकम, भन्ते राहुल बोधी यांची मनोगते झाली.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उद्धव काळापाड यांनी केले तर आभार प्रदर्शन उपायुक्त विजयकुमार मुंडे यांनी मानले.


आ.जगताप यांच्यामुळे हा पुतळा उभा राहिला आहे. त्यांचे वडील अरुणकाका यांचा समाजसेवेचा वारसा ते पुढे नेत आहेत. मात्र, ते भाषण करताना कधी कधी घसरतात. त्यामुळे त्यांना आम्हाला समजावून सांगावे लागते, अशी मिश्किल टिपण्णी अजितदादांनी आपल्या भाषणात केली. त्यावर एकच हशा पिकला. दरम्यान, अजितदादा हे भाषणासाठी उभे राहिले, यावेळी व्यासपीठावरील कुलरच्या हवेने त्यांचे केस विस्कटले. त्यामुळे दादांनी अगोदर खिशातून कंगवा काढत केस विंचारल्याने चांगलाच हशा पिकला. त्यावर माझेच केस विंचारतोय, तुमचे नाही, असे म्हणताच पुन्हा हशा पिकला.


अहिल्यानगरमध्ये सर्वांच्या सहकार्याने डॉ. आंबेडकर यांचा पूर्णाकृती पुतळा उभा राहिला आहे. आमदार संग्राम जगताप यांनी एक व्हिजन समोर ठेवून या कामासाठी सर्वांना एकत्र आणले. पूर्णाकृती पुतळ्यामुळे संपूर्ण अहिल्यानगरमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. राज्य सरकर जोमाने काम करत आहे. त्यात अजित दादा यांच्यासारखे चाणाक्ष आणि शिस्तप्रिय मंत्री आहेत. त्यामुळे सरकारचे काम चांगल्या पद्धतीने सुरू असल्याचे यावेळी भन्ते डॉ. राहुल बोधी यांनी सांगितले

Comments
Add Comment

कोल्हापूर ACB मधील DYSP वैष्णवी पाटील यांच्या कारचा अपघात; दोन जणांचा मृत्यू, चित्रदुर्गमध्ये उपचार सुरू

चित्रदुर्ग : कोल्हापूर अँटी करप्शन ब्युरोमध्ये कार्यरत असलेल्या उपअधीक्षक वैष्णवी पाटील यांच्या वाहनाला

Nagpur News: नागपुरात आयकर विभागाची व्यापाऱ्यावंर मोठी कारवाई

नागपूर : महापालिका निवडणुकीची प्रक्रिया पूर्ण होताच नागपूर शहरात आयकर विभागाने मोठी धडक कारवाई करत

कोल्हापुरात प्रसुतीनंतर डिस्चार्ज घेऊन घरी जाताना अपघात, बाळंतीणचा मृत्यू, सात दिवसांचं बाळ जखमी, PI ची तडकाफडकी बदली

कोल्हापूर : गडहिंग्लज-चंदगड राज्यमार्गावर कानडेवाडी येथे झालेल्या भीषण अपघातानंतर नेसरी पोलीस ठाण्यातील

Mumbai - Pune Expressway : अटल सेतुपासुन थेट पुण्यापर्यंत ९० मिनिटात,नक्की मार्ग काय ?

Mumbai - Pune Expressway : मुंबई आणि पुणे या महाराष्ट्रातील दोन प्रमुख शहरांदरम्यान प्रवास करणाऱ्या नागरिकांरीकांना मोठा

कोल्हापूरात काँग्रेसला सर्वाधिक जागा; तरीही सत्ता महायुतीचीच!

मुंबई : महापालिकेची सत्ता मिळवण्यासाठी विविध पक्ष, उमेदवार व कार्यकर्त्यांनी साम-दाम-दंड-भेदाचा पुरेपूर वापर

अजित पवारांच्या हातून पिंपरी चिंचवडही गेले

पुण्यात उबाठाचा केवळ १ नगरसेवक विजयी ‘वंचित’ने खातेच उघडले झाले पुणे : पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या १२८