मुंबई: टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (टीसीएस) ही भारतातील सर्वात मोठी आय-टी सेवा पुरवणारी कंपनी २०२६आर्थिक वर्षात आपल्या एकूण कर्मचाऱ्यांपैकी सुमारे २ टक्के म्हणजेच १२,२०० कर्मचाऱ्यांची कपात करणार आहे. कंपनीने रविवारी सांगितले की ही कपात मुख्यतः मध्यम आणि वरिष्ठ व्यवस्थापनाच्या पातळीवर केली जाईल.
एआय आणि नव्या तंत्रज्ञानाच्या युगात कंपनीने पुनर्रचना सुरू केली असून, कर्मचाऱ्यांचे पुनर्प्रशिक्षण आणि नव्या भूमिकांमध्ये पुनर्नियोजन सुरू आहे. मात्र, काही भूमिका अशा आहेत ज्या पुनर्नियोजित करणे शक्य झाले नाही आणि त्यामुळे ही कठोर निर्णय घेण्यात येत असल्याचे टीसीएसचे सीईओ के. कृतिवासन यांनी स्पष्ट केले.
कृतिवासन म्हणाले, “ही कपात एआय मुळे नाही, तर भविष्यात लागणाऱ्या कौशल्यांच्या आधारे केली जात आहे. ही गरज माणसांची संख्या कमी करण्याची नाही, तर योग्य कौशल्यांच्या तैनातीची आहे.”
टीसीएस ने आश्वासन दिले आहे की, ग्राहक सेवा यावर कोणताही परिणाम होणार नाही. कंपनीने छंटनी झालेल्या कर्मचाऱ्यांसाठी सेव्हरन्स पॅकेज, नोटीस कालावधीचे वेतन, आरोग्य विमा आणि नवीन नोकरीसाठी सहाय्य यासारखी मदत जाहीर केली आहे.
FY25 च्या एप्रिल–जून तिमाहीत टीसीएस ने ६,०७१ नव्या कर्मचाऱ्यांची भरती केली असून, नेट वाढ ५,०९० इतकी झाली आहे. मात्र, आगामी छंटणीमुळे टीसीएस चे धोरण फक्त संख्यात्मक वाढ न करता गुणवत्तापूर्ण आणि भविष्योन्मुख कौशल्यांवर लक्ष केंद्रित करणार असल्याचे स्पष्ट होते.
विश्लेषकांचे म्हणणे आहे की, यंत्रणा आणि ऑटोमेशनमुळे आय-टी क्षेत्रात पारंपरिक भूमिका झपाट्याने नष्ट होत आहेत. विशेषतः ज्येष्ठ कर्मचाऱ्यांना नव्या तंत्रज्ञानाशी जुळवून घेणे आव्हानात्मक ठरत आहे.
टीसीएस च्या या निर्णयामुळे आय-टी उद्योगात भविष्यातील कौशल्यांचा विचार करून बदल करण्याची गरज अधोरेखित झाली आहे.