"महाराष्ट्रात ड्रग्स येतात कुठून हे स्वत:च्याच नवऱ्याला विचारा" रोहिणी खडसेंवर चित्रा वाघ यांचा हल्लाबोल

  132

तुमच्या तर दिव्याखालीचं अंधार होऽऽऽ सुप्रिया सुळेंना देखील केले लक्ष्य, जावयाच्या अटकेवर एकनाथ खंडसे यांची प्रतिक्रिया 


Chitra Wagh on Pune Rave Party: रविवारी पहाटे गुप्त माहितीच्या आधारे गुन्हे शाखेने पुण्यातील एका उच्चभ्रू परिसरातील स्टुडिओ अपार्टमेंटवर छापा टाकला. यादरम्यान पोलिसांनी तेथून अंमली पदार्थ, दारू आणि हुक्का बनवण्याचे साहित्य जप्त केले. याप्रकरणी पोलिसांनी पाच पुरुष आणि दोन महिलांना अटक केली आहे. ज्यामध्ये शरद पवार गटाच्या महिला प्रदेशाध्यक्ष रोहिणी खडसे (Rohini Khadse) यांचे पती प्रांजल खेवलकरचा देखील समावेश होता. एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांच्या जावयाचा अशाप्रकारे रेव्ह पार्टीमध्ये सहभाग असणे आणि त्यांच्या अटकेने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली होती.

एकनाथ खडसे आणि रोहिणी खडसे यांच्या राजकीय अस्तित्वासाठी हा एक मोठा धक्काच म्हणावा लागेल. कारण, गेल्या काही दिवसांपासून हे दोघंही सातत्याने महायुतीच्या नेत्यांवर तुटून पडत होते. एकनाथ खडसे यांनी भाजपचे सामर्थ्यशाली नेते गिरीश महाजन यांना लक्ष्य केले होते. तर रोहिणी खडसे या विविध मुद्द्यांवरुन महायुतीवर टिकेचे तोफ डागत होत्या. मात्र, आता रोहिणी खडसे यांचे पती प्रांजल खेवलकर यांना ड्रग्ज पार्टी प्रकरणात अटक होताच खडसे यांची चांगलीच कोंडी झाली आहे. या घटनेमुळे रोहिणी खडसे यांच्या राजीनाम्याची मागणी खडसे विरोधकांकडून केली जात आहे. ज्यात भाजप नेत्या चित्रा वाघ यांनीही रोहिणी खडसे यांच्यावर हल्लाबोल केला आहे. चित्रा वाघ यांनी एक ट्विट करत रोहिणी खडसेंचा समाचार घेतला आहे, सोबत सुप्रिया सुळे यांना देखील लक्ष्य केले आहे. यांच्या दिव्याखालीच अंधार असल्याचे चित्रा वाघ यांनी पोस्ट मध्ये लिहिले.

चित्रा वाघ यांनी ट्विटमध्ये नेमकं काय म्हटलं?





ओऽऽऽऽऽ१२मतीच्या मोठ्ठया ताई…
@supriya_sule

तुमच्या तर दिव्याखालीचं अंधार होऽऽऽ

तुमच्या वाजंत्रीताई
महाराष्ट्रात ड्रग्स येतात कुठून हा प्रश्न सरकारला विचारतात
त्याआधी त्यांनी स्वत:च्या नवऱ्याला प्रांजल खेवलकरना हा प्रश्न विचारायला हवा…

महाराष्ट्रातल्या प्रत्येक घटनेत सरकारला जबाबदार धरणाऱ्या आमच्या नावाने कायम तुतारी वाजवणाऱ्या वाजंत्री ताईंनी आधी स्वत:च्या घराकडे लक्ष द्यावे…
आणि हो…..तुमचा नवरा लहान नाही की त्याला कोणी उचलून आणून रेव्हपार्टीत बसवेल नाही तर यात ही पुन्हा सरकारलाच जबाबदार धराल…

राज्यात जेव्हापासून देवाभाऊंचे भाजपा-महायुतीचे सरकार आलयं तेव्हापासून ड्रग्सची प्रकरणे बाहेर येत आहेत. आधी ती बेमालूमपणे का लपवली जायची कोण लपवायचे याचे गूढ इथेच कुठेतरी दडलं आहे असं की काय असा प्रश्न महाराष्ट्राला पडतोय आणि गुन्हे उघड झाल्यावर वाजंत्रीताई चोराच्या उलट्या बोंबा मारायला पुढे येतात हेही गुपित उघड झालं….

ड्रग्जविरोधी मोहीम आणखी तीव्र करण्याची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मागणी


चित्रा वाघ यांनी आणखीन एक ट्विट करत व्हिडिओच्या माध्यमातून रोहिणी खडसे, संजय राऊत तसेच महायुती सरकारला विरोध करणाऱ्या सर्वांचा चांगलाच समाचार घेतला आहे. तसेच ड्रगविरोधी मोहीम आणखी तीव्र करण्याची मागणी त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.


मंत्री एकनाथ खडसे यांची प्रतिक्रिया


प्रसारमाध्यमांनी रोहिणी खडसे यांच्याशी या संदर्भात संपर्क साधला असता त्यांनी या विषयावर भाष्य करण्यास नकार दिला. तरी राष्ट्रवादी काँग्रेसचे (सप) ज्येष्ठ नेते आणि महाराष्ट्राचे माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी त्यांच्या जावई प्रांजल खेवलकर यांच्या अटकेवर प्रतिक्रिया देताना, वृत्तसंस्था पीटीआयने संपर्क साधला असता पोलिस कारवाईमागील हेतूवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. पोलिसांच्या कारवाईमागे राजकीय हेतू होता का याची चौकशी झाली पाहिजे, असे एकनाथ खडसे म्हणाले.
Comments
Add Comment

छत्रपती संभाजीनगरला २४x७ शाश्वत पाणीपुरवठ्याचा मार्ग मोकळा; २६ द.ल.ली. जलशुद्धीकरण केंद्राचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन

छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगर शहर पाणीपुरवठा योजनेच्या माध्यमातून पुढील २५-३० वर्षे शहराच्या अपेक्षित

मराठा आरक्षणासाठी समितीचे नवीन अध्यक्ष!

मुंबई: भाजपच्या नेतृत्वाखालील 'महायुती' सरकारने जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची मराठा समाजाच्या

दहावीच्या विद्यार्थिनीवर स्कूल बसचालकाकडून लैंगिक अत्याचार

जळगाव : दहावीतील विद्यार्थिनीवर स्कूल बसचालकानेच शेतात नेऊन लैंगिक अत्याचार केल्याची घडली. जळगावच्या पाचोरा

निफाडमध्ये चक्क कुत्र्यानेच बिबट्याला नेले फरपटत

निफाड : संपूर्ण तालुक्यात बिबट्याची दहशत असल्याचे नागरिकांना पशुधन सांभाळण्यासाठी जागता पहारा द्यावा लागत आहे.

वसईत विद्यार्थ्याच्या अंगावर खांब कोसळला; सुदैवाने जीव वाचला, घटना सीसीटीव्हीत कैद

वसई शहरातील निष्काळजीपणाचा एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. वसईमध्ये एका शाळकरी विद्यार्थ्याच्या अंगावर जुना

Hinjawadi Accident : बेदरकार मिक्सरने घेतला निष्पाप जीव! हिंजवडीत ११ वर्षीय मुलीचा मृत्यू; चालकासह मालकावरही दाखल केला सदोष मनुष्यवधाचा गुन्हा

पुणे : पुण्यातील हिंजवडी परिसरात अवजड वाहनांमुळे होणाऱ्या अपघातांची वाढती संख्या पाहता हिंजवडी पोलिसांनी आता