पुणे : पुण्यातील खराडी भागात रेव्ह पार्टी सुरू असल्याची माहिती मिळताच पोलिसांनी धाड टाकली. या रेव्ह पार्टीतून पोलिसांनी एकनाथ खडसे यांच्या जावयाला अटक केली. पार्टीमध्ये मोठ्या प्रमाणावर अमली पदार्थ, दारू, हुक्का यांचे सेवन सुरू होते. एकनाथ खडसेंची कन्या रोहिणी यांचे पती प्रांजल खेवलकर याला अटक झाली आहे.
खराडी भागातील एका फ्लॅटमध्ये हाऊस पार्टीच्या नावाखाली बेकायदा रेव्ह पार्टी सुरू होती. फ्लॅटमध्ये अमली पदार्थ, दारू आणि हुक्काचं सेवन सुरू होतं. या पार्टीत प्रांजल खेवलकरसह एकूण ५ पुरुष आणि २ महिला सहभागी झाल्या होते. या रेव्ह पार्टीबाबत ठोस माहिती हाती येताच पोलिसांनी धाड टाकली होती. पार्टीतून अमली पदार्थ, दारू, हुक्का यांची जप्ती करण्यात आली. तसेच पार्टीत सहभागी झालेल्या प्रांजल खेवलकरसह एकूण ५ पुरुष आणि २ महिला यांना अटक करण्यात आली. अटक केलेल्यांना ससून रुग्णालयात तपासणीसाठी नेण्यात आले आहे.