मुंबई : मुंबई-पुणे एक्सप्रेस हायवेवर वाहनांचा भीषण अपघात झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. विचित्र पद्धतीने वाहने एकमेकांना धडकली आहेत. बोगद्यामध्ये तब्बल ७ ते ८ वाहनांची टक्कर झाल्याचे म्हटले जात आहे. खोपोलीजवळच्या बोरघाटातील बोगद्यामध्ये हा अपघात झाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर हा अपघात झाला आहे. खोपोलीजवळच्या बोरघाट येथील एका बोगद्यात सुमारे ७ ते ८ वाहने एकमेकांना धडकल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. अपघातात ट्रक आणि कारचा समावेश असल्याचे म्हटले जात आहे. अपघातग्रस्त वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे. मुंबई पुणे महामार्ग पोलीस, रुग्णवाहिका, देवदूत यंत्रणा, हेल्प फाउंडेशनचे सदस्य घटनास्थळी दाखल झाले आहेत. अपघातामध्ये जखमी झालेल्यांना खोपोली नगर पालिका आणि खासगी रुग्णालयात उपचारांसाठी हलवण्यात आले आहे. अपघातामुळे वाहतूक कोंडी झाली होती. अपघातग्रस्त वाहने बाजूला करुन वाहतूक सुरळीत करण्याचे काम सुरु आहे.
नवी दिल्ली : बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे देशातील अनेक राज्यांमध्ये पावसाचा जोर वाढला आहे. हवामान खात्याने बिहार, ...
कंटेनरचा ताबा सुटल्याने अपघात
मुंबई लेनवर असलेल्या या उतारावर कंटेनरचा ताबा सुटल्याने त्याने समोर असलेल्या अनेक चारचाकी आणि मालवाहू वाहनांना जबर धडक दिली. अपघातातील वाहनांचे प्रचंड नुकसान झाले असून, काही गाड्या अक्षरशः चक्काचूर झाल्या आहेत. तरीही, सुदैवाने या भीषण अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नसल्याची माहिती आहे. मात्र, अनेक प्रवासी किरकोळ ते मध्यम स्वरूपाच्या दुखापतींनी जखमी झाले आहेत. यातील बसचा चालक गंभीर जखमी असल्याचे म्हटले जात आहे. जखमींना तातडीने वर्धाच्या सेवाग्राम रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आले आहे.