पडद्यामागचा ॲक्शन हिरो

  31

टर्निंग पॉइंट : युवराज अवसरमल 


मनोहर वर्मा यांनी आपल्या कामातून स्वतःची अशी ओळख निर्माण केली आहे. ॲक्शन डायरेक्टर म्हणून त्यांनी भरपूर चित्रपटासाठी कामे केली आहेत. प्रत्येक वर्षी दोन मराठी चित्रपट करणे, ते देखील निर्मात्यांच्या बजेटमध्ये हे ते आपले कर्तव्य मानतात. ॲक्शन डायरेक्टर होण्याच्या अगोदर ते आणि अभिनेता सलमान खान सात वर्षे प्रसिद्ध दिग्दर्शक शशिलाल नायर यांच्याकडे सहाय्यक दिग्दर्शक होते.


त्यांचे शालेय शिक्षण महानगरपालिकेच्या शाळेतून झाले. त्यानंतर अंधेरीच्या भवन्स कॉलेजमधून त्यांचे पुढील शिक्षण झाले. कॉलेजच्या कल्चर अॅक्टिव्हिटीमध्ये त्यांचा सहभाग असायचा. काही एकांकिका त्यांनी दिग्दर्शित केल्या. स्पोर्ट्समध्ये देखील ते उत्तम होते. कॉलेजमध्ये जनरल सेक्रेटरी म्हणून त्यांची निवड झाली होती. कॉलेजच्या विद्यार्थ्यांसाठी बस कन्सेशन, मुंबई विद्यापीठाकडून एटीकेटी परीक्षा रद्द करून पूर्णपरीक्षा घेण्याची योजना होती. मनोहरने मुंबई विद्यापीठाच्या वाॅइस चॅन्सेलरला भेटून एटीकेटी परीक्षा कायम ठेवली. त्यांनी केलेल्या प्रयत्नामुळे आज एटीकेटी परीक्षा कायम आहे. भवन्स कॉलेजच्या विद्यार्थ्यांचे अनेक प्रश्न त्यांनी सोडविले. ‘भवन्स कॉलेजने मला भरपूर दिले व आज मी जो कोणी आहे त्याचे श्रेय कॉलेजला आहे’ अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.


शोले या गाजलेल्या चित्रपटाच्या शूटिंगसाठी त्यांच्या वडिलांनी घोडे पुरविले होते. त्याकाळी जवळ-जवळ प्रत्येक सिनेमासाठी घोड्यांची आवश्यकता होती, बद्रीप्रसाद वर्मा हे त्यांच्या वडिलांचे नाव होते. ते स्टंटमॅन होते. त्यांच्यामुळेच आज मनोहरजी या क्षेत्रात आले. चित्रपटसृष्टीत वडिलांना मिळणारे प्रेम, आदर त्यांनी पाहिले आहे. ‘मेहनत करो, नियत साफ रखो, भगवान भी तुमसे डरेगा ‘हे वडिलांचे तत्त्व ते आजदेखील पाळत आहेत.


सुरुवातीला अनेक जाहिरातीसाठी त्यांनी ॲक्शन डायरेक्टर म्हणून काम केले. लिम्का, पेप्सी, कोक, अमिताभची हिमानी पेन रिलीफ, अपग्रेड ही जाहिरात त्यांनी केली. जवळपास पाचशे ते सहाशे जाहिराती त्यांनी केल्या. त्यातल्या एका दिग्दर्शकाने त्यांना एका तमिळ चित्रपटाची ऑफर दिली. त्यानंतर त्यांच्याकडे ‘मद्रास कॅफे’ हा चित्रपट आला. हा चित्रपट त्यांच्या जीवनातील टर्निंग पॉइंट ठरला. अनेक पुरस्कारांनी त्यांना नावाजले गेले. लाईफ ओके स्क्रीन पुरस्काराच्या वेळी तर त्यांच्या विरुद्ध चार परदेशी ॲक्शन डायरेक्टरचे चित्रपट होते. अभिनेता शाहरुख खानने त्याचं कौतुक केलं व म्हणाला,‘मनोहरसाठी हे अॅवॉर्ड मिळणं कठीण होतं, कारण स्पर्धेला बिग बजेट हिट चित्रपट होते; परंतु मनोहरच्या चित्रपटाचे वैशिष्ट्य म्हणजे यातील ॲक्शन ही स्वतः मनोहरने दिग्दर्शित केलेली आहे. त्यामध्ये कोणतीही केबल वापरली गेली नाही की, वीएफएक्स तंत्रज्ञानाचा वापर केला नाही. अभिनंदन, मनोहर वर्मा! टाळ्यांच्या गडगडाटांमध्ये साऱ्यांनी मनोहरला उभे राहून अभिवादन केले. त्यावेळी त्यांचा अपघात झाला होता. कुबड्या घेऊन ते पुरस्कारासाठी स्टेजवर आले होते. त्यानंतर हिंदी चित्रपटसृष्टीतील त्यांची कामाची व्याप्ती वाढली. मर्दानी १, एअरलिफ्ट, सुश्मिता सेनची आर्या वेबसिरीज, मिर्जापूर सीझन १,२,३ त्यांनी केली. त्यातील ॲक्शन प्रेक्षकांना खूप आवडले, भूलभुलैया २, भूलभुलैया ३, फुकरे २, फुकरे ३, क्लासमेट, झोंबविली, फास्टर फेणे, येरे येरे पैसा ३ हे चित्रपट त्यांनी केले. फास्टर फेणे चित्रपटासाठी त्यांना म. टा. सन्मान पुरस्कार मिळाला होता. त्यानंतर त्यांनी रितेश देशमुखचा वेड चित्रपट केला, रितेश देशमुखचा आगामी ‘राजे शिवाजी’ चित्रपट त्यांनी केला.


हिंदी, तमिळ, मराठी चित्रपटसृष्टीत काम करताना कशाचा विचार केला जातो असे विचारल्यावर मनोहर वर्मा म्हणाले की, बजेटचा सर्वप्रथम विचार केला जातो. मराठी चित्रपट सृष्टीचे बजेट कमी असते. प्रत्येकवर्षी मी दोन मराठी चित्रपट त्यांच्या बजेटमध्ये करण्याचे निश्चित केले आहे.


अक्षय कुमार, सलमान खान, शाहरुख खान हे स्वतःचे ॲक्शन करतात. फक्त रिस्की प्रसंग असेल तर ते डुप्लिकेटकडून करून घेतात. अमिताभ बच्चन ८० च्या वयात देखील स्वतःचे स्टंट स्वतः करतात. त्यांच्याबरोबर मनोहरने ‘अपग्रेड’ नावाची एक जाहिरात केली होती, त्यामध्ये त्यांना दरवाज्याची काच तोडायची होती. हा स्टंट त्यांनी स्वतः केला. प्रत्येक कलाकाराची देहबोली वेगवेगळी असते, सरावाने मनुष्य परफेक्ट होतो. सुष्मिता सेनने ‘आर्या’ या वेबसीरिजमध्ये, स्वतःची ॲक्शन स्वतः केलेली आहे. भूलभुलैया ३ मध्येही माधुरी दीक्षित व विद्या बालन यांनी स्वतःची ॲक्शन स्वतः केलेली आहे. रितेश देशमुखने वेड चित्रपटामध्ये स्वतःची ॲक्शन स्वतः केलेली आहे.


अभिनेता अक्षय कुमारने जवळपास सातशे स्टंट फायटर लोकांसाठी लाईफ इन्शुरन्स काढलेला आहे. त्याचा इंस्टॉलमेंट देखील ते भरतात. खरं तर त्या लोकांसाठी ही खूप आनंदाची बाब आहे. चित्रपट ही शिकण्याची प्रक्रिया आहे व ती प्रक्रिया ते दररोज शिकत असतात. मनोहर वर्मा यांना त्यांच्या पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा!

Comments
Add Comment

राजिंदर नाथ

मराठी नाटकांना हिंदीत नेणारा रंगकर्मी भालचंद्र कुबल : पाचवा वेद गेल्या आठवड्यात अखिल भारतीय नाट्यसृष्टीतील

श्रीमंत भिकाऱ्याची गोष्ट

मनभावन : आसावरी जोशी आज थोड्या वेगळ्या विषयावर बोलावेसे वाटले... बऱ्याच जणांना असे वाटेल की मी हा विषय का निवडला...?

स्वच्छतेचे महत्त्व सांगणारा ‘विराट’

टर्निंग पॉइंट : युवराज अवसरमल  ‘अवकारिका’ या मराठी चित्रपटात महत्त्वाची भूमिका बजावणारा व दक्षिणात्य

एक रंगमंच, दोन दीर्घांक आणि संयुक्त ‘प्रयोग’...

राजरंग : राज चिंचणकर मराठी रंगभूमीवर सातत्याने नवनवीन प्रयोग होत असतात. यात प्रायोगिक रंगभूमीचा वाटा मोठा आहे.

भारतीय नाट्यसृष्टीचे मूळ मोठे करणारे रतन

भालचंद्र कुबल : पाचवा वेद मध्यंतरी एक पोस्ट सोशल मीडियावर खूप व्हायरल झाली होती. त्यात रतन थिय्याम यांचा फोटो

गंगा आली मारुतीरायाच्या भेटीला...

मनभावन : आसावरी जोशी श्रावण महिना सुरू झाला आहे. अनेक पौराणिक कथा या ओलेत्या पाचूच्या दिवसांना अधिकच देखण्या,