'कुणकेश्वर मंदिराला धक्का न लावता रेवस-रेड्डी सागरी महामार्ग होणार'

मंत्री नितेश राणे यांचे एमएसआरडीसीला निर्देश


मुंबई (प्रतिनिधी) : दक्षिण कोकणची काशी म्हणून प्रसिद्ध असलेल्या श्री. क्षेत्र कुणकेश्वर मंदिराच्या परिसरात रेवस-रेड्डी कोस्टल हायवे अंतर्गत एमएसआरडीसीकडून चौथऱ्याचे काम हाती घेण्यात आले आहे. या प्रकल्पाच्या आनुषंगाने गुरुवारी मुंबईतील निर्मल भवन येथील महाराष्ट्र इन्स्टिट्यूशन फॉर ट्रान्सफॉर्मेशन कार्यालयात मंत्री नितेश राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठक पार पडली.


रेवस-रेड्डी कोस्टल हायवे अंतर्गत एमएसआरडीसीकडून देवगड तालुक्यातील कुणकेश्वर येथील रस्त्याचे पुनर्वसन आणि अपग्रेडेशन करण्यात येत आहे. याअंतर्गत कुणकेश्वर मंदिर परिसरात चौथऱ्याचे काम करण्यात येणार आहे. या कामाचा आढावा घेण्यासाठी मंत्री नितेश राणे यांच्या उपस्थितीत आढावा बैठक पार पडली.


या बैठकीत मंत्री नितेश राणे यांनी सदर प्रकल्पाची सविस्तर माहिती घेतली. यावेळी बोलताना मंत्री नितेश राणे म्हणाले की, 'श्री. क्षेत्र कुणकेश्वर हे कोकणवासीयांचे
श्रद्धास्थान आहे. त्यामुळे मंदिराला कोणतीही हानी होणार नाही याची दक्षता घेऊन प्रकल्प पूर्ण करा' असे स्पष्ट निर्देश यावेळी मंत्री नितेश राणे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.
या बैठकीस एमआयटीआरएचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रवीण परदेशी, महाराष्ट्र पर्यावरण आणि हवामान बदल विभागाच्या प्रधान सचिव श्रीमती जयश्री भोज, महाराष्ट्र पर्यावरण आणि हवामान बदल विभागाचे संचालक अभय पिंपरकर, एमआयटीआरएचे वरिष्ठ सल्लागार निखिल नानगुडे, संदीप साटम उपस्थित होते.

Comments
Add Comment

BMC Election 2026 : मुंबई पालिका निवडणुकीत महायुतीचा फॉर्म्युला ठरला; भाजप १४०, शिवसेना ८७ जागा लढणार?

मुंबई : बहुचर्चित मुंबई पालिका निवडणुकीसाठी भाजप आणि शिवसेनेचा फॉर्म्युला अखेर निश्चित झाला आहे. मुख्यमंत्री

संगीत साधनेच्या २० वर्षांचा उत्सव - १३६ वी प्रातःस्वर मैफल

प्रत्येक मैफलीत नवा कलाकार अशी संकल्पना मुंबई : भारतीय शास्त्रीय संगीताच्या संवर्धन व प्रचारासाठी गेली दोन

‘इंग्रजी’ भाषेत नामनिर्देशनपत्र, शपथपत्र भरण्याची मुभा

राज्य निवडणूक आयोगाचे आयुक्तांना पत्र मुंबई : मुंबई महापालिकेच्या निवडणुकीसाठी मराठीबरोबरच इंग्रजी भाषेतही

३०७ वर्षे नाताळ साजरा करणारे मुंबईतील ‘कॅथेड्रल’

चर्च आकर्षक रोषणाई आणि सजावटीने उजळले ‘चर्चगेट’ मुंबई : मुंबईत आणि उपनगरात सध्या नाताळनिमित्त उत्साहाचे

स्वबळाची भाषा करणाऱ्यांकडे उमेदवारांचा दुष्काळ

काँग्रेसकडे मुंबईतील ३० प्रभागांमध्ये एकही इच्छुक नाही उत्तर मुंबईत उमेदवार शोधण्यासाठी करावी लागणार

१६ जानेवारीला मुंबई जिंका; अटलजींना तीच खरी आदरांजली

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आवाहन मुंबई : “अंधेरा छटेगा, सूरज निकलेगा, कमल खिलेगा' हे अटलजींचे उद्गार