भारताने ड्रोनद्वारे केली यशस्वी क्षेपणास्त्र चाचणी


नवी दिल्ली : भारताने आंध्र प्रदेशमधील चाचणी तळावरुन ड्रोनद्वारे क्षेपणास्त्र चाचणी केली. ही चाचणी यशस्वी झाली. यामुळे संरक्षण साहित्य निर्मितीत आत्मनिर्भरतेच्या दिशेने देशाचे आणखी एक दमदार पाऊल पडले आहे. डीआरडीओने (Defence Research and Development Organisation) ड्रोनद्वारे यशस्वी क्षेपणास्त्र चाचणी घेतली. संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी एक्स पोस्ट करुन या उल्लेखनीय कामगिरीसाठी भारतीय संशोधकांचे आणि तंत्रज्ञांचे कौतुक केले. डीआरडीओने केलेल्या यशस्वी प्रयोगामुळे भारताच्या क्षेपणास्त्र सामर्थ्यात आणखी वाढ होण्यास मदत होणार आहे.





आंध्र प्रदेशमधील कुर्नूल येथील नॅशनल ओपन एरिया रेंजमध्ये डीआरडीओने ड्रोनद्वारे यशस्वी क्षेपणास्त्र चाचणी घेतली. चाचणीसाठी प्रिसिजन गाईडेड मिसाईलचा वापर करण्यात आला. या प्रकल्पात डीआरडीओ, डीसीपीपी (Data Security Council of India), एमएसएमई (Micro, Small, and Medium Enterprises) आणि स्टार्टअप सहभागी झाले होते. संरक्षणमंत्र्यांनी प्रकल्पात सहभागी असलेल्या सर्वांचे यशस्वी चाचणीसाठी अभिनंदन केले. भारतीय उद्योग आता महत्त्वपूर्ण संरक्षण तंत्रज्ञान आत्मसात करण्यास आणि उत्पादन करण्यास तयार आहे, असेही संरक्षणमंत्री म्हणाले.


ड्रोनद्वारे क्षेपणास्त्र चाचणीच्या प्रकल्पात आणखी काही प्रयोग होणार असल्याचे वृत्त आहे. वेगवेगळ्या प्रकारची क्षेपणास्त्र ड्रोनद्वारे प्रक्षेपित करण्याचे तंत्रज्ञान विकसित करण्याचा भारताचा प्रयत्न आहे. यामुळे लढाईत ड्रोनचा वापर वाढवण्यास मदत होणार आहे. जेव्हा लढाईत लढाऊ विमान सहभागी होते त्यावेळी कोट्यवधी रुपयांचे विमान आणि त्यातील वैमानिक यांना सतत संकटांतून मार्ग काढावा लागतो. हा धोका ड्रोनच्या प्रभावी वापराने कमी करता येणार आहे. यामुळे निश्चित असलेल्या लक्ष्यांवर हल्ला करण्यासाठी भारताकडून भविष्यात ड्रोनचा वापर वाढण्याची शक्यता आहे. या शक्यतेला ड्रोनद्वारे यशस्वी क्षेपणास्त्र चाचणी झाल्यामुळे आणखी बळ मिळाले आहे.


Comments
Add Comment

सरन्यायाधीशांवरील हल्ल्याने प्रत्येक भारतीय नाराज, पंतप्रधानांनी केले ट्वीट

नवी दिल्ली : सुप्रीम कोर्टात सरन्यायाधीश बी. आर. गवई यांच्यावरील हल्ल्याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही नाराजी

आयएनएस 'अँड्रॉथ' भारतीय नौदलात दाखल, किनारी भागात शत्रूंचा सामना करण्यास सक्षम

भारतीय नौदल किनारी भागात शत्रूंचा सामना करण्यास सक्षम असेल नवी दिल्ली : भारतीय नौदलाने सोमवारी विशाखापट्टणम

माउंट एव्हरेस्टला हिमवादळाचा तडाखा; १००० गिर्यारोहक अडकले, बचावकार्य सुरू

नेपाळ : जगातील सर्वात उंच शिखर असलेल्या माउंट एव्हरेस्टला हिमवादळाचा तडाखा बसला आहे. तिबेटमधील माउंट

Bihar Election 2025 : बुरखा परिधान केलेल्या महिलांना मतदान करता येणार का ?

बिहार : बिहारमधील विधानसभा निवडणुकांची घोषणा झाली असून निवडणूक आयोगाने पत्रकार परिषद घेऊन मतदानाच्या तारखा

केरळच्या सुप्रसिद्ध मंदिरात सोन्याची चोरी, SIT चौकशीचा न्यायालयाचा आदेश

तिरुवनंतपुरम : सबरीमाला मंदिर पर्यटनाच्या दृष्टीने केरळसाठी फार महत्त्वाचे आहे. सोन्याचा गाभारा आणि इतर

ट्रॅफिक का थांबले? पहा आणि कमेंट करुन सांगा... ब्रिजवरून ट्रेन गेली, आणि खालील रस्त्यावरचा 'तो' क्षण; व्हिडिओ व्हायरल

मुंबई: सोशल मीडियावर दररोज अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात, जे कधी आश्चर्यचकित करतात, तर कधी हसून पोट दुखवतात. असाच