Ashish Shelar : अमेरिकेतील मराठी शाळांना महाराष्ट्र शासनातर्फे अभ्यासक्रम देऊ मंत्री आशिष शेलार यांचं आश्वासन

सॅन फ्रान्सिस्को : अमेरिकेतील मराठी शाळांना महाराष्ट्र शासनातर्फे अभ्यासक्रम देऊ, असे आश्वासन राज्याचे माहिती तंत्रज्ञान तथा सांस्कृतिक कार्य मंत्री एँड आशिष शेलार यांनी दिले.


अमेरिका दौऱ्यावर असणाऱ्या एँड आशिष शेलार यांनी कॅलिफोर्निया राज्यातील सॅन फ्रान्सिस्को येथील बे एरिया येथे मराठी शाळा चालवणाऱ्या महाराष्ट्र मंडळाच्या पदाधिकाऱ्यांची भेट घेतली. सेवा भावाने एकत्र आलेली मराठी माणसे आपल्या मुलांना मराठी भाषा, संस्कृती, इतिहास आणि आपल्या महाराष्ट्रातील लोकपरंपरा शिकवून "मराठीचा संस्कार" आपल्या नव्या पिढीवर व्हावा म्हणून इथे शाळा चालवतात. सन २००५ पासून ही शाळा चालवली जाते. सुमारे ३०० विद्यार्थी इथे मराठी शिकत आहेत.







अमेरिकेत अशा ५० हून अधिक शाळा या मराठीच्या असून काही सेवा भाव ठेवून इथली मराठी माणसे या शाळा चालवत आहेत. अमेरिकेतील स्थानिक प्रशासनाला जर महाराष्ट्र शासनाने शिफारस केली तसेच अभ्यासक्रम उपलब्ध करुन दिला तर मराठी भाषा शिकवणे, परिक्षा व प्रमाणपत्र विद्यार्थ्यांना देणे सुलभ होईल, असे या शाळेच्या पदाधिकाऱ्यांनी या भेटीत लक्षात आणून दिले.




दरम्यान याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दादा भूसे यांच्याशी चर्चा करुन महाराष्ट्र शासनाचे आवश्यक ते सहकार्य व शिफारस, अभ्यासक्रम नक्की देईल, असे आश्वासन मंत्री शेलार यांनी अमेरिकेतील महाराष्ट्र मंडळाला दिले आहे.

Comments
Add Comment

ऑस्ट्रेलिया : सिडनीत हनुक्का उत्सवादरम्यान गोळीबार, १० जणांचा मृत्यू

सिडनी : ऑस्ट्रेलियातील सिडनी येथे बोंडी बीचवर (समुद्रकिनारा) ज्यू नागरिक हनुक्का उत्सव साजरा करत असताना दोन

आसाममध्ये माजी हवाई दल अधिकारी कुलेंद्र सरमाला अटक

पाकिस्तानसाठी हेरगिरी करणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश गुवाहाटी : पाकिस्तानच्या गुप्तचर यंत्रणांसाठी हेरगिरी

पाकिस्तानच्या इतिहासात आयएसआय प्रमुखाला पहिल्यांदाच शिक्षा

जनरल फैज हमीद यांना १४ वर्षे तुरुंगवास इस्लामाबाद : भारताविरोधात कटकारस्थाने रचणारी पाकिस्तानची गुप्तचर

फ्रान्समध्ये वीज झाली पूर्ण मोफत

युरोप  : फ्रान्स देशात काही विशिष्ट कालावधीसाठी विजेची किंमत अचानक 'शून्य' झाली आहे. मागणीत मोठी घट आणि उत्पादनात

पाकिस्तानच्या संसदेत सभापतींना रोख रक्कम मिळाली, १२ खासदारांनी १० नोटांसाठी उड्या मारल्या

इस्लामाबाद : पाकिस्तानच्या नॅशनल असेंब्लीत एक अजब घटना घडली. या घटनेवर हसावे की पाकिस्तानच्या खासदारांच्या

सौदी अरेबियाचा मोठा निर्णय! मद्यप्राशनास परवानगी

कडक नियमात शिथिलता सौदी अरेबिया : सौदी अरेबियातील कायदे शरिया (इस्लामिक धार्मिक कायदा)वर आधारित आहेत.