Gold Rate Today: सलग दुसऱ्यांदा सोने 'इतक्याने' स्वस्त!

प्रतिनिधी: सलग दुसऱ्यांदा आज सोन्यात घसरण झाली आहे. सहावेळा वाढ झाल्यानंतर आता दुसऱ्यांदा घसरण झाली. प्रामुख्याने आंतरराष्ट्रीय बाजारातील अस्थिरतेच्या दबावाचा फटका सोन्यात बसल्याने गुंतवणूकदारांनी आज पुन्हा सोन्यात नफा बुकिंग (Pro fit Booking) केल्याची शक्यता आहे. सकाळच्या सत्रातही सोन्याच्या निर्देशांकात घसरण झाली होती ती संध्याकाळपर्यंत कायम राहिली आहे. ' गुडरिटर्न्स ' संकेतस्थळावरील माहितीनुसार, २४ कॅरेट सोन्याच्या प्रति ग्रॅम दरात ४९ रूपयांची, २२ कॅरेट सोन्याच्या प्रति ग्रॅम दरात ४५ रुपयांची, १८ कॅरेट सोन्याच्या प्रति ग्रॅम दरात ३७ रूपयांची घसरण झाली आहे. त्यामुळे सोन्याचे प्रति ग्रॅम दर २४ कॅरेटसाठी १००४८ रूपये, २२ कॅरेटसाठी ९२१० रूपये, १८ कॅरेटसाठी ७५३६ रुपयांवर गेले आहेत.


संकेतस्थळावरील माहितीनुसार,२४ कॅरेट सोन्याच्या प्रति तोळा किंमतीत ४९० रूपयांची घसरण झाली आहे तर २२ कॅरेट सोन्याच्या प्रति तोळा किंमतीत ४५० रूपयांनी तर १८ कॅरेटसाठी प्रति तोळा किंमतीत ३७० रूपयांची घसरण झाली आहे. यामुळे प्रति तोळा दरपातळी २४ कॅरेटसाठी १००४८० रूपयांवर, २२ कॅरेटसाठी ९२१०० रूपयांवर, तर १८ कॅरेटसाठी ७५३६० रूपयांवर गेली आहे.


आज सराफा बाजारातील सोन्याच्या प्रति ग्रॅम सरासरी दरपातळी २४ कॅरेटसाठी १००४८ रूपये, २२ कॅरेटसाठी ९२१० रूपये व १८ कॅरेटसाठी ७५९० रूपये आहे. आज संध्याकाळपर्यंत सोन्याच्या जागतिक गोल्ड फ्युचर निर्देशांकात १.०१% घसरण झाली आहे. भारतीय कमोडिटी बाजारातील एमसीएक्स (Multi Commodity Exchange MCX) बाजारातील सोन्याची दरपातळी ०.७१% घसरत ९८०२१.०० रूपयांवर पोहोचली आहे.आंतरराष्ट्रीय बाजारातील जागतिक दबावाबरोबरच डॉलरमध्ये वाढ झाल्याने सोन्यात आणखी दबाव निर्माण झाला होता. सततच्या डॉवर वाढीबरोबर वाढत्या पुरवठ्यामुळे सोने किंमती नियंत्रित राहण्यास बाजारात मदत झाली. याशिवाय ट्रम्प यांनी जेरोम पॉवेल यांना काढण्याचा विचार नाही असे विधान केल्याने फेडच्या अस्थिरतेचा फटकाही सोन्यात बसला.


आजच्या सोन्याच्या कामगिरीवर भाष्य करताना एलकेपी सिक्युरिटीजचे वरिष्ठ रिसर्च विश्लेषक जतीन त्रिवेदी म्हणाले की,' अमेरिका आणि जपान आणि युरोपियन युनियन सारख्या व्यापारी भागीदारांमधील टॅरिफ करारांच्या अपेक्षा कमी झाल्यामुळे सोन्याचा भाव आणखी २५ डॉलर्सने घसरून ३३४५ डॉलर्सवर आला जो ०.७०% कमी आहे. या घडामोडींमुळे सोन्याचे भाव अस्थिर राहू शकतात, विशेषतः उच्च पातळीवर...आता लक्ष पुढील आठवड्यात होणाऱ्या फेडच्या दर निर्णयाकडे वळले आहे, जे पुढील किमतीच्या दि शेने महत्त्वाचे ठरेल. देशांतर्गत बाजारात, रुपयाच्या घसरणीमुळे घसरणीला चालना मिळाली, ज्यामुळे MCX सोन्याची घसरण ०.५०% ₹९८,२०० पर्यंत मर्यादित झाली. जागतिक संकेतांमध्ये मंदी आल्यामुळे, सोन्याची अल्पकालीन श्रेणी ९७०००- ९९००० पातळी पर्यंत खाली आली आहे.'

Comments
Add Comment

कुलाबा सांडपाणी प्रकल्पातील प्रक्रिया ३ दशलक्ष लिटर पाण्याची होणार विक्री

मुंबई: कुलाबा मल जल प्रक्रिया केंद्रात प्रकल्पातून पिण्याव्यतिरिक्त अन्य कामांसाठी प्राप्त होणाऱ्या १० दशलक्ष

मिठी नदीच्या कामाला येत्या १ एप्रिलपासून होणार सुरुवात

मुंबई: मुंबईतील २६ जुलैच्या महापुराला कारणीभूत ठरलेल्या मिठी नदीतील गाळाची सफाई करण्यासाठी आतापर्यंत कंपन्याच

मुंबईत आतापर्यंत सुमारे ८८ टक्के मालमत्ता कर वसुली

मुंबई: मंगळवार २४ मार्च २०२६ पर्यंत एकूण ६ हजार ४४९ कोटी रुपये म्हणजेच निर्धारित उद्दिष्टाच्या ८७.८६ टक्के इतका

मुंबईतील चारही प्रवेशद्वार सुशोभीकरणाची संकल्पना पुढील १५ दिवसात सादर करा; महापौर रितू तावडे यांचे प्रशासनाला निर्देश

मुंबई: मुंबईतील दहिसर, वाशी, ऐरोली आणि मुलुंड येथील प्रवेशद्वारांची उभारणी, सुशोभीकरणासह परिसर व पर्यटन

मुंबईतील मालमत्‍ता कराच्‍या वसुलीसाठी मुंबई महानगरपालिका अधिनियमात सुधारणा

मुंबई: मुंबईमधील मालमत्‍ता कराच्‍या वसुलीसाठी मुंबई महानगरपालिका अधिनियम, १८८८ चे कलम १५४ मध्‍ये सुधारणा

Ashok Kharat: व्हायरल व्हिडीओने खळबळ, अशोक खरात एचआयव्ही पॉझिटिव्ह?

मुंबई: महिलांवरील अत्याचार आणि फसवणूक प्रकरणात अटकेत असलेल्या भोंदूबाब अशोक खरात प्रकरणी दररोज नवे धक्कादायक