गणेश नाईक-एकनाथ शिंदेंमधील संघर्ष पुन्हा उफाळला - मनोमिलन ठरले औटघटकेचे; नवी मुंबईकरांचे भूखंड घशात घातल्याचा आरोप

मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणात ठाणे आणि नवी मुंबईतील सत्तासमीकरणे नेहमीच चर्चेचा विषय राहिली आहेत. विशेषतः एकनाथ शिंदे यांनी ठाण्याची कमान हाती घेतल्यापासून गणेश नाईक आणि शिंदे यांच्यात सुप्त संघर्ष सुरू झाला. नाईक मंत्री झाल्यानंतर त्यांनी सुरू केलेल्या जनता दरबारांनी या संघर्षाला व्यापक वळण मिळाले. मात्र, महापालिका निवडणुकीवेळी अचानक या दोन्ही नेत्यांनी मंत्रालयात बंद दाराआड चर्चा केल्याने त्यांचे मनोमिलन झाले की काय, अशा चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाल्या होत्या. मात्र, आता निवडणुकांचा हंगाम आटोपताच, या दोन्ही नेत्यांमधील संघर्ष पुन्हा उफाळून आला आहे.


वाशी येथील जनता दरबारात सिडको आणि महापालिका प्रशासनाला धारेवर धरताना मंत्री नाईक यांचा संयम सुटलेला पाहायला मिळाला. ते म्हणाले की, "मी रुग्णालय, शाळा आणि उद्यानांसाठी भूखंडांची मागणी केली होती. मात्र, काही दलालांनी संगनमत करून हे भूखंड बिल्डरांच्या घशात घातले आहेत. ज्या मंत्रिमंडळात मी आहे, त्याच मंत्रिमंडळातील नगरविकास खात्याने अशा प्रकारचे काम करावे, याची मला लाज वाटते. जर जनतेच्या हिताची कामे मी करू शकणार नसेल, तर हे मंत्रीपद काय चाटायचे आहे का?" असा संतप्त सवाल करीत त्यांनी या खात्याचे मंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे अंगुलीनिर्देश केला.


आपला राग शांत करायचा असेल तर सिडको आणि एमआयडीसीने जनतेच्या हिताचे भूखंड पुन्हा परत करावेत, अशी मागणी त्यांनी केली. "मी पक्षाचा आभारी आहे की त्यांनी मला मंत्रीपद दिले, पण याचा अर्थ मुका होऊन बसण्यासाठी मी हे पद स्वीकारलेले नाही," असे सांगत त्यांनी या प्रकरणाबाबत थेट मुख्यमंत्र्यांकडे दाद मागणार असल्याचे स्पष्ट केले.



संघर्षाची कारणे


ठाणे आणि नवी मुंबई या पट्ट्यात स्वतःचे वर्चस्व टिकवण्यासाठी नाईक आणि शिंदे यांच्यात प्रदीर्घ काळापासून संघर्ष सुरू आहे. शिंदे यांनी नवी मुंबईत संघटनात्मक जाळे विणण्यास सुरुवात केल्यापासून नाईक अस्वस्थ होते. महापालिका निवडणुकीआधी प्रभाग रचना आणि नगरसेवक फोडण्यावरून सुरू झालेला हा वाद काही काळ शांत झाला होता. मंत्रालयातील बंद दाराआड झालेल्या चर्चेनंतर दोन्ही नेत्यांचे मनोमिलन झाल्याचे चित्र निर्माण झाले होते; मात्र गणेश नाईक यांनी थेट नगरविकास खात्यावरच तोफ डागल्याने हा राजकीय संघर्ष आता अधिक तीव्र होण्याची चिन्हे आहेत.

Comments
Add Comment

US Military Plane : अमेरिकेचं लष्करी विमान थेट रशियात उतरलं; मॉस्कोतील लँडिंगने खळबळ

मॉस्को : रशिया-युक्रेन युद्धाच्या पार्श्वभूमीवर अमेरिका आणि रशियामधील संबंध अत्यंत संवेदनशील असताना,

BWF world rankings : बीडब्ल्यूएफ जागतिक क्रमवारीत त्रिशा आणि गायत्रीची मोठी झेप

नवी दिल्ली : नुकत्याच झालेल्या बॅडमिंटन विश्वचॅम्पियनशिपमध्ये कांस्यपदक जिंकल्यानंतर, भारतीय महिला दुहेरी

Arun Datte : गुरुत्वाकर्षणालाही चकवणारी कला!

मूर्तिकार अरुण दत्ते या वर्षी काय नवा 'बॅलन्स' साधणार ? मुंबई : गणेशोत्सवाचे वेध सर्वत्र लागले असून यंदाच्या

Rahul Dravid : टीम इंडियाला डब्ल्यूटीसीच्या अंतिम फेरीत पोहोचण्याची संधी, पण मार्ग खडतर - राहुल द्रविड

नवी दिल्ली : भारताचे माजी मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांचे मत आहे की, वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप (डब्ल्यूटीसी)

Xi Jinping : ब्रिक्स परिषदेसाठी शी जिनपिंग भारत दौऱ्यावर येण्याची शक्यता; ४०० लोकांचे शिष्टमंडळही येणार

बीजिंग : पुढील महिन्यात दिल्लीत होणाऱ्या ब्रिक्स शिखर परिषदेत सहभागी होण्यासाठी चीनचे राष्ट्राध्यक्ष शी

PA's daughter : रोहित पवारांच्या PAच्या मुलीचा मृत्यू; पोलिसांच्या तपासात धक्कादायक माहिती

बारामती : राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे आमदार रोहित पवार यांचे स्वीय सहाय्यक अजित दशावतारे