अंधेरीतील पहिल्या पुष्पोत्सवाचे प्रसिद्ध अभिनेते पद्मश्री अक्षय कुमारच्या हस्ते उद्घाटन

भाजपच्या ‘आवाज मुंबईकरांचा, संकल्प भाजपचा’ अभियानांतर्गत अभिनेता अक्षय कुमार यांनी दिलेल्या शहरव्यापी स्वच्छता स्पर्धेच्या सूचनेला बीएमसीची मान्यता – आमदार अमीत साटम


बीएमसीच्या स्वच्छता स्पर्धेला ‘मुंबई क्लीन लीग’ असे नाव अभिनेता अक्षय कुमार यांनी दिले; या उपक्रमाचे नेतृत्वही ते करणार – आमदार अमीत साटम


आमदार व भाजपाचे मुंबई अध्यक्ष अमीत साटम यांच्या पुढाकारे उपनगरात होणारा पहिला पुष्पोत्सव


शिवलिंग, हत्ती आणि मोर यांच्या फुलांपासून तयार केलेल्या प्रतिकृती या प्रदर्शनातील खास आकर्षण – आमदार अमीत साटम


मुंबई : दरवर्षी बृहन्मुंबई महानगरपालिकेतर्फे भायखळा येथील वीरमाता जीजाबाई भोसले उद्यान व प्राणीसंग्रहालयामध्ये होणाऱ्या पुष्प महोत्सवाप्रमाणे पहिल्यांदाच मुंबई उपनगरातील अंधेरीतील जुहू येथील पुष्पा नरसी पार्कमध्ये पहिला पुष्पोत्सव आयोजित करण्यात आला आहे. शनिवारी पुष्पोत्सवाचे उद्घाटन पद्मश्री अभिनेते अक्षय कुमार यांनी केले. यावेळी अंधेरी पश्चिमचे आमदार व भाजपचे मुंबई अध्यक्ष अमीत साटम, महानगरपालिकेचे आयुक्त भूषण गगराणी उपस्थित होते. उद्घाटनाला विद्यार्थी आणि स्थानिक नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.


यासदंर्भात माहिती देताना आमदार अमीत साटम म्हणाले की, गेली २९ वर्षे भायखळा येथील वीरमाता जीजाबाई भोसले उद्यान व प्राणीसंग्रहालयामध्ये पुष्प महोत्सव आयोजित केला जातो. यंदा प्रथमच त्या धर्तीवर उपनगरातही पुष्पोत्सव होत आहे. हा पहिला पुष्पोत्सव अंधेरीमधील जुहू येथे आयोजित करण्यात आला आहे. १४ आणि १५ फेब्रुवारी सकाळी ८ ते रात्री ९ पर्यंत दोन दिवस हा पुष्पोत्सव आहे..


भाजपच्या ‘आवाज मुंबईकरांचा संकल्प भाजपचा' या मोहिमेच्या अंतर्गत अभिनेते अक्षय कुमार यांनी ‘स्वच्छ मुंबई’ प्रतियोगिता आयोजित करण्याची सूचना केली होती. अक्षय कुमार यांची सूचना महानगरपालिकेने स्वीकारली आहे. मुंबईकरांचा सहभाग असलेली स्वच्छता प्रतियोगिता लवकरच आयोजित केली जाणार आहे. या प्रतियोगितेचे मूल्यमापन तृतीय पक्ष एजन्सी तर्फे करण्यात येईल. यासाठी मुंबई महानगरपालिका लवकरच एजन्सी नियुक्त करणार आहे. ‘मुंबई क्लीन लीग’ असे या प्रतियोगितेचे नाव अभिनेते अक्षय कुमार यांनी दिले असून याचे नेतृत्वही तेच करणार आहेत. मुंबई शहराचे ‘स्वच्छ भारत’ मधील स्थान वरती आणण्याच्या दृष्टिकोनातून या मोहिमेचा उपयोग होईल, असे आमदार अमीत साटम यांनी सांगितले.


स्थानिक नगरसेवक सुधा सिंह, उपायुक्त भाग्यश्री कापसे, प्रभाग अधिकारी चक्रपाणी अल्ले, उद्यान अधिक्षक जितेंद्र परदेशी या उद्घटनाला उपस्थित होते. या पुष्पोत्सवात विविध प्रकारची फुले, रोपे तसेच भाज्या व दुर्मिळ वनस्पती पाहता येतील. या ठिकाणी फूलांपासून तयार केलेली भली मोठी शंकराची पिंडी, हत्ती व मोर या प्रदर्शनातील खास आकर्षण आहे. रविवारी रात्री ९ पर्यंत प्रदर्शन सर्वांना विनामूल्य खुले आहे. बृहन्मुंबई महानगरपालिका, वृक्ष प्राधिकरण, ट्री सीटीज, माझी वसुंधरा या पुष्पोत्सवाचे आयोजक आहेत. महानगरपालिकेच्या के -पश्चिम विभागाने या पुष्पोत्सवासाठी पुढाकार घेतला आहे.

Comments
Add Comment

Nitesh Rane : मच्छीमारांच्या नुकसानभरपाई धोरणाचा मंत्री नितेश राणे यांच्याकडून मंत्रालय स्तरावर सर्वंकष आढावा

मच्छीमारांच्या नुकसानभरपाईचा नव्याने विचार; TISS अहवालानंतर निर्णय घेणार ; मंत्री नितेश राणे मुंबई :

Nitesh Rane : पनवेल येथे सिल्ला मत्स्यालय व सी लायन मनोरंजन केंद्र उभारणीला गती द्या; मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे

सागरी जीवशास्त्र व मत्स्यविज्ञानाचा प्रत्यक्ष अनुभव देणारा महत्त्वाकांक्षी

Ashish Shelar : मंत्री आशिष शेलार यांनी स्वीकारला एन. डी. स्टुडिओच्या अध्यक्षपदाचा पदभार; चित्रपट निर्मितीला चालना देण्यासाठी महत्त्वपूर्ण निर्णय

एन. डी. स्टुडिओमध्ये चित्रिकरणासह सर्व घटकांवर ३१ मार्च २०२७ पर्यंत ५० टक्के

Jaykumar Rawal and Shambhuraj Desai : आग्रा येथील शिवपराक्रम नव्या पिढीपर्यंत; १७ ऑगस्ट ‘शिवचातुर्य दिन’ म्हणून साजरा होणार

आग्रा येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या ऐतिहासिक पराक्रमाची गाथा नव्या पिढीपर्यंत पोहोचविणार -राजशिष्टाचार

Nitesh Rane : चामोर्शीत उभे राहणार आधुनिक मत्स्य प्रशिक्षण केंद्र; गडचिरोलीतील मच्छीमारांना मिळणार नवी दिशा

- प्रशिक्षण केंद्र उभारणीच्या कार्यवाहीला गती देण्याचे मंत्री नितेश राणे यांचे निर्देश मुंबई : गडचिरोली

Chief Minister's Medical Assistance Fund : मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीतून, अवयव प्रत्यारोपणासाठी ७९५ रुग्णांना १५.७३ कोटींची मदत

मुंबई : यकृत, मूत्रपिंड, फुप्फुस, हृदय आदी अवयव निकामी झाल्यानंतर अवयव प्रत्यारोपण शस्त्रक्रिया हाच रुग्णांसाठी