मँचेस्टर: इंग्लंडचा माजी कर्णधार ज्यो रूट कसोटी क्रिकेटमध्ये सातत्याने नव-नवे रेकॉर्ड्स बनवत आहेत. आता ३४ वर्षीय ज्यो रूटने मँचेस्टर ओल्ड ट्रॅफर्ड मैदानावर एक खास रेकॉर्ड बनवला आहे.
ज्यो रूट जगातील असा पहिला फलंदाज बनला आहे ज्याने या मैदानावर कसोटी क्रिकेटमध्ये १००० धावा केल्या आहेत. ज्यो रूटने भारताविरुद्ध खेळवल्या जात असलेल्या तिसऱ्या दिवशी ही कामगिरी केली आहे. या सामन्याच्या आधी ज्यो रूटने ओल्ड ट्रॅफर्ड मैदानावर कसोटी क्रिकेटमध्ये ६५.२०च्या सरासरीने ९७८ धावा केल्या होत्या. यात एक शतक आणि सात अर्धशतकांचा समावेश होता.
ओल्ड ट्रॅफर्ड मैदानावर ज्यो रूटनंतर सर्वाधिक धावा इंग्लंडच्या ही डेनिस कॉम्पटनने बनवल्या आहेत. या मैदानावर कॉम्पन यांनी ८१८ धावा केल्या होत्या. ज्यो रूट आता कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक पन्नासहून अधिक धावा करण्याच्या यादीत दुसऱ्या स्थानावर पोहोचला आहे. रूटने कसोटी क्रिकेटमध्ये १०४ वेळा ५० अथवा त्याहून अधिक धावांची खेळी केली आहे. रूटने ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पाँटिंग(१०३)ला मागे टाकले आहे.
कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक ५० प्लस स्कोर
११९- सचिन तेंडुलकर
१०४- ज्यो रूट
१०३- रिकी पाँटिंग
१०३- जॅक्स कॅलिस
९९- राहुल द्रविड