संभाजीनगर: छत्रपती संभाजीनगरच्या महाविद्यालयीन तरुणींमध्ये राडा झाल्याची बातमी समोर आली आहे. हा वाद वाढदिवसावरून झाल्याचे समजते, मात्र यांचे रूपांतर नंतर हाणामारीत झाले. या मारहाणीत तरुणींनी एकमेकींवर कटरने हल्ला केला. या प्रकरणी दोन्ही तरुणींनी उस्मानपुरा पोलीस ठाण्यात परस्पर विरोधी तक्रारी दाखल केल्या आहेत. या तक्रारीत दोन्ही बाजूच्या कारणांमध्ये तफावत आहे.
दोघीनीही एकमेकिंविरूद्ध तक्रार दाखल करून आपापली बाजू स्पष्ट केली आहे. दरम्यान, महाविद्यालयीन तरुणीच्या या मारहाणीचा वाद थेट उस्मानपुरा पोलीस ठाण्यापर्यंत पोहोचला. याप्रकरणी पोलीस निरीक्षक अतुल येरमे यांनी दोन्ही तरुणींच्या तक्रारी घेतल्या असून या प्रकरणाचा पुढील तपास उस्मानपुरा पोलीस करत आहेत.