Maharashtra Village: राज्य सरकारकडून सहा ग्रामपंचायतींचा सन्मान केला जाणार; कोकणातील 'हे' गाव पहिल्या क्रमांकावर

मुंबई: गावाचा विकास हाच देशाचा विकास असं म्हटलं जातं. सध्या आपल्या देश लोकल ते ग्लोबल अशा मार्गाने काम करीत आहे. गावपातळीवरील जीवनमान सुधारण्यासाठी शिक्षण, आरोग्यसेवा, शेती यासह स्वच्छतेकडेही विशेष लक्ष दिलं जात आहे. संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान सन २०१८-१९, सन २०१९-२०, सन २०२०-२१, सन २०२१-२२, सन २०२२-२३ अंतर्गत विभागस्तरावर राष्ट्रसंत तुकडोजी महाराज स्वच्छ ग्राम स्पर्धा आणि विशेष पुरस्कार देण्यात आला. राज्यातील सहा ग्रामपंचायतींचा सन्मान करण्यात येणार आहे.



कोकणातील ग्रामपंचायतीला प्रथम क्रमांक


संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान सन २०१८-१९ अंतर्गत राष्ट्रसंत तुकडोजी महाराज स्वच्छ ग्राम स्पर्धा अंतर्गत ग्रामपंचायत हुमरस, ता. कुडाळ यांनी प्रथम क्रमांक तर ग्रामपंचायत आयनोडे हेवाळे ता. दोडामार्ग यांनी तृतीय क्रमांक पटकावला आहे. संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान सन २०१९-२० अंतर्गत राष्ट्रसंत तुकडोजी महाराज स्वच्छ ग्राम स्पर्धा अंतर्गत ग्रामपंचायत बापर्डे तालुका देवगड प्रथम तर ग्रामपंचायत परुळेबाजार वेंगुर्ला यांनी द्वितीय क्रमांक मिळवला आहे.


या सहा ग्रामपंचायतीचा सन्मान २५ फेब्रुवारी २०२६ रोजी दुपारी २ वाजता सिडको कार्यालय सभागृह, सिडको भवन, बेलापुर, नवी मुंबई येथे आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमांत जिल्ह्यातील सहा ग्रामपंचायतीचा सन्मान होणार आहे. अशी माहिती (पाणी व स्वच्छता) विभागाचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी अजिंक्य सावंत यांनी दिली आहे.


सन २०२०-२१ व २०२१-२२ या कालावधीत संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान अंतर्गत राष्ट्रसंत तुकडोजी महाराज स्वच्छ ग्राम स्पर्धा अंतर्गत ग्रामपंचायत निरवडे ता. सावंतवाडी यांनी प्रथम क्रमांक तर ग्रामपंचायत परुळेबाजार ता. वेंगुर्ला यांनी द्वितीय क्रमांक प्राप्त झाला आहे. पुरस्कार विजेत्या सर्व ग्रामपंचायतीचा पुरस्कार वितरण कार्यक्रम दिनांक २५ फेब्रुवारी २०२६ रोजी दुपारी २ वाजता सिडको कार्यालय सभागृह, सातवा मजला, सिडको भवन, बेलापुर, नवी मुंबई विभागीय आयुक्त यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आला आहे.

Comments
Add Comment

Nagpur News : महाराष्ट्राची परंपरा लाभलेल्या ढोल ताशाला जागतिक नामांकन

नागपूर : शिक्षण कौशल्य, क्रीडा स्टार्टअप आदी क्षेत्रात युवा पिढीचा सकारात्मक सहभाग आहे. त्यांचा हा सहभाग

Dog Attack : दोन वर्षांच्या चिमुकलीवर भटक्या कुत्र्याचा जीवघेणा हल्ला

बीड : बीड शहरातील शिवतेज नगर भागात रेणू हॉस्पिटल परिसरात घराबाहेर खेळत असलेल्या दोन वर्षांच्या चिमुकलीवर मोकाट

Eknath Shinde : पायाभूत सुविधांच्या उपलब्धतेसोबत, वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी तातडीची, दीर्घकालीन उपाययोजना

पुणे : चाकण-तळेगाव औद्योगिक क्षेत्रातील उद्योजकांच्या अडीअडचणी दूर करण्यासाठी आणि येथील उद्योगांचे स्थलांतर

Vaidyanath Temple : वैद्यनाथ मंदिर परिसरात दुसऱ्या श्रावणी सोमवरासाठी चोख बंदोबस्त

बीड : पवित्र श्रावण महिना सुरू असून, बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या श्री वैद्यनाथ

Chhatrapati Sambhajinagar Suicide News : खवड्या डोंगर दुर्घटनेला कौटुंबिक वादाची पार्श्वभूमी? आईच्या जुन्या व्हिडिओंमुळे नवे प्रश्न उपस्थित

छत्रपती संभाजीनगर : वाळूज एमआयडीसी परिसरातील तिसगावजवळच्या खवड्या डोंगरावर २१ ऑगस्ट २०२६ रोजी घडलेल्या

Gadchiroli : गडचिरोली आश्रमशाळा सर्पदंश प्रकरणी अखेर मोठी कारवाई

गडचिरोली : गडचिरोली जिल्ह्यातील जपतलाई आश्रमशाळेतील सामूहिक सर्पदंश प्रकरणी अखेर मोठी कारवाई झाली आहे.