Thane: ठाण्यात खळबळ, वेब सिरिज अभिनेत्रीच्या देहविक्रीचा व्यवसाय; पोलिसांकडून रॅकेटचा भांडाफोड

ठाणे: सिने इंडस्ट्रीत काम मिळत नसल्याकारणाने एका हिंदी वेब सिरीजमध्ये काम करणाऱ्या अभिनेत्रीने पैसे कमावण्याचा वेगळा मार्ग निवडला. तिच्यावर वेश्या व्यवसाय चालविण्याची वेळ आली. या प्रकरणाची माहिती मिळताच पोलिसांनी रॅकेटवर छापा टाकला. तसेच हा रॅकेट उधळून लावला. या प्रकरणानंतर मुंबईसह सिनेसृष्टीत खळबळ उडाली आहे.

ठाण्यातील वागळे इस्टेट परिसरातील एका हॉटेलमधून, हिंदी वेब सिरीजमध्ये काम करणाऱ्या एका २६ वर्षीय अभिनेत्रीला देहविक्रीचा व्यवसाय चालवल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे. २२ फेब्रुवारी रोजी हे संपूर्ण प्रकरण उघडकीस आलं. ठाणे पोलिसांच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध विभागाला गुप्त मिळाली होती. माहिती मिळताच पोलिसांनी हॉटेलमध्ये छापा टाकला. तसेच दोन पीडित महिलांची सुटका केली. प्राथमिक चौकशीत, आरोपी महिला वेब सिरीजमधील काही अभिनेत्रींकडून वेश्या व्यवसाय करवून घेत असल्याची माहिती समोर आली.

पोलिसांनी सांगितले की, आरोपी व्हॉट्सअॅपद्वारे ग्राहकांशी संपर्क साधत होती. तसेच यात टीव्ही कलाकारांचा सहभाग असल्याचे सांगून २५ हजार रुपयांची मागणी करत होती. प्रत्येक व्यवहारात ती कमिशन घेत होती. या प्रकरणाची माहिती मिळताच पोलिसांनी सापळा रचला. पोलिसांनी बनावट ग्राहक पाठवले. तसेच आरोपी महिलेशी संपर्क साधला. 'आमच्याकडे हिंदी वेब सिरीज आणि टीव्ही मालिकांमध्ये काम करणाऱ्या तरुणी उपलब्ध आहेत', असं आरोपीनं सांगितलं. व्यवहार ठरल्यानंतर दोन मुलींना ठाण्यातील वागळे इस्टेट परिसरातील एका हॉटेलमध्ये पाठवण्यात आलं. पोलिसांनी सापळा रचून हा डाव उधळून लावला. तसेच आरोपी महिलेला अटक केली.

पोलिसांना दिलेल्या जबाबात, आरोपीनं सांगितलं की, अभिनयाचे काम मिळण्यात अडचण येत होती, आर्थिक समस्या होती. बिहारमधील कुटुंबाचे पालनपोषण करण्यासाठी तिनं या व्यवसायात प्रवेश केल्याचं तिनं सांगितलं. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून, ११,६१० रुपयांच्या वस्तू जप्त केल्या आहेत. सध्या पोलिसांकडून या प्रकरणाचा अधिक तपास सुरु आहे. या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली आहे.
Comments
Add Comment

PA's daughter : रोहित पवारांच्या PAच्या मुलीचा मृत्यू; पोलिसांच्या तपासात धक्कादायक माहिती

बारामती : राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे आमदार रोहित पवार यांचे स्वीय सहाय्यक अजित दशावतारे

Prakash Abitkar : राज्यातील सर्व रुग्णालयांचे फायर, विद्युत आणि इमारत सुरक्षा ऑडिट; आरोग्यमंत्र्यांचे निर्देश

मुंबई : राज्यातील नागरिकांना सुरक्षित आणि दर्जेदार आरोग्य सेवा मिळावी यासाठी सर्व शासकीय, खासगी आणि धर्मादाय

Khelo India : खेलो इंडिया संवादातून १,६०० ठिकाणांवरील ८ लाखांहून अधिक युवकांशी संवाद

· महाराष्ट्रात प्रत्येक जिल्ह्यात संवाद कार्यक्रम · पंतप्रधान नरेंद्र मोदी करणार संबोधित मुंबई : हॉकीपटू मेजर

Nitesh Rane : राज्यातील सागरी विकास प्रकल्पांना प्राधान्याने मंजुरी द्या!

- मंत्री नितेश राणे यांनी घेतली केंद्रीय मंत्री सर्बानंद सोनोवाल यांची भेट - गेटवे ऑफ इंडियावरील प्रवासी शुल्क

Fishermen Diesel Subsidy : राज्यातील मच्छिमारांना किरकोळ दराने डिझेल उपलब्ध करून द्या!

- खासदार नारायण राणे यांच्यासह मंत्री नितेश राणे आणि आमदार निलेश राणे यांनी घेतली केंद्रीय पेट्रोलियम

Ashish Shelar : गडकिल्ले, ऐतिहासिक स्मारकांच्या संवर्धनाला गती; मंत्री आशिष शेलार यांचे निर्देश

मुंबई : राज्यातील गडकिल्ले, प्राचीन मंदिरे आणि ऐतिहासिक स्मारकांच्या संवर्धनाला अधिक गती देण्यासाठी जिल्हा