मॉस्को: रशियात चीनच्या सीमेला लागून असलेल्या अमूर प्रदेशात ४९ जणांना घेऊन निघालेले एक रशियन प्रवासी विमान भीषण अपघातात कोसळले. या दुर्दैवी घटनेत विमानातून प्रवास करणाऱ्या सर्व प्रवाशांचा मृत्यू झाल्याची माहिती रशियन वृत्तसंस्थेने दिली आहे. मृतांमध्ये ५ मुलांसह ४३ प्रवासी आणि ६ क्रू सदस्य होते. या सर्वांचाच जागीच मृत्यू झाल्याचे प्राथमिक वृत्तानुसार समोर आले आहे, ज्यामुळे रशियात शोककळा पसरली आहे.
अंगारा एअरलाइन्सचे Antonov-24 हे विमान होते. स्थानिक आपत्कालीन मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, विमानाने उड्डाण केल्यानंतर ते टिंडा शहरात पोहोचण्यापूर्वी हवाई वाहतूक नियंत्रकांशी विमानाचा संपर्क तुटला. संपर्क तुटल्याचे लक्षात येताच तात्काळ शोध मोहिम सुरू करण्यात आली. बचाव कर्मचाऱ्यांनी हेलिकॉप्टरमधून अपघातग्रस्त विमानाची पाहणी केली असता, विमानातून प्रवास करणारे प्रवासी जीवंत असल्याची कोणतीही खूण किंवा चिन्ह दिसले नाही.
लंडन : पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या दोन दिवसांच्या ब्रिटन दौऱ्यावर आहेत. विशेष म्हणजे मोदींचा हा ब्रिटन दौरा खास असणार आहे. भारत आणि यूके या दोघांमध्ये ...
टिंडा शहरापासून जवळपास १६ किलोमीटर अंतरावर एका डोंगरावर रशियन प्रवासी विमानाचे जळलेले अवशेष बचाव पथकाला आढळले आहेत. खराब दृश्यमानता आणि वैमानिकाच्या चुकीमुळे हे विमान कोसळल्याची प्राथमिक माहिती रशियन वृत्तसंस्थेने दिली आहे. अमूर येथील नागरी संरक्षण संस्थेने घटनास्थळी अतिरिक्त बचाव पथके पाठवल्याचे सांगितले आहे.
या भीषण विमान दुर्घटनेच्या कारणांचा तपास सुरू असून, रशियाच्या तपास समितीने या घटनेच्या सखोल चौकशीचे आदेश दिले आहेत. तसेच, स्थानिक प्रशासनाने मृतांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत जाहीर केली आहे. या दुर्घटनेमुळे विमान प्रवासाच्या सुरक्षिततेवर पुन्हा एकदा गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.