बंगळुरू चेंगराचेंगरी प्रकरण : आरसीबी-केएससीएवर कारवाई होणार; कर्नाटक सरकारचा निर्णय

बंगळुरु : चिन्नास्वामी स्टेडियमजवळ झालेल्या चेंगराचेंगरीबाबत कर्नाटक मंत्रिमंडळाने न्यायमूर्ती जॉन मायकल डी'कुन्हा यांचा अहवाल स्वीकारला आहे. ४ जून रोजी स्टेडियममध्ये झालेल्या चेंगराचेंगरीत अकरा जणांचा मृत्यू झाला होता आणि अनेक जण जखमी झाले होते.


कर्नाटकचे कायदा आणि संसदीय कामकाज मंत्री एच.के. पाटील यांनी बैठकीनंतर सांगितले की, मंत्रिमंडळाने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या विजयाचा आनंद साजरा करणाऱ्या खाजगी संस्थांवर कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे. ते म्हणाले, 'न्यायाधीश जॉन मायकल डी'कुन्हा यांचा अहवाल स्वीकारण्याचा आणि त्यावर आधारित कायदेशीर कारवाई करण्याचा निर्णय मंत्रिमंडळाने घेतला आहे.'


खाजगी संघटना, आरसीबी, कर्नाटक राज्य क्रिकेट असोसिएशन आणि डीएनए एंटरटेनमेंट नेटवर्क्स सारख्या कंपन्यांवर कायदेशीर कारवाई केली जाईल. अधिकाऱ्यांच्या बाबतीत विभागीय चौकशी सुरू केली जाईल असे मंत्र्यांनी सांगितले. न्यायमूर्ती डी'कुन्हा यांच्या अहवालात चेंगराचेंगरी आणि निष्काळजीपणासाठी जबाबदार असलेल्यांची नावे देण्यात आली आहेत.


मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी घटनेच्या दुसऱ्या दिवशी म्हणजेच ५ जून रोजी न्यायालयीन चौकशीचे आदेश दिले होते. चेंगराचेंगरीनंतर बेंगळुरूचे पोलीस आयुक्त बी. दयानंद आणि अतिरिक्त आयुक्त विकास कुमार विकास यांना निलंबित करण्यात आले होते. आयपीएलमधील यशस्वी मोहिमेनंतर आरसीबी फ्रँचायझीने आयोजित केलेल्या विजय मिरवणूकी दरम्यान ही घटना घडली होती. स्टेडियमबाहेर मोठी गर्दी जमली आणि चेंगराचेंगरी झाली होती.

Comments
Add Comment

Devendra Fadnavis at Davos : महाराष्ट्राची दावोसमध्ये ऐतिहासिक भरारी; 'थर्ड मुंबई' प्रकल्पासाठी ११ जागतिक कंपन्यांसोबत सामंजस्य करार

दावोस : जागतिक आर्थिक परिषदेत (WEF 2026) महाराष्ट्र सरकारने राज्याच्या औद्योगिक विकासाच्या दृष्टीने एक मैलाचा दगड

भारत - यूएई करारांवर शिक्कामोर्तब

नवी दिल्ली : संयुक्त अरब अमिरातीचे (यूएई) राष्ट्राध्यक्ष शेख मोहम्मद बिन जायद अल नाहयान यांचा भारताचा अल्पकालीन

शबरीमाला सोने चोरी प्रकरणात 'ईडी’कारवाई

तीन राज्यांमध्ये २१ ठिकाणी छापेमारी नवी दिल्ली : केरळमधील पवित्र सबरीमाला अय्यप्पा मंदिराशी संबंधित सोने चोरी

‘राष्ट्रगीता’वरून तामिळनाडूत हाय व्होल्टेज ड्रामा

राज्यपालांचा सभागृहातून सभात्याग नवी दिल्ली : तामिळनाडूचे राज्यपाल आर. एन. रवी आणि मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन

युएईच्या अध्यक्षांच्या तीन तासांच्या भारत दौऱ्यात अनेक महत्त्वाच्या करारांवर स्वाक्षऱ्या

नवी दिल्ली : यूएईचे राष्ट्राध्यक्ष शेख मोहम्मद बिन झायेद अल नाहयान यांच्या दिल्ली दौऱ्याने भारत-यूएई संबंधांना

नदी पुनरुज्जीवनासाठी महाराष्ट्राचे मोठे पाऊल

देशातील पहिल्या राज्य नदी पुनरुज्जीवन प्राधिकरणाचे मंत्री पंकजा मुंडे यांनी केले सादरीकरण नवी दिल्ली :