बांग्लादेश विमान अपघातातील बळींना मदत करण्यासाठी युनूस सरकारची पोस्ट, लोक भडकताच पोस्ट केली डीलिट

  55

ढाका: बांग्लादेशची राजधानी ढाका येथे झालेल्या विमान अपघातानंतर या अपघातातील मृत आणि जखमींच्या कुटुंबियांना मदत करण्यासाठी देशाचे प्रमुख मोहम्मद युनूस यांनी फेसबुक पोस्टद्वारे देशवासीयांना दान देण्याचे आवाहन केले होते. मात्र, युनूस यांच्या या पोस्टमुळे बांग्लादेशमध्ये राजकीय गोंधळ निर्माण झाला. अपघातातील बळींना मदत करण्यासाठी युनूस सरकारकडे पैसे नसल्यावरुन अनेकांनी टीका केली. हा वाद इतका वाढला की, मोहम्मद युनूस यांना ही फेसबुक पोस्ट ताबडतोब डिलीट करावी लागली.

मोहम्मद युनूस यांनी त्यांच्या फेसबुक पोस्टमध्ये नागरिकांना "मुख्य सल्लागार मदत आणि कल्याण निधी" मध्ये देणगी देण्याचे आवाहन केले होते.मीडिया रिपोर्टनुसार, ही पोस्ट २२ जुलै २०२५ रोजी दुपारी २:०० नंतर टाकण्यात आली होती. ही फेसबुक पोस्ट मोहम्मद युनूस यांचे वरिष्ठ सहाय्यक प्रेस सचिव फयज अहमद यांनी प्रेस विंगच्या अधिकृत व्हॉट्सअॅप ग्रुपमध्ये देखील शेअर केली होती.ज्यामुळे ही पोस्ट अधिकृत खात्यातूनच केली गेली होती यावर शिक्कामोर्तब करण्यात आले.

विमान दुर्घटनेनंतरच्या या पोस्टवर अनेक लोकांनी युनूस सरकारवर टीका केली. अपघातातील पीडितांना मदत करण्यासाठी सरकारकडे पुरेसा निधी नाही का? असा सवालही उपस्थित करण्यात आला.अनेक राजकीय पक्षांसह सामान्य लोकांनी युनूसवर हल्लाबोल केला. हा वाद इतका वाढला की शेवटी कोणतेही कारण न देता मोहम्मद युनूस यांनी तात्काळ ती फेसबुक पोस्ट हटवली.
Comments
Add Comment

येमेनजवळ मोठी दुर्घटना, आफ्रिकन स्थलांतरितांची बोट बुडाली, ६० हून अधिक जणांचा मृत्यू

सना, येमेन: येमेनच्या किनाऱ्यावर रविवारी एक भीषण बोट दुर्घटना घडली, ज्यात ६० हून अधिक आफ्रिकन स्थलांतरितांचा

भूकंपानंतर आता रशियात ज्वालामुखीचा उद्रेक! राखेचे लोट ६,००० मीटर उंचीपर्यंत

मॉस्को: रशियाच्या कामचटका प्रांतातील Petropavlovsk येथे ८.८ तिव्रतेचा भीषण भूकंप झाल्यानंतर आता याच ठिकाणी ज्वालामुखीचा

पाकिस्तानात ५.१ रिश्टर स्केलवर तीव्रतेचा भूकंप

इस्लामाबाद: पाकिस्तानच्या अनेक भागांमध्ये रविवारी (३ ऑगस्ट) भूकंपाचे तीव्र झटके जाणवले. पाकिस्तानच्या नॅशनल

'भारत आता रशियाकडून तेल खरेदी करणार नाही...' डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा दावा

वॉशिंग्टन: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारत आता रशियाकडून कच्चे तेल खरेदी करणे थांबवू शकतो,

२५% ट्रम्प टॅरिफचा धोका टळला! एक आठवड्यासाठी दिलासा

वॉशिंग्टन: अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी बुधवारी भारतावर २५ टक्के टॅरिफची घोषणा केली होती, जी १

ट्रम्प यांनी ४१ टक्क्यांपर्यंत लावला टॅरिफ, आदेशावर केली स्वाक्षरी, भारतासह ७० देशांवर होणार परिणाम

वॉशिंग्टन : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प मोठा निर्णय घेताना यांनी अनेक देशांच्या वस्तूंवर १० ते ४१