Stock Market: शेअर बाजारात सकाळचा 'हा' आहे कौल सेन्सेक्स निफ्टीत वाढ ! युएस बाजारातील 'ही' घडामोड महत्वाची....

मोहित सोमण:काल सकाळच्या सत्राची पुनरावृत्ती आज झाली आहे. इक्विटी बेंचमार्क निर्देशांकात सकाळच्या सत्रात वाढ झाली आहे. कालही सकाळी निफ्टी व सेन्सेक्समध्ये वाढ झाली होती मात्र अखेरीस हे निर्देशांक लाल रंगातच बंद झाले होते. आजही सका ळी सेन्सेक्स २१५.३४ अंकाने वाढला आहे तर निफ्टी ५० निर्देशांक ६०.९० अंकाने वाढला आहे. सकाळी गिफ्ट निफ्टी ०.६८% उसळला होता. मात्र ९.३० वाजेपर्यंत गिफ्ट निफ्टी (०.०१%) घसरल्याने यातून संध्याकाळपर्यतची काय होईल याचीही चाहूल गुंतवणूक दारांना लागू शकते त्यामुळेच गुंतवणूकदारांना आज बाजारात खरेदीत काळजी घेणे महत्वाचे आहे.


सकाळच्या सत्रात सेन्सेक्स बँक निर्देशांकात ६५.०१ अंकांने वाढ झाली असून बँक निफ्टीत २०.०० अंकांची वाढ झाली. सेन्सेक्स मिडकॅप व स्मॉलकॅपमध्ये अनुक्रमे ०.१४,०.१७% घसरण झाली आहे. निफ्टी मिडकॅप व स्मॉलकॅपमध्ये अनुक्रमे ०.२४%,०.४०% घस रण झाली आहे. विशेषतः आज सकाळच्या सत्रात अस्थिरता निर्देशांक (VIX Volatility Index VIX) १.२७% राहिल्याने आजही काही प्रमाणात अस्थिरतेचे संकेत मिळाले आहेत. काल सकाळच्या सत्रात अस्थिरता निर्देशांक मात्र वाढला होता. आज इन्फोसिस कंपनीसह इतर कंपनीच्या तिमाही निकालांची घोषणा होणार असल्याने त्यांच्या समभागावर (Stocks) वर लक्षण ठेवणे महत्त्वाचे आहे. दुसरीकडे निफ्टी क्षेत्रीय निर्देशांकातील कामगिरी बाजारात विविध लेअर स्पष्ट करणार आहे. आज सकाळच्या सुरुवातीच्या क लात निफ्टी क्षेत्रीय निर्देशांकात (Nifty Sectoral Indices) यांमध्ये संमिश्रित प्रतिसाद मिळाला होता. सर्वाधिक वाढ ऑटो (१.०५%), मेटल (०.६१%),ऑटो (१.०५%), तेल व गॅस (०.३४%) समभागात झाली आहे. सर्वाधिक घसरण रिअल्टी (२.४१%), कंज्यूमर ड्युरेबल्स (०.२०%), मिडिया (१.०४%), एफएमसीजी (०.३५%), मिडस्मॉल फायनांशियल सर्व्हिसेस (०.४६%) समभागात घसरण झाली आहे.


सकाळच्या सुरुवातीच्या कलात सर्वाधिक वाढ सफायर फूडस (३.२४%),आयआरएफसी (३.०५%),एमआरपीएल (३%), हिंदुस्थान कॉपर (२.४८%), आर आर केबल्स (२.४३%), टाटा मोटर्स (२.४२%), गोदरेज अँग्रोवेट (२.१८%),अदानी ग्रीन (२.१३%),इंटलेक्ट डिझाईन (१.८७%),मारूती सुझुकी (१.७१%),आयडीबीआय बँक (१.३४%), व्होडाफोन आयडिया (१.२२%), बजाज फायनान्स (१.१४%), जियो फायनांशियल सर्व्हिसेस (१.००%), आयसीआयसीआय प्रोड्यूंशिअल (०.८६%), अदानी पोर्टस (०.७२%), इन्फोऐज इंडिया (०.५८%), अदानी एनर्जी (०.५५%), मारूती सुझुकी (१.७६%), अदानी एंटरप्राईजेस (१.००%) या समभागात झाली.


सकाळच्या सत्रात सर्वाधिक घसरण लोढा डेव्हलपर (६.०५%), ओबेरॉय रिअल्टी (३.९१%), पीएनबी हाउसिंग (३.४४%), झी एंटरटेनमेंट (२.९८%), आदित्य एएमसी (२.८%), इंडिया सिमेंट (२.७४%), झेंसार टेक्नॉलॉजी (२.७३%), मस्टेक (२.१३%), सोनाटा सॉ फ्टवेअर (२.०२%), कजारिया सिरॅमिक्स (१.६२%), टाटा कंज्यूमर प्रोडक्ट (१.०७%),एलआयसी हाउसिंग फायनान्स (०.६९%),चोलामंडलम फायनान्स (०.५४%), किर्लोस्कर ब्रदर्स (०.४६%),नेटवर्क १८ मिडिया (०.३९%),एसबीआय लाईफ इन्शुरन्स (०.३७%) एशियन पेंटस (०.३५%), इंटरग्लोब एव्हिऐशन (१.५२%), कॅनरा बँक (०.८१%), सिमेन्स एनर्जी इंडिया (०.८३%), ग्रासीम इंडस्ट्रीज (०.४३%),हिंदुस्थान युनिलिव्हर (०.३८%) समभागात झाली.


आजच्या सुरुवातीच्या कलात पाहिल्यास बाजारात अस्थिरतेचे लोण कायम राहू शकतात. निफ्टी क्षेत्रीय निर्देशांकातील कामगिरी अंतिम प्रभाव पाडू शकते. याखेरीज घरगुती गुंतवणूकदार बाजारात चांगला प्रतिसाद देत असले तरी आंतरराष्ट्रीय परिपेक्षातून परदे शी संस्थात्मक गुंतवणूकदार (FII) बाजारात कसा प्रतिसाद देतील हे निर्देशांकात प्रतिबिंबित होईल अशी शक्यता आहे.


काल युएस बाजारात शेअर बाजारात नवा उच्चांक गाठला गेला आहे. प्रामुख्याने बाजारातील चांगले तिमाही निकाल, व आगामी दर फेडरल व्याजदर कपातीचे भाकीत, टेरिफमुळे वाढवत असलेला महसूल या कारणांमुळे बाजारात मोठी झाली. काही प्रमाणात काल आयटी समभागात युएस बाजारात घसरण झाली असली तरी इतर क्षेत्रीय समभागात मोठी वाढ झाली. आशियाई बाजारातही युएस बाजाराचा प्रभाव राहिल्याने आशियात बहुतांश शेअर बाजारात वाढ झाली. सकाळच्या कलातच गिफ्ट निफ्टी (०.१६%) सह निकेयी (३.१५%), स्ट्रेट टाईम्स (०.४२%), हेंगसेंग (१.१२%) , तैवान वेटेड (०.९८%), कोसपी (०.१०%), सेट कंपोझिट (२.१२%), जकार्ता कंपोझिट (०.७७%), शांघाई कंपोझिट (०.७४%) सगळ्याच बाजारात सकाळपर्यंत वाढ झाली आहे.


युएस बाजारातील विशेष बातमी म्हणजे ट्रम्प यांनी जपान बाबत टेरिफची घोषणा केली आहे ज्यामध्ये १५% टेरिफची घोषणा केली ज्यामुळे बाजारातील वातावरणही उसळले आहे. जपानने युएसमध्ये ५५० अब्ज डॉलरची गुंतवणूक केल्याचे घोषित केली असं ट्रम्प यांनी म्हटले होते. त्यामुळे जर आता भारतीय बाजारपेठेत सगळी भिस्त स्थानिक गुंतवणूकदारांसह परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांवरही अवलंबून राहिल अशी अपेक्षा आहे.


आजच्या बाजारातील सुरूवातीच्या परिस्थितीवर विश्लेषण करताना चॉईस इक्विटी ब्रोकिंग प्रायव्हेट लिमिटेडचे वरिष्ठ तंत्रज्ञान व डेरिएटिव विश्लेषक मंदार भोजने म्हणाले की,'भारतीय बेंचमार्क निर्देशांक आज सकारात्मक पातळीवर उघडण्याची अपेक्षा आहे, ज से की GIFT निफ्टीने सूचित केले आहे, जे निफ्टी ५० मध्ये सुमारे ७० अंकांची किरकोळ वाढ दर्शवते. वाढत्या अस्थिरता आणि मिश्रित जागतिक संकेतांमध्ये बाजारातील भावना सावधपणे आशावादी आहे. मागील सत्रात, निफ्टी गॅप-अपसह उघ डला परंतु त्याचे वाढ टिकवून ठेवण्यात अयशस्वी झाला, दिवसभर बाजूला व्यवहार करत होता आणि नंतर लाल रंगात बंद झाला. दैनिक चार्टवर एक मजबूत मंदीची मेणबत्ती तयार झाली, जी २०-दिवसांच्या EMA कडून नकार दर्शवते, जी वाढत्या विक्रीच्या दबा वाचे संकेत देते आणि संभाव्य अल्पकालीन कमकुवतपणाचे संकेत देते. प्रमुख आधार २५००० वर ठेवला आहे आणि २४९०० च्या खाली एक निर्णायक ब्रेक डाउनसाइड गतीला गती देऊ शकतो. वरच्या बाजूस, प्रतिकार (Resistance) २५२५० वर मर्यादित आ हे, पुढील अडथ ळा २५३००- २५५०० झोनमध्ये आहे.


बँक निफ्टीने देखील दिवसाच्या शेवटी १९६.७५ अंकांनी घसरण केली आणि दैनिक वेळेच्या फ्रेमवर एक मजबूत मंदीची मेणबत्ती तयार केली, ज्यामुळे विक्रीचा दबाव वाढला आहे. आणि अलिकडच्या तेजीच्या ट्रेंडमध्ये कदाचित विराम मिळेल. ५६५०० वर ता त्काळ आधार (Imnmdiate Support) दिसत आहे, त्यानंतर ५६३०० आणि ५६००० दरम्यान एक गंभीर झोन आहे. या झोनच्या खाली ब्रेकडाउन आणखी कमकुवतपणा निर्माण करू शकते, तर ५७००० वर प्रतिकार आहे, ५७२०० तेजीच्या सातत्य राखण्यासा ठी पुढील पातळी म्हणून काम करत आहे. संस्थात्मक आघाडीवर, परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी (FIIs) सलग दुसऱ्या सत्रात त्यांची विक्रीची मालिका वाढवली, ३५४८ कोटी किमतीच्या इक्विटीज ऑफलोड केल्या. याउलट, देशांतर्गत संस्थात्मक गुंतवणूक दार (DIIs) सलग १२ व्या दिवशी सातत्याने खरेदीदार राहिले, ५२३९ कोटी इक्विटीजमध्ये गुंतवले.


सध्याच्या बाजारातील परिस्थिती पाहता, व्यापाऱ्यांना सावधगिरी बाळगून 'बाय-ऑन-डिप्स' धोरण अवलंबण्याचा सल्ला दिला जातो, विशेषतः लीव्हरेजसह व्यापार करताना. वरच्या हालचालींदरम्यान आंशिक नफा बुक करणे आणि कडक ट्रेलिंग स्टॉप-लॉस राख णे प्रभावी जोखीम व्यवस्थापनासाठी महत्त्वाचे असेल. निफ्टी जर वर टिकून राहिला तरच नवीन दीर्घ पोझिशन्सचा विचार केला पाहिजे. २५२५० पातळीचा टप्पा गाठला. बाजारातील व्यापक प्रभाव सावधपणे तेजीत असला तरी, प्रमुख तांत्रिक स्तरांवर आणि जाग तिक घडामोडींवर बारकाईने लक्ष ठेवणे आवश्यक आहे.'


आजच्या बाजारातील सुरवातीच्या परिस्थितीवर विश्लेषण करताना जिओजित इन्व्हेसमेंट लिमिटेडचे मुख्य गुंतवणूक रणनितीकार डॉ वी के विजयाकुमार म्हणाले की,'काल S&P 500 ने प्रस्थापित केलेला 2025 चा 11 वा नवीन विक्रम जागतिक स्तरावरील शेअर बाजारांच्या दिशेचा आणि लवचिकतेचा संकेत आहे. बाजार चिंतांच्या सर्व भिंती चढत आहेत आणि मूल्यांकनाच्या चिंता मागे पडल्या आहेत. नजीकच्या काळात ही लवचिकता कायम राहण्याची शक्यता आहे. पहिल्या तिमाहीच्या निकालांमधून एक महत्त्वाचा नि ष्कर्ष म्हणजे बँकिंग आणि डिजिटल स्टॉक्सच्या सुधारित शक्यता. बँकिंगमध्ये बाजार निवडक असेल आणि उच्च दर्जाच्या खाजगी क्षेत्रातील बँकांवर, विशेषतः ICICI बँक आणि HDFC बँकेवर लक्ष केंद्रित केले जाईल. Eternal आणि Paytm चे पहिल्या तिमा हीचे निकाल डिजिटल स्टॉक्सची स्थिर वाढीची क्षमता दर्शवतात ज्यांच्याकडे वाढीचा दीर्घ मार्ग आहे. उच्च मूल्यांकन असूनही डिजिटल सेगमेंटमध्ये गुंतवणूकदारांचा रस उच्च राहील.'


आजच्या बाजारातील संभाव्य निफ्टी हालचालीवर भाष्य करताना जिओजित इन्व्हेसमेंट लिमिटेडचे मुख्य गुंतवणूक रणनितीकार आनंद जेम्स म्हणाले आहेत की,'काल १० दिवसांच्या SMA (Simple Moving Average SMA) ने कमी वळण दिले, तर ५० दिव सांच्या SMA ने कमी वळणांना आळा घालण्यासाठी पाऊल उचलले. यामुळे आज पुन्हा वरच्या दिशेने प्रयत्न होण्याची आशा कायम आहे, (संभाव्यतः २५२१५ किंवा २५४०० चे लक्ष्य) हा मर्यादित वरचा दृष्टिकोन आहे आणि विस्तारित वरच्या दिशेने येण्याची शक्य ता उतरत्या रुंदीकरण वेज पॅटर्नमध्ये कशी परिपक्व होते यावर अवलंबून असेल, ज्यामध्ये सध्याचे व्यवहार बसवले जातात. दरम्यान, २०० दिवसांचा SMA २४००० पातळीच्या परिसरात आहे, ज्याचे इंटरमीडिएट सपोर्ट २४८०० आणि २४४५० पातळीवर दिसत आ हेत.'


यामुळे एकूणच बाजाराची स्थिती पाहता सावध गुंतवणूक फायदेशीर ठरू शकते.

Comments
Add Comment

Surya VHF : अमेरिकेच्या F 35 आणि चीनच्या J 20 विमानाचा वेध घेण्यास सक्षम असलेले भारताचे रडार

नवी दिल्ली : भारताने पहिल्या स्वदेशी सूर्या व्हीएचएफ (व्हेरी हाय फ्रिक्वेन्सी) रडारच्या क्षमतेत वाढ केली आहे. हे

'आदिवासींच्या जीवनात ३ वर्षांत आमुलाग्र परिवर्तन घडेल'

यवतमाळ : आदिवासी समाजाला विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी केंद्र शासनाने महत्वाच्या योजना हाती घेतल्या

मोदींचा मणिपूरमध्ये दीड तास रस्त्यावरुन प्रवास, मुसळधार पावसातून पीएमचा ताफा सभास्थळी

मणिपूर : कुकी आणि मैतेई समाजाच्या वांशिक हिंसेमुळे मणिपूरमध्ये काही काळ कायदा सुव्यवस्था बिघडली असल्याचे

२०३० पर्यंत पुनर्विकास प्रकल्प बदलणार मुंबईचे स्कायलाईन

उपनगरीय कॉरिडॉर ठरणार मुंबईच्या पुनर्विकास कहाणीचे प्रमुख केंद्र  मुंबईचा गृहनिर्माण बाजार मोठ्या बदलाच्या

राज्यात 'मुख्यमंत्री मत्स्यसंपदा योजना' सुरू होणार; मच्छीमारांना मिळणार दुहेरी लाभ!

मुंबई: महाराष्ट्रातील मच्छिमार बांधवांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. केंद्र सरकारच्या 'प्रधानमंत्री

Ask Private Limited व Hurun India अहवालातून गेमिंग कंपन्या बाहेर तर Zerodha नंबर १

मोहित सोमण: एएसके प्रायव्हेट लिमिटेड (Ask Private Limited) व हुरून इंडिया (Hurun India Limited) ने आपला पाचवा Ask Private Wealth Hurun India Unicorn and Future Unicorn 2025 अहवाल