मडगावहून अष्ट ज्योतिर्लिंगाची श्रावण विशेष यात्रा

मुंबई (प्रतिनिधी) : इंडियन रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन लिमिटेड ही भारत सरकारच्या रेल्वे मंत्रालयाच्या अंतर्गत 'नवरत्न' सूचीबद्ध कंपनी आहे. हे ऑनलाइन रेल्वे तिकीट बुकिंग, खानपान, पर्यटन, रेल्वे प्रवास आणि आदरातिथ्य सेवांसह विविध सेवा प्रदान करते. आयआरसीटीसीचा उद्देश भारतभर प्रवास अधिक सोयीस्कर, आनंददायक आणि त्रासमुक्त करणे हा आहे. आयआरसीटीसीच्या पश्चिम विभाग मुंबई कार्यालयाने ०५ ऑगस्ट २०२५ रोजी मडगाव येथून भारत गौरव पर्यटक ट्रेनद्वारे 'अष्ट ज्योतिर्लिंग श्रावण विशेष यात्रा' सुरू करण्याची घोषणा केली. आयआरसीटीसीच्या भारत गौरव टूर पॅकेजेसद्वारे या श्रावणात प्रवाशांना संस्मरणीय सुट्टीचा अनुभव घेता येईल.


पश्चिम विभागाचे ग्रुप जनरल मॅनेजर गौरव झा म्हणाले की, हे पॅकेज सर्वांना भारतातील प्रमुख ज्योतिर्लिंग व इतर लोकप्रिय पर्यटन स्थळांना भेट देण्याचा एक अनुकूल आणि सोयीस्कर मार्ग प्रदान करते, जे खिशाला परवडणारे तर आहेच पण त्याच बरोबर आरामदायी रेल्वे प्रवासाची सुद्धा हमी देते. ०५ ऑगस्ट २०२५ रोजी मडगावहून सुरू होणाऱ्या टूर पॅकेजची किंमत प्रति व्यक्ती अंदाजे २३,८८०/- रुपये पासून सुरू होते. तसेच हे पॅकेज सुविधा, आराम आणि खिशाला परवडणारे असावे या उद्देश्याने डिझाईन केले आहे, ज्यामुळे प्रवाशांना श्रावणात भारतातील उत्कृष्ट आणि लोकप्रिय स्थळांना एक्सप्लोर करण्याची संधी मिळते. या पॅकेजेससाठी पर्यटकांमध्ये बरीच उत्सुकता निर्माण झाली आहे. पॅकेज ऑनलाईन होताच आयआरसीटीसीचे नियमित ग्राहक, आयआरसीटीसीच्या www.irctctourism.com या संकेत स्थळावरून ऑनलाइन बुकिंग करू शकतात.


भारत गौरव गाड्यांमध्ये स्लीपर (नॉन-एसी), एसी श्री टियर आणि एसी टू टियर कोचचे मिश्रण असते. या गाड्यांच्या बाहेरील भागात लोकप्रिय भारतीय स्मारके, शिल्पे, खुणा आणि नृत्य प्रकार इत्यादींचे प्रदर्शन केले जाते. गाडीची एकूण क्षमता सुमारे ६००-७०० प्रवासी घेऊन जाण्याची आहे. गाडीमध्ये पब्लिक अनाउंसमेंट, सीसीटीव्ही कॅमेरे आणि ताजे जेवण तयार करण्यासाठी सुसज्ज पेंट्री कार बसवण्यात आली आहे.

Comments
Add Comment

भारतीय सेनेच्या ताफ्यात कामिकाझे ड्रोन

नवी दिल्ली : ऑपरेशन सिंदूरनंतर भारतीय सेना आपल्या लढाऊ क्षमतेत सातत्याने वाढ करत असून, त्याचाच भाग म्हणून सेनेने

प्रजासत्ताक दिनासाठी सुरक्षा यंत्रणा सज्ज

दहशतवादी हल्ल्याचे सावट नवी दिल्ली : प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर गुप्तचर यंत्रणांनी देशभरातील सुरक्षा

दिल्लीसह अनेक राज्यांत थंडीचा कहर

अनेक भागांत पावसाची शक्यता नई दिल्ली : दिल्ली-एनसीआरसह उत्तर भारतातील अनेक भागांमध्ये कडक थंडी आणि धुक्याचा

भारत ब्रिक्स २०२६ अध्यक्षपदासाठी सज्ज

नवी दिल्ली : जागतिक राजकारणात भारताचे वजन सातत्याने वाढत असून, २०२६ मध्ये भारत ‘ब्रिक्स’ या समूहाचे अध्यक्षपद

अमेरिकन डाळींवर ३०% टॅरिफ; अमेरिकन शेतकरी अस्वस्थ

ट्रम्प यांना अमेरिकी सिनेटरांचे पत्र नवी दिल्ली : अमेरिकेने भारतावर जड टॅरिफ लादले असले तरी भारतानेही अमेरिकन

संरक्षण अधिग्रहण परिषदेकडे ११४ राफेल खरेदीचा प्रस्ताव

लढाऊ विमानांच्या कमतरतेवर तोडगा नवी दिल्ली : फ्रान्सकडून आणखी राफेल लढाऊ विमाने खरेदी करण्याच्या दिशेने