कसारा लोकलवर दरड कोसळली

ठाणे  : मुंबईहून कसाऱ्याला येणारी लोकल रात्री ९ वाजताच्या दरम्यान कसारा रेल्वे स्थानकात येत असताना प्लॅटफॉर्मसाठी ट्रॅक बदलत असताना ट्रॅक लगत असलेल्या टेकडीवरील दरड लोकलवर कोसळली. यात दरवाजात उभ्या असलेल्या दोन प्रवाशांना गंभीर दुखापत झाली असून मोटरमनने सावधगिरीने लोकल कसारा स्थानकात आणली.


मंगळवारी रात्री ९च्या सुमारास मुंबईहून कसारासाठी येणारी लोकल प्लॅटफॉर्म नंबर चारवर येण्यासाठी ट्रॅक बदलत असताना अचानक लोकलवर दरड कोसळली. काही प्रमाणात दरड ही अर्ध्या लोकलमध्ये तर अर्धी दरड ट्रॅकलगत पडली. मातीचा मलबा, छोटे-मोठे दगड व छोटी झाड खाली आली.


या अचानक कोसळलेल्या दरडीमुळे दरवाजात उभे असलेले प्रवासी बाळू जाधव, रा. पंचशील नगर, तुकाराम जाधव रा. शिवाजी नगर कसारा हे गंभीर जखमी झाले. या दरडीमुळे गंभीर दुखापत झालेल्या जखमींना आपत्ती व्यवस्थापन टीम कसाराचे सदस्य प्रमोद वारंगुसे यांनी लोकलमधील सहप्रवाशांच्या मदतीने कसारा रेल्वे स्थानकात उपचारासाठी उतरवले.


दरड पडलेल्या घटनेची माहिती रेल्वेच्या आपत्कालीन नियंत्रण कक्षाला मिळाल्यानंतर त्यांनी घटनास्थळी रेल्वे ट्रॅकवर आलेले दरडीचे दगड बाजूला केले व ९ वाजून २१ मिनिटांनी मुंबईकडे लोकल रवाना  केली.

Comments
Add Comment

निवडणुकीच्या धामधुमीत जळगावात गोळीबार!

निवडणुकीशी संबंध नसल्याचे पोलिसांचे स्पष्टीकरण जळगाव : जळगाव शहरातील पिंप्राळा परिसरात असलेल्या आनंद मंगल

मुंबईत काही अपवाद वगळता शांततेत मतदान

तब्बल १ हजार ७०० उमेदवारांचे भवितव्य आज ठरणार मुंबई : मुंबई महापालिकेच्या २२७ जागांसाठी झालेल्या निवडणुकीच्या

संजय गांधी उद्यानात तीन छाव्यांचे आगमन

कांदिवली: बोरिवली पूर्व येथील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात केंद्रीय प्राणी संग्रहालय प्राधिकरण, नवी दिल्ली

मुंबईत पश्चिम रेल्वेचा मेगा ब्लॉक

मुंबई : कांदिवली आणि बोरिवली विभागादरम्यान सहाव्या मार्गाचे बांधकाम पूर्ण करण्यासाठी पश्चिम रेल्वे २०/२१

पनवेल–कळंबोली दरम्यान पॉवर ब्लॉक

पनवेल : डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉर कॉर्पोरेशन (डीएफसीसी) प्रकल्पाच्या अनुषंगाने, किमी ६३/१८ ते ६३/२४ दरम्यान ११०

बायोकॉन हेल्थकेअर कंपनीकडून ४१५० कोटीची QIP निधी उभारणी

मोहित सोमण: बायोकॉन या जागतिक दर्जाच्या हेल्थकेअर कंपनीने ४१५० रूपयांची गुंतवणूक इक्विटी क्यूआयपी (Qualified Institutional