KIOCL Share Surge: KIOCL सकाळी कंपनीच्या कामगिरीत घसरण असतानाही ९.५० टक्क्याने शेअर उसळला 'या' कारणामुळे!

  57

प्रतिनिधी:केआयओएसएल (Kudremukh Iron Ore Company Limited) या सरकारी कंपनीचे शेअर्स ९.५०% पेक्षा अधिक पातळीवर उसळले आहेत. सकाळी १२.३० वाजेपर्यंत कंपनीच्या शेअर्समध्ये ८.७२% वाढ झाली आहे. बंगलोर स्थित सरकारी उप क्रम कंपनी (Public Sector Undertaking) कंपनीच्या निव्वळ विक्रीत इयर ऑन इयर बेसिसवर (YoY) डिसेंबर २४ मधील १८०.५४ कोटींच्या तुलनेत वाढ होत मार्च २०२५ पर्यंत २३७.७१ कोटींवर वाढ झाली होती. कंपनीच्या ऑपरेटिंग कमाईत (Operating Income) मध्ये डिसेंबर २४ मधील १८०.५५ कोटींच्या तुलनेत २४६.४६ कोटींवर वाढ झाली आहे. खरं तर कंपनीच्या कर्मचाऱ्यावरील खर्चात डिसेंबर २४ मधील ३८.३१ कोटींवरुन वाढ होत ३९.३१ कोटींवर वाढ झाली आहे.


तसेच कंपनीच्या ऑपरेटिंग नफ्यात (Operating Profit) मध्येही मार्च २०२४ मधील ४३.३७ कोटींवरुन मार्च २०२४ मधील ४०.८१ कोटींवर घसरण झाली आहे. कंपनीला मार्च २०२४ मधील ४७.७९ कोटीचे नुकसान करोत्तर नफ्यात (PAT) झाले होते ते सावरत ३ ६.८६ कोटींवर घसरले.


कंपनीच्या निव्वळ नफ्यात मार्च २०२४ मध्ये डिसेंबर २४ तुलनेत १४.१०% वाढ झाली आहे. त्या आधीच्या वर्षी कंपनीला निव्वळ नफ्यात १५२ टक्क्याने नुकसान झाले होते. असे असतानाही कंपनीने गेल्या आठवड्याभरात प्रति शेअरने ६.६९% परतावा (Return) दिला आहे. कंपनी वर्षभरात संमिश्र प्रतिसाद दाखवला आहे. या कारणांमुळे गुंतवणूकदारांनी भविष्याच्या दृष्टीने समभागाला कौल दिला आहे. कंपनीच्या (KIOCL) विविध कालावधीतील कामगिरीवरून संमिश्र चित्र दिसून येते. या शेअरने वर्षभर आव्हानांचा साम ना केला आहे आणि त्याचा परतावा -२२.०३% आहे म्हणजेच कामगिरीत घट झाली होती.


परंतु गेल्या तीन आणि पाच वर्षांत त्याने अनुक्रमे ५६.७% आणि २१३.६३% परतावा देऊन सेन्सेक्सपेक्षा चांगली कामगिरी केली आहे. त्यामुळे ही कामगिरी बाजारातील चढ उताराच्या वातावरणात कंपनीची लवचिकता आणि अनुकूलता अधोरेखित करते' असे त ज्ञांनी यावर म्हटले आहे. १२.४५ पर्यंत कंपनीच्या शेअर्समध्ये ९% उसळी घेतली आहे. केआयओसीएल लिमिटेड, पूर्वाश्रमीच्या कुद्रेमुख आयर्न ओर कंपनी लिमिटेड, भारत सरकारच्या स्टील मंत्रालयाच्या अंतर्गत एक सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम आहे. ती प्रामु ख्याने लोहखनिज खाणकाम, लाभीकरण आणि आयर्न ऑक्साईड पेलेट्सच्या उत्पादना त कार्यरत आहे. कंपनीकडे पिग आयर्न उत्पादनासाठी ब्लास्ट फर्नेस युनिट देखील आहे.

Comments
Add Comment

बैलपोळाच्या दिवशी नदीमध्ये वाहून गेलेल्या युवकाचा मृतदेह गवसला

अकोला: मूर्तिजापूर तालुक्यातील एक युवक बैलपोळा सणाच्या दिवशी बैलांना धुण्यासाठी पेढी नदीवर गेला असता, अचानक पाय

ढोल-ताशांच्या गजरात गणेशमूर्तींचे आगमन

मुंबई : गणेशोत्सवाला अवघे काही दिवस उरले असून मुंबईतील अनेक गणेश मंडळांनी मूर्ती मंडपात नेण्यास सुरुवात केली

छत्रपती संभाजीनगरला २४x७ शाश्वत पाणीपुरवठ्याचा मार्ग मोकळा; २६ द.ल.ली. जलशुद्धीकरण केंद्राचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन

छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगर शहर पाणीपुरवठा योजनेच्या माध्यमातून पुढील २५-३० वर्षे शहराच्या अपेक्षित

महाराष्ट्रात गणेशोत्सवाला राज्य महोत्सवाचा मान; घरबसल्या दर्शनासाठी विशेष पोर्टल सुरू

मुंबई : सार्वजनिक गणेशोत्सव, घरगुती गणेशोत्सव, महाराष्ट्रातील गणेशोत्सवाला आता राज्याने प्रथमच महाराष्ट्र

Ajit Pawar: मतचोरीच्या आरोपांवर अजितदादांचा जोरदार हल्लाबोल, म्हणाले "फेक नरेटीव्ह...

मुंबई: काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी मतदानावरून निवडणूक आयोगावर गंभीर आरोप केले,  त्यानंतर देशभरात वातावरण

महाराष्ट्रातील १ कोटी बहीणींना लखपती दीदी करणार

मुंबई : लखपती दीदींसाठी देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रयत्नशील आहेत. त्यांच्याच नेतृत्वाखाली महाराष्ट्रात