"खाकी"चे खिसे भरताना महापालिकेची तिजोरी रिकामीच

 मुख्यालयात २० हजार पर्यटकांच्या भेटी


मुंबई : मुंबईतील पुरातन वारसा इमारतींमध्ये महापालिका मुख्यालयाचाही समावेश असून या इमारतींचे सौदर्य पहाण्यासाठी देशविदेशातील पर्यटक छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस परिसरात भेट देत असतात. त्यामुळे या इमारतींचे सौदर्य पाहता यावे यासाठी महापालिका मुख्यालय इमारत पर्यटकांसाठी खुले करून देण्यात आले असून मुंबई महानगरपालिका आणि महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ आणि खाकी टूर्स प्रा. लि. यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या या सहलींमध्ये ४ वर्षांत २० हजार पर्यटकांनी भेटी दिल्याचा दावा प्रशासनाने केला आहे. परंतु चार वर्षांत खाकी टुर्सचे खिसे भरले जात असले तरी महापालिकेच्या तिजोरत मात्र एकही पैसा जमा झालेला दिसून येत नाही. महापालिकेला यातून कधी महसूल मिळणार असा सवाल उपस्थित केला जात आहे.


याबाबत महापालिका, एमटीडीसी आणि खाकी संस्थेबरोबर करार झाला असला तरी यासाठी आकारल्या जाणाऱ्या ३५० रुपयांच्या शुल्कांपैकी एकही पैसा महापालिकेच्या तिजोरीत जमा झालेला नाही. राज्यात ठाकरे असताना तत्कालिन पर्यटन मंत्र्यांच्या पुढाकाराने मुख्यालयात हेरिटेज वॉक सुरु करण्यात आले असून यामाध्यमातून खाकी टुर्सला दरवाजे खुले करून दिले गेले. त्यामुळे आधीच महापालिकेच्या वाट्याचा एकही पैसा जमा झालेला नाही. त्यात जी २० शिखर परिषदेतील पाहुण्यांसाठी खाकी टुर्स मार्फत हेरिटेज वॉकचे आयोजन करण्यात आले होते. त्यामुळे पर्यटकांना आकारण्यात येणाऱ्या शुल्काची रक्कम महापालिकेने ७८ हजार ७५० रुपयंची रक्कम कंपनीला मोजली होती. त्यामुळे महापालिका मुख्यालयातील हेरिटेज वॉकच्या माध्यमातून खाकी टुर्सची तिजोरी भरली जात असली तरी महापालिकेची तिजोरीत एकही पैसा जमा होत नाही. त्यामुळे किमान ३५० रुपयांच्या शुल्कापैंकी किमान १०० ते १५० रुपये एवढी रक्कम तरी महापालिकेला मिळायला हवी. परंतु यासाठी महापालिका प्रशासन कुणीही पुढाकार घेत करारामध्ये सुधारणा करत नसल्याने मुख्यालय इमारतीच्या हेरिटेज वॉकच्या माध्यमातून महापालिकेच्या तिजोरीत काहीही महसूल जमा होत नसल्याचे दिसून येत आहे.



हेरिटेज वॉकमधून महापालिकेला कधी मिळणार महसूल


मुंबई महानगरपालिका मुख्यालयाची ऐतिहासिक वास्तू नागरिकांना तसेच पर्यटकांना पाहता यावी, यासाठी मुंबई महानगरपालिका आणि महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ (एमटीडीसी) आणि खाकी टूर्स प्रा. लि. यांच्या संयुक्त विद्यमाने दर शनिवारी, रविवारी बृहन्मुंबई महानगरपालिका मुख्यालय पुरातन वारसा दर्शन सहलीचे आयोजन केले जाते. जानेवारी २०२१ ते जुलै २०२५ या साडेचार वर्षांत मुंबईकर तसेच देश-विदेशातील मिळून सुमारे २० हजार पर्यटकांनी महानगरपालिका मुख्यालयाच्या ऐतिहासिक वास्तूची सहल केली आहे. यांच्या संयुक्त विद्यमाने दर शनिवार-रविवारी मिळून एकूण ६ सहली आयोजित केल्या जातात. रविवार, २० जुलै २०२५ रोजी, या टूरने आपल्या २०,०००व्या पर्यटकाचे स्वागत केले. या सहलीत मुंबईच्या विकासगाथा, महानगरपालिकेच्या समृद्ध इतिहासाचा आणि या भव्य इमारतीच्या वास्तुशिल्पाची माहिती दिली जाते. ही सहल करू इच्छिणाऱ्यांना bookmyshow.com या संकेतस्थळावरून रुपये ३५० शुल्क भरून नोंदणी करता येते.


Comments
Add Comment

Railway News : मोठी बातमी! तत्काळ तिकीट बुकिंगसाठी आता 'ओटीपी' बंधनकारक; रेल्वेचा नवीन नियम काय?

मुंबई : रेल्वे प्रवाशांना तत्काळ तिकीट बुकिंगमध्ये सुरक्षितता आणि पारदर्शकता मिळावी, यासाठी भारतीय रेल्वेने एक

मुंबईतील सर्वाधिक खोल शहरी बोगद्याचे काम सुरू

‘ऑरेंज गेट टनेल’ जून २०२८ पर्यंत पूर्ण करणार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ग्वाही; ७०० इमारतींच्या खालून

महापरिनिर्वाण दिनानिमित्त मुंबईत बेस्ट पुरवणार 'बेस्ट सेवा'

मुंबई (प्रतिनिधी) : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६९ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्ताने चैत्यभूमीवर डॉ.

'नीट पीजी'च्या पहिल्या फेरीचा निकाल जाहीर

मुंबई : वैद्यकीय पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमाची अर्थात 'नीट पीजी'च्या पहिल्या फेरीचा निकाल जाहीर झाला आहे. या

मुंबईतल्या दुबार मतदारांचा फुगा फुटणार

मुंबई (विशेष प्रतिनिधी) - दुबार मतदारांचा फुगा आता फुटला जाणार असून महापालिकेच्या पहिल्या प्रयोगातच हा फुगा

म्हाडा सेस इमारती आणि भाडेकरुंसह दुकानांनी अडवला हँकॉक पुलाचा मार्ग

मुंबई (विशेष प्रतिनिधी) - मध्य रेल्वेच्या भायखळा आणि सँडहर्स्ट रोड रेल्वे स्थानकादरम्यान असलेल्या हँकॉक पुलाची