कालच्या रॅलीनंतर आजही बँक निर्देशांक मोठी कामगिरी बजावेल का हे अखेरच्या सत्रात कळेल मात्र क्षेत्रीय निर्देशांकात कंपनी विशेष कामगिरीही तितकीच पूरक ठरू शकते. आंतरराष्ट्रीय बाजारातील स्थिती पाहता युएस फेड व्याजदरात कपात होईल का हे अजूनही गुलदस्त्यातच आहे त्यामुळे सप्टेंबरमध्ये कपात होणार हे अजूनही स्पष्ट नाही. यामुळे युएस बाजार बंद होताना संमिश्र प्रतिसाद कायम राहिला.
फेडचे अध्यक्ष जेरोम पॉवेल यांच्यावर लोकप्रतिनिधी ॲना लुना यांनी गंभीर आरोप केले आहेत. युएस जनतेला व सभागृहाला कर (Tax) संबंधी दिशाभूल केली आहे असा आरोप केला त्यामुळे शेअर बाजारही ढवळून निघाले. काल युएस बाजारात मात्र क्षेत्रीय निर्देशांकात संमिश्र प्रतिसाद असूनही निर्देशांकात वाढ झाली. डाऊ जोन्स (०.१९%), एस अँड पी ५०० (०.१४%), नासडाक (०.३८%) वाढले आहे. युरोपियन बाजारातील परवा घसरणीचा कौल वाढीकडे पलटला आहे. त्यामुळे एमटीएसई (०.२३%), डीएएक्स (०.०८%) वाढत सीएसी बाजार मात्र (०.३१%) घसरले आहे.
आशियाई बाजारातील सुरूवातीच्या कलात गिफ्ट निफ्टी (०.३९%) स़ोबत निकेयी (०.१८%), तैवान वेटेड (०.३०%), जकार्ता कंपोझिट (०.५९%) बाजारात वाढ झाली आहे. हेंगसेंग (०.२५%), स्ट्रेट टाईम्स (०.१३%), कोसपी (०.५१%) बाजारात घसरण होत आहे.
काल सोन्याच्या दरात चौथ्यांदा वाढ झाल्याने बाजारात सोन्याचे दर उच्चतम पातळीवर आहेत. अस्थिरतेत सोन्यात गुंतवणूकीला प्राधान्य मिळाल्याने मागणीत वाढ झाली होती. कच्च्या तेलाच्या निर्देशांकातही अजूनही नेमकी स्पष्टता दिसली नाही. मात्र रशिया युरोप यांच्यातील तेलाचा तिढा न सुटल्यास व मध्यपूर्वेतील परिस्थिती चिघळल्यास मात्र वाढीची शक्यता आहे. मात्र ओपेक राष्ट्रांकडूनही तेल उत्पादन पुरवठा वाढल्यास दर नियंत्रणात येऊ शकतात.
विशेषतः गुंतवणूकदारांना कंज्यूमर ड्युरेबल्स, उत्पादन घेणारे समभाग, आयटी, बँक, फार्मा, तेल व गॅस या क्षेत्रातील घडामोडीवर लक्ष केंद्रित करणे फायद्याचे ठरू शकेल. या तिमाहीतील संमिश्र प्रतिसादाचा फटकाही मागील आठवड्यात बाजारात बसला. युएस टेरिफ दर वाढीच्या अनिश्चितेचा फटकाही मागील आठवड्यात परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदार (FII), घरगुती गुंतवणूकदार (Domestic Institutional Investors DII) यांच्याकडून बसला.
सकाळच्या सत्रात सर्वाधिक वाढ इटर्नल (Zomato) (१०.४७%), स्विगी (४.८५%), इन्फोऐज इंडिया (४.२९%), एंजल वन (३.९५%),दालमिया भारत (३.०४%), हिताची एनर्जी (३.०१%), पीएनबी हाउसिंग (२.७१%), वन ९७ (२.६६%), जेपी पॉवर वेचंर (२.०६%), बीएसई (१.०५%), क्लीन सायन्स (१.४७%), इंजिनियर्स इंजिनियर्स इंडिया (१.५४%), नुवामा वेल्थ (१.४६%), डेटा पँटर्न (१.०४%), मस्टेक (१.१७%), अंबुजा सिमेंट (०.६८%), एचडीएफसी बँक (०.४६%), श्री सिमेंट (०.९४%), हिंदुस्थान एरोनॉटिक्स (०.८३%), आयसीआयसीआय बँक (०.६६%), टीसीएस (०.१०%) समभागात झाली.
सकाळच्या सत्रात सर्वाधिक घसरण ३६० वन (५.७५%), आरती इंडस्ट्रीज (३.२४%), एयु स्मॉल फायनान्स (२.६४%), पिरामल फार्मा (२.३५%), एल अँड टी फायनान्स (२.०८%), सुप्रीम इंडस्ट्रीज (१.९३%), कॅनरा बँक (१.८१%), व्होल्टास (१.६६%), टाटा मोटर्स (१.३५%), श्रीराम फायनान्स (१.३५%), ओबेरॉय रिअल्टी (१.२५%), अनंत राज (१.२४%), सिप्ला (१.१९%), सारेगामा इंडिया (१.०८%), बंधन बँक (०.८७%), भारत फोर्ज (०.७४%), कोफोर्ज (०.७१%), रिलायन्स इंडस्ट्रीज (०.४३%) समभागात घसरण झाली आहे.
यामुळेच आजही बाजारातील आशा पल्लवित झाल्या असून यामध्ये अखेरच्या सत्राअंती सपोर्ट लेवल राखण्यासाठी बँक निर्देशांकातील हालचाल व परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांची बाजारातील अपेक्षित वाढीव गुंतवणूक यावरून उर्वरित बाजाराची रूपरेखा अवलंबून असेल असा कयास आहे.