Kolhapuri Chappal : साडी असो की कुर्ती, कोल्हापुरी चप्पलचा रुबाबचं जगात लय भारी

कोल्हापुरी चप्पल... आवाज करकरीत, पायात घातली की काय तो रूबाब... तिचा बाजंच न्यारा, तिची भुरळ पडली नाही असा एकही भारतीय माणूस सापडणार नाही. ती पायात घातली तर रूबाब वाढवणारी अन् हातात घेतली तरी दुसऱ्यांचा रूबाब उतरवणारी...


बदलत्या फॅशनच्या युगात अजूनही सगळ्यांना कोल्हापुरी चप्पल परिधान करायला खूप आवडते. नवनवीन फॅशन आणि बदलत्या ट्रेंडमुळे महिला दररोज त्यांच्या लूकमध्ये भर घालत असतात. त्यात ट्रेंडी आउटफिट्स असो किंवा स्टायलिश सॅण्डल असो. शोभतील असेच आउटफिट्स त्या निवडतात. साडी असो किंवा कुर्ती प्रत्येक फॅशनवर कोल्हापुरी साज नेहमीच शोभून दिसतो. ही शैली अनेक वर्षांपासून महिलांच्या मनावर राज्य करत आहे. बाजारात कोल्हापूरी चप्पलचे बरेच पॅटर्न्स पाहायला मिळतात. अगदी लेस वर्क पासून ते हाय हिल्समध्ये कोल्हापूरच्या डिझाइन्स पाहायला मिळतात. मात्र, महिला या संभ्रममध्ये असतात की, आपल्या आऊटफिटवर नक्की कोणती कोल्हापुरी सूट होईल. पण तुम्ही टेन्शन घेऊ नका या लेखातून तुम्हाला मदत होईल. आज आम्ही तुम्हाला या लेखातून सांगणार आहोत नऊवारी साडी किंवा ट्रेडिशनल कुर्त्यावर शोभून दिसतील अशा काही आकर्षक कोल्हापुरी चप्पलच्या डिझाइन्स ज्या पारंपरिक, एथनिक आणि क्लासी लुक्स देतील .




नऊवारी साडी



नऊवारी साडीवर हमखासपणे तुम्ही चॉकलेटी रंगाची कोल्हापुरी चप्पल परिधान करू शकता पायाला होणार नाही इजा. आणि नऊवारीसोबत तुमच्या पायाचं सौंदर्यदेखील वाढवेल.




कुर्ती



फॅन्सी स्टाईल सॅण्डल घालायला आवडत असतील तर आता बाजारात ज्वेलरी स्टाइल कोल्हापुरी चप्पल पाहायला मिळतात तुम्ही याची निवड नक्की करू शकता. कुर्ती साधी असेल तर ही सॅण्डल शोभून दिसेल.




बोहो लूक



जीन्स, कुर्ती किंवा बोहो लूक हवा असेल तर तुम्ही या पॅर्टनच्या कोल्हापुरी चप्पलची निवड करू शकता. सिल्वर किंवा गोल्डन रंगात उपलब्ध असलेल्या चप्पल बाजारात सहज उपलब्ध होतात.



शॉर्ट कुर्ती



बहुतेक कोल्हापुरी चप्पल हाताने बनवल्या जातात. नैसर्गिक रंगांचा वापर करून तयार केलेल्या कोल्हापुरी चप्पल पायांमध्ये अतिशय आकर्षक आणि उठावदार दिसतात. शॉर्ट कुर्ती पण अशी कोल्हापुरी परिधान केलात तर अतिशय आकर्षक लूक दिसेल.



लेस वर्क



लेस वर्क किंवा वेगवेगळ्या पद्धतीने घुंगरू लावून बनवलेली चप्पल ड्रेसवर अतिशय सुंदर दिसते. कोणत्याही पार्टी किंवा कार्यक्रमात तुम्ही या डिझाईन्सच्या चप्पल घालू शकता.



सलवार सूट



फुलांनी सजलेली कोल्हापुरी चप्पल या प्रकारची डिझाइन खूप स्टायलिश आणि अनोखी असते. सलवार सूटसोबत अशी चप्पल तुम्ही परिधान करू शकता. सलवार सूटवर ही कोल्हापुरी तुमच्या पायांचे सौंदर्य वाढवेल.




कोल्हापुरी हिल्स



नऊवारी किंवा सहावारी या दोन्ही साड्यांवर तुम्हाला कोल्हापुरीमध्ये हिल चप्पल हवी असेल तर तेसुद्धा बाजारात उपलब्ध आहे. कोल्हापुरी हिल्स पायांमध्ये अतिशय सुंदर दिसते.

Comments
Add Comment

Rohit Sharma...२०२३ वर्ल्ड कपचा पराभव जिव्हारी लागला; क्रिकेट कायमचा सोडण्याचा विचार केला होता

मुंबई : भारताचा माजी कर्णधार रोहित शर्मा याने २०२३ च्या वनडे वर्ल्ड कप फायनलमधील पराभवाबाबत मनमोकळं वक्तव्य

वांद्रे पश्चिम रेल्वे स्थानक परिसरातील वाहतूक कोंडी फुटणार

एमएमआरडीए उभारणार नवा पादचारी पूल मुंबई  : वांद्रे पश्चिम रेल्वे स्थानक आणि लकी हॉटेल जंक्शन परिसरातील तीव्र

मढ-वर्सोवा केबल पूल लवकरच सुरू होणार

मुंबई : मुंबईतील रस्ते वाहतुकीवरचा ताण कमी करण्यासाठी आणि पश्चिम उपनगरातील प्रवाशांचा प्रवास सुखकर करण्यासाठी

माजी अग्निवीरांना सीमा सुरक्षा दलातील भरतीत ५० टक्के कोटा

मोदी सरकारचा मोठा निर्णय नवी दिल्ली : माजी अग्निवीरांना आता सीमा सुरक्षा दलात (बीएसएफ) ५० टक्के कोटा निश्चित

काँग्रेसने भाजपची बी-टीम म्हणून काम केले!

आमदार रोहित पवार यांचा गंभीर आरोप मुंबई : नगर परिषद आणि नगरपंचायतींच्या निवडणुकीत काँग्रेसने भाजपची बी-टीम

बांगलादेशमध्ये हिंसाचाराचा कहर; नेत्याचं घर पेटवलं, ७ वर्षांच्या मुलीचा मृत्यू

ढाका : बांगलादेश पुन्हा एकदा हिंसाचाराच्या आगीत सापडला असून लक्ष्मीपूर सादर उपजिल्ह्यातील एक हृदयद्रावक घटना