Stock Market: नव्या आठवड्याची सुरुवात ' येरे माझ्या मागल्या ' सेन्सेक्स व निफ्टीत घसरण VIX पातळी १.५१% जाणून घ्या आगामी बाजारातील हालचालींचे विस्तृत विश्लेषण

  62

मोहित सोमण : सकाळी शेअर बाजारात घसरण झाली आहे. सेन्सेक्स निर्देशांकात (०.१३%) घसरण झाली असून निफ्टी ५० निर्देशांकात ०.२९% टक्क्याने घसरण झाली आहे. सेन्सेक्स बँक निर्देशांकात मात्र ०.२१% वाढ झाली असून बँक निफ्टीत ०.०३% वाढ झाली आहे. सेन्सेक्स मिडकॅप व स्मॉलकॅपमध्ये अनुक्रमे ०.२४%,०.५५% घसरण झाली आहे. निफ्टी मिडकॅप व स्मॉलकॅपमध्ये अनुक्रमे ०.२०%०.३१% घसरण झाली आहे.


निफ्टी क्षेत्रीय निर्देशांकात (Nifty Sectoral Indices) यामध्ये बँक (०.०६%), मेटल (०.६२%), फायनांशियल सर्व्हिसेस २५/५० (०.१४%) वगळता इतर क्षेत्रीय निर्देशांकात घसरण झाली आहे. सर्वाधिक घसरण तेल व गॅस (१.०८%), आयटी (०.७१%), मिडिया (०.४०%), फार्मा (०.४८%), हेल्थकेअर (०.४६%), ऑटो (०.५८%) समभागात झाली आहे. विशेषतः आज सकाळच्या सुरुवातीच्या कलात अस्थिरता निर्देशांक (VIX Volatility Index VIX) १.५१% वाढ झाल्याने आज मोठ्या अस्थिरतेची शक्यता आहे.


सकाळच्या सत्रात गिफ्ट निफ्टीने सुमार केली होतीगिफ्ट निफ्टी ०.११% घसरण झाल्याने बाजारात आजही घसरणीकडे कौल गुंतवणूकदार देऊ शकतात. गेल्या आठवड्याची परिस्थिती बाजारासाठी निराशाजनक होती. आठवडाभरात इक्विटी बेंचमार्क निर्देशांकाने सुमार कामगिरी केली. जागतिक अस्थिरतेचा फटका बाजारात बसल्याने भारतीय अर्थव्यवस्थेची बलस्थाने कामी आली असली तरी निर्देशांक हिरव्या रंगात बंद ठेवायला मात्र असफल ठरली आहेत. प्रामुख्याने सेन्सेक्स आठवडाभरात जवळपास १% घसरला होता निफ्टी ०.४१% घसरला आहे. ही बाजारातील धोक्याची घंटा आहे. भारतीय गुंतवणूकदारांचा वाढता पाठिंबा नुकसान पातळी शोषून घेऊ शकतो.


संपूर्ण आठवड्यात रिअल्टी समभागात (Stocks) मध्ये सर्वाधिक नुकसान झाले आहे. प्रामुख्याने घसरण चाललेली घरांची मागणी, बाजारातील मंदी या कारणांमुळे रिअल्टी समभागात घसरण झाली. याशिवाय आयटी, फायनांशियल क्षेत्रीय समभागांनी चांगली कामगिरी केली नाही ज्याचा नकारात्मक परिणाम बाजारावर सातत्याने झाला. बाजारातील तज्ञांच्या मते, हा आठवड्यातही अस्थिरता कायम राहू शकते. जागतिक वातावरणातील घडामोडींचा प्रभाव गेल्या आठवड्याप्रमाणे या आठवड्यातही राहू शकतो परिणामी समभागात मोठी चढउतार अपेक्षित आहे.


आजच्या बाजारातील परिस्थितीकडे बघता, आगामी तिमाही निकाल आणि युएस टेरिफच्या संबंधित नव्या घडामोडी, युरोप अमेरिका ट्रेड डील संबंधित नव्या हालचाली, जपान बाजारातील सत्तेची स्थित्यंतरे, बँक ऑफ जपानने केलेली व्याजदरात कपात, भारतीय बाजारातपेठेतील घटते बँकेचे तिमाही निकाल,आशियाई बाजारातील एमएससीआय (MSCI) निर्देशांकात घसरण या सगळ्या पार्श्वभूमीवर बाजारातील हालचाल अपेक्षित आहे. प्रामुख्याने भारतीय शेअर बाजारात ' कंसोलिडेशन ' फेज कायम राहील असा अंदाज बाजार तज्ञांनी व्यक्त केला आहे. याशिवाय रशियन तेलावर युरोपियन युनियनने लावलेल्या प्रतिबंधांमुळे मध्यपूर्वेतील तेलाचे दर काय राहतील, त्यांच्या तेलाला किती मागणी राहिल अशा मुद्यावरही कच्च्या तेलाचे दर नियंत्रित होऊ शकतात.


युएस बाजारातील डाऊ जोन्स (०.०८%), नासडाक (०.०५%) आहे बाजारात वाढ झाली होती मात्र एस अँड पी ५०० (०.०१%) घसरण झाली. युरोपियन बाजारात डीएएक्स (०.३४%) वगळता एफटीएसई (०.२२%), सीएसी (०.०१%) समभागात वाढ झाली. आशियाई बाजारातील स्ट्रेट टाईम्स (०.६४%), हेंगसेंग (०.६४%), कोसपी (०.४७%), जकार्ता कंपोझिट (०.०५%), शांघाई कंपोझिट (०.४७%) बाजारात वाढ झाली, घसरण तैवान वेटेड (०.३४%) बाजारात झाली होती.


आज अल्ट्राटेक सिमेंट, आयडीबीआय बँक, इंटर्नल (Zomato), ओबेरॉय रिअल्टी, डॉ रेड्डीज यांसारख्या कंपन्यांचे निकाल अपेक्षित आहेत. अ‍ॅक्सिस बँक, आयसीआयसीआय बँक, एचडीएफसी बँक, रिलायन्स इंडस्ट्रीज यासारखे समभाग (Stocks) आज चर्चेत राहू शकतात. आज एफ अँड ओ (Future and Options) साठी बंधन बँक, आरबीएल बँक, हिंदुस्थान कॉपर, एंजल वन‌ या शेअर्सवर प्रतिबंध असून त्याऐवजी आदित्य बिर्ला फॅशन, ग्लेनमार्क, टिटाघर रेल्वे सिस्टीम लिमिटेड, पतांजली या समभागांची एन्ट्री होऊ शकते.


जागतिक सोन्याच्या गोल्ड फ्युचर निर्देशांकात सकाळी (०.०७% वाढ झाली आहे. शुक्रवारी शनिवारी किंमतीने १ लाखांचा आकडा पार केला होता. अस्थिरतेच्या तोंडावर सोन्याच्या गुंतवणूकीत वाढ झाल्याने तसेच मागणीपेक्षा पुरवण्यात घट झाल्याने, डॉलरमध्ये वाढत असलेले मूल्यांकन, ईपीएफ मधील वाढलेली गुंतवणूक या कारणांमुळे सोने सातत्याने वधारत आहे. कच्च्या तेलाच्या किंमतीत आगामी दिशा ओपेकने ठरवलेल्या उत्पादनांच्या धर्तीवर होऊ शकते.


मागील आठवड्यातील स्थितीवर भाष्य करताना जिओजित इन्व्हेसमेंट लिमिटेडचे हेड ऑफ रिसर्च विनोद नायर म्हणाले की ,'वित्त आणि आयटी क्षेत्रातील निराशाजनक सुरुवातीच्या कमाई दरम्यान राष्ट्रीय बाजारात व्यापक विक्री दिसून आली. लार्ज-कॅप समभागांमधील वाढलेले मूल्यांकन आणि एफआयआयच्या महत्त्वपूर्ण निव्वळ शॉर्ट पोझिशन्समुळे गुंतवणूकदारांमध्ये सावधगिरीची भावना निर्माण झाली आहे. शिवाय, रशियासोबतच्या व्यापार संबंधांवर अतिरिक्त टॅरिफ धोके देखील भारतावर सावली टाकत आहेत. या दबावांना न जुमानता, भारतासाठी मध्यम ते दीर्घकालीन दृष्टीकोन आशावादी आहे, कमी चलनवाढ पातळी आणि आर्थिक वाढ टिकवून ठेवण्यासाठी वचनबद्ध सक्रिय चलन प्राधिकरणामुळे (Monetary Authority) आहे.'


सकाळच्या सत्रात सर्वाधिक वाढ मस्टेक (३.४२%), रेमंड (३.३%), सोना बीएलडब्लू (३.२८%), पुनावाला फायनान्स (२%), एसईएमई सोलार (१.७७%), बीएसई (१.७८%), अंबुजा सिमेंट (१.६५%), एंजल वन (१.५२%), टाटा स्टील (१.४१%), आयसीआयसीआय बँक (१.२४%), विशाल मेगामार्ट (१.०९%), एचडीएफसी बँक (१.२१%), वेदांता (१.०८%), कजारिया सिरॅमिक्स (१.०४%), उषा मार्टिन (१.०२%), जिंदाल स्टील (१.०%), साई लाईफ (१%), डिक्सन टेक्नॉलॉजी (०.९८%), आयसीआयसीआय लोंबार्ड (०.५३%), हवेल्स इंडिया (०.५५%), टाटा केमिकल्स (०.३२%), आयसीआयसीआय प्रोड्यूंशिअल (०.७७%), अल्ट्राटेक सिमेंट (०.५९%), इंडियन हॉटेल्स (०.३६%), हिंदाल्को (०.९०%), इटर्नल (०.७०%), अदानी एंटरप्राईजेस (०.४३%) समभागात वाढ झाली.


सकाळच्या सत्रात सर्वाधिक घसरण एमआरपीएल (७.५१%), सीएट (७.२६%), न्यूजेन सॉफ्टवेअर (४.०१%), डेटा पँटर्न (४.१८%), इंडसइंड बँक (३.४१%), इंडिया सिमेंट (३.१३%), आरबीएल बँक (३.०३%), क्लीन सायन्स (२.७१%), किर्लोस्कर ब्रदर्स (२.६६%), सफायर फूडस (२.०७%), अलोक इंडस्ट्रीज (२.५९%), रिलायन्स इंडस्ट्रीज (२.४७%),जेके टायर इंडस्ट्रीज (२.४४%), नेटवर्क १८ मीडिया (२.३७%), टाटा पॉवर (२.४४%), विप्रो (२.१५%), जेपी पॉवर वेचंर (१.९७%), जेएम फायनांशियल (१.९६%), बंधन बँक (१.८४%), एक्सिस बँक (१.५९%), टाटा कंज्यूमर (१.४७%), सारेगामा इंडिया (१.१६%), गोदरेज इंडस्ट्रीज (०.९%), आदित्य बिर्ला फॅशन (०.९५%), टेक महिंद्रा (०.७७%), ओएनजीसी (०.५८%), अदानी पोर्टस (०.३२%), भारती एअरटेल (०.०४%), कॅनरा बँक (१.४२%), रिलायन्स इंडस्ट्रीज (२.४९%), बँक ऑफ बडोदा (०.९९%), मदर्सन (०.७२%), ब्रिटानिया इंडस्ट्रीज (०.४४%) समभागात झाली.


आजच्या बाजारातील संभाव्य परिस्थितीवर विश्लेषण करताना चॉईस इक्विटी ब्रोकिंगचे वरिष्ठ तंत्रज्ञान व डेरिएटिव विश्लेषक मंदार भोजने म्हणाले, 'गिफ्ट निफ्टीने दर्शविल्याप्रमाणे, भारतीय बेंचमार्क निर्देशांक आज सपाट ते नकारात्मक पातळीवर उघडण्याची अपेक्षा आहे, जे निफ्टी ५० मध्ये सुमारे ३५ अंकांची किरकोळ घसरण दर्शवते. मागील सत्रात सावध बंद झाल्यानंतर बाजारातील भावना अजूनही किंचित अनिर्णीत राहिल्या आहेत.


मागील सत्राच्या पहिल्या सहामाहीत निफ्टी निर्देशांकात घसरण दिसून आली आणि त्यानंतर तो बाजूलाच राहिला, ज्यामुळे मंदीचा कॅन्डलस्टिक तयार झाला जो अंतर्निहित नकारात्मक भावना दर्शवितो. तात्काळ आधार २४९१७ वर आहे, २४८५०–२४७०० पातळीच्या श्रेणीत एक मजबूत आधार झोन आहे. या झोनच्या खाली ब्रेकडाउनमुळे विक्रीचा दबाव वाढू शकतो. वरच्या बाजूस, २५००० तात्काळ प्रतिकार म्हणून काम करत आहे, तर २५१५०–२५२५० पातळीच्या वर निर्णायक ब्रेकडाउन तेजीचा ट्रेंड पुन्हा सुरू करण्यासाठी आवश्यक आहे.


बँक निफ्टी ५६२८३ वर बंद झाला, ज्याने साप्ताहिक ०.८३% तोटा नोंदवला. निर्देशांकाने ५६५०० पातळीच्या जवळ नकार दर्शविला, ज्यामुळे मंदीचा साप्ताहिक मेणबत्ती तयार झाली जी एकत्रीकरण किंवा सौम्य सुधारणा टप्प्याचे संकेत देते. जरी निर्देशांक प्रमुख घातांकीय


मूव्हिंग अव्हरेज (EMAs) च्या वर राहिला आहे जो व्यापक अपट्रेंडचे संकेत देतो - कमकुवत गतीकडे ६१.१६ अंकांवर RSI मध्ये नकारात्मक क्रॉसओवर आहे. प्रतिकार (Resistance ) ५६५००–५७,००० वर आहे, तर प्रमुख आधार ५६०००–५५५०० पातळीच्या दरम्यान आहे. व्यापाऱ्यांना ५५५००–५७००० पातळीच्या श्रेणीत सावधगिरीने 'सेल-ऑन-राईज' दृष्टिकोन अवलंबण्याचा सल्ला दिला जातो, ज्याला कठोर स्टॉप-लॉस धोरणांचे समर्थन आहे.'


संस्थात्मक आघाडीवर, १८ जुलै रोजी सलग दुसऱ्या सत्रात परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदार (FII) निव्वळ विक्री करणारे होते, त्यांनी ३६९४ कोटी किमतीचे शेअर्स ऑफलोड केले, तर देशांतर्गत संस्थात्मक गुंतवणूकदार (DII) यांनी २८२० कोटी किमतीचे शेअर्स ऑफलोड केले.


वाढत्या अस्थिरतेचे आणि मिश्र जागतिक संकेतांचे सध्याचे वातावरण लक्षात घेता, व्यापाऱ्यांनी सावधगिरीने विक्री-वाढ धोरण राखले पाहिजे, विशेषतः लीव्हरेज वापरताना. जोखीम प्रभावीपणे व्यवस्थापित करण्यासाठी रॅली दरम्यान आंशिक नफा बुक करणे आणि कडक ट्रेलिंग स्टॉप-लॉस राखणे अशी शिफारस केली जाते. निफ्टी २५००० पातळीच्या वर टिकून राहिला तरच नवीन दीर्घ पोझिशन्सचा विचार केला पाहिजे. व्यापक बाजाराचा अंदाज सावधपणे तेजीत असताना, प्रमुख तांत्रिक स्तरांवर आणि महत्त्वाच्या विकासाकडे बारकाईने लक्ष दिले पाहिजे.'


आजच्या बाजारातील परिस्थितीवर विश्लेषण करताना जिओजित इन्व्हेसमेंट लिमिटेडचे मुख्य बाजार रणनीतीकार आनंद जेम्स म्हणाले की,'शुक्रवारची घसरगुंडी २४९२० क्षेत्राजवळ थांबली असली तरी, २५०३० पातळीच्या खाली येईपर्यंत पुन्हा कमकुवत होण्याची शक्यता कायम राहील. आता आपण २५१२० पातळीच्या वर थेट वाढ शोधू आणि शॉर्ट कव्हरिंगच्या शक्यतांचा विचार करू. पर्यायी म्हणून, २४९२० पातळीच्या पुढे घसरगुंडी २४००० पातळीला पुन्हा रडारवर आणेल, ज्यामध्ये २४८०० आणि २४४५० पातळीवर मध्यवर्ती आधार दिसून येईल.'


आजच्या बाजारातील परिस्थितीवर विश्लेषण करताना जिओजित इन्व्हेसमेंट लिमिटेडचे मुख्य गुंतवणूक रणनितीकार डॉ वी के विजयाकुमार म्हणाले की ,'येत्या काळात बाजार ज्या सर्वात महत्त्वाच्या घटकावर लक्ष केंद्रित करेल तो म्हणजे अमेरिका आणि भारत यांच्यातील व्यापार चर्चेचा निकाल. जर दोन्ही देशांमधील भारतावर २०% पेक्षा कमी कर दरासह अंतरिम व्यापार करार झाला तर बाजाराच्या दृष्टिकोनातून ते सकारात्मक ठरेल.


आठवड्याच्या शेवटी पहिल्या तिमाहीचे निकाल चांगले होते, आयसीआयसीआय बँकेने सर्वोत्तम आकडे नोंदवले, विशेषतः पीएटी आणि क्रेडिट वाढीमध्ये. एचडीएफसी बँकेनेही स्थिर आकडे नोंदवले. बँकिंग निकालांमध्ये, आतापर्यंत एक्सिस बँकेचे आकडे सर्वात निराशाजनक आहेत. काही बँकांकडून आयसीआयसीआय बँकेकडे संस्थात्मक निधीचा ओघ पुढे जाण्याची शक्यता आहे. रिलायन्स इंडस्ट्रीजचे आकडे स्थिर आहेत, जिओ आणि रिटेल कंपन्यांनी चांगले निकाल दिले आहेत. रिलायन्स इंडस्ट्रीजच्या स्टॉकमध्ये लवचिक राहण्याची क्षमता आहे.'


यामुळेच आज बाजारात मोठ्या प्रमाणात अस्थिरता राहू शकते परिणामी गुंतवणूकदारांना सावधतेचा इशारा दिला जात आहे. आगामी तिमाही निकाल व आंतरराष्ट्रीय घडामोडींचा आज बाजारात परिणाम अपेक्षित आहे.

Comments
Add Comment

IND vs ENG: चौथ्या दिवसाचा खेळ संपला, इंग्लंडला विजयासाठी हव्यात ३५ धावा, भारताला चमत्कार वाचवणार का?

लंडन: भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाचव्या कसोटी सामन्याचा चौथ्या दिवशीचा खेळ संपला आहे. चौथ्या दिवशी पावसामुळे

भूकंपानंतर आता रशियात ज्वालामुखीचा उद्रेक! राखेचे लोट ६,००० मीटर उंचीपर्यंत

मॉस्को: रशियाच्या कामचटका प्रांतातील Petropavlovsk येथे ८.८ तिव्रतेचा भीषण भूकंप झाल्यानंतर आता याच ठिकाणी ज्वालामुखीचा

Amarnath Yatra 2025: अमरनाथ यात्रेबद्दल सरकारचा मोठा निर्णय, एक आठवड्याआधीच यात्रा थांबवली! 'हे' आहे कारण

खराब हवामान आणि यात्रा मार्गांची बिघडलेली अवस्था जबाबदार श्रीनगर : वार्षिक अमरनाथ यात्रा आज (दिनांक ३ )

शिंदेंनी शिवसेना का सोडली ? मुख्यमंत्र्यांनी केला खुलासा

मुंबई : विधान परिषदेच्या २०२२ च्या निवडणुकीनंतर शिवसेनेत दोन गट झाले. हे असे का झाले एकनाथ शिंदे पक्ष नेत्यांशी न

8th Pay Commission: आठव्या वेतन आयोगाबाबत मोठी अपडेट, लवकरच होणार लागू

केंद्र सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांना लवकरच आनंदाची बातमी मिळणार आहे. आठव्या वेतन आयोगाच्या अध्यक्ष आणि

Nitesh Rane: बेताल वक्तव्य करणाऱ्या जितेंद्र आव्हाडांवर नितेश राणे संतापले, काय म्हणाले वाचा...

सिंधूदुर्ग:  सनातन धर्माने भारताचं वाटोळं केल्याचं बेताल वक्तव्य करणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे