कंपनीने त्यांच्या निवेदनात नेमक्या शब्दात म्हटले आहे की, 'कंपनीने आपल्या वापरकर्त्यांना खात्री दिली की त्यांच्या मालमत्ता "सुरक्षित आणि अबाधित" आहेत तसेच प्रभावित पक्षांना या उल्लंघना मुळे झालेल्या कोणत्याही नुकसानासाठी १००% भरपाई मिळेल.' तसेच कंपनीचे सहसंस्थापक नीरज खंडेलवाल यांनी एक्सवर पोस्ट लिहित आपल्या ग्राहकांना सुरक्षिततेसाठी खात्री दिली आहे. २ ० तारखेला लिहिलेल्या पोस्ट मध्ये ते म्हणाले,या घटनेचे व्यवस्थापन आणि चौकशी करण्यासाठी टीम सखोल काम करत होती. 'आज सकाळी (१७ तासांपूर्वी) आम्हाला सुरक्षा हल्ल्याचा सामना क रावा लागला ' खंडेलवाल यांनी पोस्ट केले. त्यांनी स्पष्ट केले की हा भंग केवळ भागीदाराच्या एक्सचेंजवर लिक्विडिटी प्रोव्हिजनिंगसाठी वापरल्या जाणाऱ्या अंतर्गत खात्यापुरता मर्यादित होता.
सर्व ग्राहक मालमत्ता सुरक्षित आहेत आणि ट्रेडिंग क्रियाकलाप आणि INR पैसे काढणे कोणत्याही अडथळ्याशिवाय सुरू आहे,” असे ते म्हणाले. प्रवेश सक्षम असलेल्या वापरकर्त्यांसाठी क्रिप्टो पै से काढणे देखील चालू राहते.' प्रतिबंधात्मक उपाय म्हणून एक्सचेंजने त्यांच्या वेब३ ट्रेडिंग प्लॅटफॉर्मला तात्पुरते थांबवले होते व त्वरित प्रतिसाद दिला, ज्यामुळे आता सामान्य कामकाज पुन्हा सुर ळीत झाले आहे.
काय आहे हा गफला?
तज्ञांच्या मते हॅकरने कुठल्या एका अकाऊंमधून लॉग इन करत त्यातून विविध मार्गाने पैसै एका करन्सीतून दुसऱ्या करन्सीत पैसै ट्रान्स्फर केले गेले. अस म्हणण्यात येत आहे की टोर्नडो कॅशचा मा ध्यमातून हा घोटाळा करण्यात आला. टोर्नडो हा एक असा प्रकार आहे ज्यातून स्त्रोत शोधणे कठीण असते. या माध्यमातून त्यांनी एक इथिरियम (ETH) जमा केला. व सोलाना (Solana) या कर न्सीतून इथरियम ब्लॉकचेन मधून पैसे २७ दशलक्षापेक्षा अधिक निधी दुसरीकडे वळवण्यात आला आहे. अजून नियामकांना कुठलेही ठोस पुरावे मिळालेले नाही किंवा अजून चौकशी पूर्ण झालेली नाही. त्यामुळे याबाबत अधिक माहिती मिळालेली नाही. मात्र प्राथमिक अंदाजानुसार, उत्तर कोरियातील लझारस (Lazarus) या टोळीने हे काम केले आहे असे सांगण्यात येत आहे.
यामुळेच यानिमित्ताने पुन्हा सायबर सुरक्षेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.