तब्बल १५ मिनिटे लिफ्टमध्येच अडकले भाजपचे 'हे' नेते, कार्यकर्त्यांनी दरवाजा तोडून केली सुटका

वसई: विधान परिषदेतील भाजपचे गटनेते आणि मुंबई बँकेचे अध्यक्ष प्रविण दरेकर यांच्याविषयी एक मोठी बातमी येत आहे. दरेकर आज वसईतील एका कार्यक्रमात गेले असता, त्यांच्यासोबत एक घटना घडली आहे. ती घटना म्हणजे, दरेकर लिफ्टने जात असताना अचानक लिफ्ट मध्येच बंद पडली. इतकेच नव्हे तर, ते तब्बल १५ ते २० मिनिटे लिफ्टमध्ये अडकून पडले होते, ज्यामुळे त्यांच्या सुरक्षेचा प्रश्नदेखील निर्माण झाला होता.

वसई पश्चिमेकडील वसई विधानसभेच्या आमदार स्नेहा दुबे पंडित यांनी स्वयं पुनर्विकास मार्गदर्शन शिबिराचे आयोजन केले होते. या शिबिराला भाजपचे नेते प्रवीण दरेकर यांनी उपस्थिती लावली होती. मात्र दरेकर मार्गदर्शन शिबिराकडे लिफ्टने जात असताना अचानकच लिफ्ट बंद पडली. तब्बल १५ मिनिटे ते लिफ्टमध्ये अडकले होते. वसई पश्चिमेतील कौल हेरिटेज सिटी येथील अपुलँड ग्रँड बॅन्क्वेट हॉलमध्ये जुन्या आणि जीर्ण इमारतींच्या स्वयंपुनर्विकासासाठी आयोजित मार्गदर्शन शिबिरासाठी दरेकर आले होते.

या शिबिरासाठी आलेल्या अनेक मान्यवरांमध्ये दरेकर यांच्यासोबत वसईच्या आमदार स्नेहा दुबे-पंडीत आणि नालासोपाऱ्याचे आमदार राजन नाईक हे देखील लिफ्टमध्ये होते.
Comments
Add Comment

एनबीसीसी आणि मुंबई बंदर प्राधिकरणामध्ये मुंबईतील विकासासाठी सामंजस्य करार

मुंबई : एनबीसीसी (इंडिया) लिमिटेड आणि मुंबई बंदर प्राधिकरण (एमबीपीए) यांनी मुंबई पोर्टच्या जमिनीवर विविध विकास

वायुप्रदूषण नियम उल्लंघनावरून उच्च न्यायालय आक्रमक

पालिका आयुक्त आणि एमपीसीबी सचिवांना प्रत्यक्ष हजर राहण्याचे आदेश मुंबई : फोर्ट, वरळी, बीकेसी, अंधेरी, चकाला आदी

मनसेतून उबाठात गेलेल्यांची उमेदवारी अडचणीत?

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची भूमिका निर्णायक ठरणार मुंबई : उबाठा गट आणि मनसेची युती झाल्याने दोन्ही पक्षातील

प्रभादेवीतील प्रभाग १९४ मनसेला सोडण्यास उबाठा गटाचा विरोध

मनसेला सोडल्यास उबाठात बंडखोरी होण्याची शक्यता मुंबई : दोन्ही ठाकरे बंधूंनी युतीची घोषणा केल्यांनतर आता जागा

विरार-अलिबाग प्रकल्पाला येणार गती

हुडकोकडून २२ हजार ५०० कोटींचे कर्ज उपलब्ध मुंबई : विरार-अलिबाग बहुउद्देशीय मार्गिकेच्या प्रकल्पाला आता गती

जागतिक बाजारपेठेत भारतीय डाळिंबांची मागणी

मुंबई : राज्यातील शेतकरी निर्यातक्षम फळे व भाजीपाला पिकवतात. या उत्पादनांना स्पर्धात्मक दर मिळावा म्हणून