पश्चिम रेल्वेतर्फे पाच गणपती विशेष गाड्या धावणार

  155

मुंबई : यंदाच्या गणेशोत्सवादरम्यान प्रवाशांच्या सोयीसाठी पश्चिम रेल्वे मुंबई सेंट्रल-ठोकूर, मुंबई सेंट्रल-सावंतवाडी रोड, वांद्रे टर्मिनस-रत्नागिरी, वडोदरा-रत्नागिरी आणि विश्वामित्री-रत्नागिरी स्थानकांदरम्यान विशेष गाड्या चालवणार आहे.


०९०११ मुंबई सेंट्रल - ठोकूर स्पेशल मंगळवारी मुंबई सेंट्रलहून सकाळी ११:३० वाजता निघेल आणि दुसऱ्या दिवशी सकाळी ८:५० वाजता ठोकूरला पोहोचेल. ही ट्रेन २६ ऑगस्ट आणि २ सप्टेंबर रोजी धावेल.


त्याचप्रमाणे ०९०१२ ठोकूर - मुंबई सेंट्रल ही विशेष गाडी बुधवारी ठोकूर येथून सकाळी ११ वाजता निघेल आणि दुसऱ्या दिवशी सकाळी ७:१५ वाजता मुंबई सेंट्रलला पोहोचेल. ही ट्रेन दि. २७ ऑगस्ट आणि ३ सप्टेंबर रोजी धावेल.


ट्रेन क्रमांक ०९०१९ मुंबई सेंट्रल - सावंतवाडी रोड विशेष आठवड्यातून रविवार, बुधवार, शुक्रवार आणि शनिवारी धावेल. ही ट्रेन मुंबई सेंट्रलहून सकाळी ११:३० वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी पहाटे २:३० वाजता सावंतवाडी रोडला पोहोचेल. ही ट्रेन २२ ऑगस्ट ते ७ सप्टेंबर पर्यंत धावेल. त्याचप्रमाणे, ट्रेन क्र. ०९०२० सावंतवाडी रोड - मुंबई सेंट्रल विशेष गाडी आठवड्यातून ४ दिवस म्हणजे रविवार, सोमवार, गुरुवार आणि शनिवार धावेल. ही ट्रेन सावंतवाडीहून पहाटे ४:५० वाजता निघेल आणि त्याच दिवशी रात्री ८ :१० वाजता मुंबई सेंट्रलला पोहोचेल. ही ट्रेन २३ ऑगस्ट ते ८ सप्टेंबर पर्यंत धावेल.


ट्रेन क्रमांक ०९०१५ वांद्रे टर्मिनस - रत्नागिरी स्पेशल ही गाडी गुरुवारी दुपारी २:२० वाजता वांद्रे टर्मिनस येथून निघेल आणि दुसऱ्या दिवशी रात्री १२ :३० वाजता रत्नागिरीला पोहोचेल. ही ट्रेन २१ ऑगस्ट ते ४ सप्टेंबरपर्यंत धावेल. त्याचप्रमाणे, ट्रेन क्र. ०९०१६ रत्नागिरी - वांद्रे टर्मिनस स्पेशल शुक्रवारी रत्नागिरीहून रात्री १:३० वाजता सुटेल आणि त्याच दिवशी १२ :३० वाजता वांद्रे टर्मिनसला पोहोचेल. ही ट्रेन २२ ऑगस्ट ते ५ सप्टेंबर पर्यंत धावेल.


ट्रेन क्रमांक ०९११४ वडोदरा - रत्नागिरी स्पेशल मंगळवारी वडोदरा येथून सकाळी ११:१५ वाजता निघेल आणि दुसऱ्या दिवशी रात्री १२ :३० वाजता रत्नागिरीला पोहोचेल. ही ट्रेन २६ ऑगस्ट आणि २ सप्टेंबर रोजी धावेल. त्याचप्रमाणे, ट्रेन क्र. ०९११३ रत्नागिरी-वडोदरा स्पेशल बुधवारी रत्नागिरीहून पहाटे १:३० वाजता सुटेल आणि त्याच दिवशी संध्याकाळी ५ :३० वाजता वडोदरा येथे पोहोचेल. ही ट्रेन २७ ऑगस्ट आणि ३ सप्टेंबर रोजी धावेल.


ट्रेन क्रमांक ०९११० विश्वामित्री - रत्नागिरी स्पेशल ही बुधवार आणि शनिवारी सकाळी १०:०० वाजता विश्वामित्रीहून सुटेल आणि दुसऱ्या दिवशी सकाळी रात्री १२ :३० वाजता रत्नागिरीला पोहोचेल. ही ट्रेन २३ ऑगस्ट ते ६ सप्टेंबरपर्यंत धावेल. त्याचप्रमाणे, ट्रेन क्र. ०९१०९ रत्नागिरी - विश्वामित्री स्पेशल ही गाडी रविवार आणि गुरुवारी रत्नागिरीहून पहाटे १:३० वाजता निघेल आणि त्याच दिवशी संध्याकाळी ५: ३० वा. विश्वामित्रीला पोहोचेल. ही ट्रेन २४ ऑगस्ट ते ७ सप्टेंबर पर्यंत धावेल. ०९०११, ०९०१९, ०९०१५, ०९११४ आणि ०९११० या ट्रेन क्रमांकांसाठी बुकिंग दि. २३ जुलैपासून सर्व पीआरएस काउंटर आणि आयआरसीटीसी वेबसाइटवर सुरू होईल.

Comments
Add Comment

बेस्ट पाठोपाठ मुंबई महापालिका बँकेच्या निवडणुकीत उबाठाच्या जय सहकारचा धुव्वा

युवा सेनेच्या प्रदीप सावंत यांच्यासह अनेकांचा पराभव मुंबई : बेस्ट पाठोपाठ दि म्युनिसिपल को-ऑपरेटिव्ह बँकेच्या

गणेशोत्सवासाठी रात्रभर रस्त्यावर धावणार बेस्ट बसेस

दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांची गैरसोय टाळण्यासाठी सुविधा मुंबई : मुंबईतील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी

ढोल-ताशांच्या गजरात गणेशमूर्तींचे आगमन

मुंबई : गणेशोत्सवाला अवघे काही दिवस उरले असून मुंबईतील अनेक गणेश मंडळांनी मूर्ती मंडपात नेण्यास सुरुवात केली

महाराष्ट्रात गणेशोत्सवाला राज्य महोत्सवाचा मान; घरबसल्या दर्शनासाठी विशेष पोर्टल सुरू

मुंबई : सार्वजनिक गणेशोत्सव, घरगुती गणेशोत्सव, महाराष्ट्रातील गणेशोत्सवाला आता राज्याने प्रथमच महाराष्ट्र

महाराष्ट्रातील १ कोटी बहीणींना लखपती दीदी करणार

मुंबई : लखपती दीदींसाठी देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रयत्नशील आहेत. त्यांच्याच नेतृत्वाखाली महाराष्ट्रात

मुंबई महापालिकेची प्रभाग रचना जाहीर

येत्या ०४ सप्टेंबरपर्यंत नागरिकांना नोंदवता येणार हरकती, सूचना मुंबई : मुंबई महापालिकेच्या आगामी सार्वत्रिक