तालुक्यातील पर्यटनस्थळी प्रशासनाकडून प्रतिबंधात्मक मनाईचे आदेश

धबधबे, तलाव, धरणक्षेत्रात पर्यटकांची वाढली गर्दी


अलिबाग : श्रीवर्धन पोलीस ठाणे हद्दीतील धबधबा, धरण व तलाव क्षेत्रात मान्सून कालावधीमध्ये पर्यटकांसह तालुक्यातील नागरिकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होत असते. या गर्दीवर नियंत्रण ठेवणे पोलीस प्रशासनास त्रासदायक ठरत असल्याने धबधब्यांसह धरण, तलाव क्षेत्रात प्रतिबंधात्मक मनाई आदेश जारी करण्यात आला आहे.


या भागांमध्ये पाण्यात बुडून मृत्यूबाबतच्या अनेक घटना घडलेल्या आहेत, तसेच कारिवणे येथील धबधब्याच्या पाण्यात बुडून मृत्यूबाबतही श्रीवर्धन पोलीस ठाण्यात १७ जून २०२५ रोजी आकस्मित मृत्यूची नोंद झालेली आहे. त्यामुळे यावर्षी कोणत्याही प्रकारे धबधबा, धरण व तलाव या क्षेत्रात लोकांची गर्दी होऊ नये, तसेच जिवीतहानी होऊ नये यासाठी या परिसरात २६ जून ते ३० सप्टेंबर २०२५ या कालावधीसाठी श्रीवर्धन उपविभागीय अधिकारी महेश पाटील यांनी प्रतिबंधात्मक मनाई आदेश जारी केला आहे. या दरम्यान पावसामुळे निर्माण झालेले नैसर्गिक धबधब्याच्या परिसरामध्ये मद्यपान करणे किंवा मद्यधुंद अवस्थेत प्रवेश करणे, मद्य बाळगणे, मद्य वाहतूक करणे, अनधिकृत मद्य विक्री करणे य उघड्या जागेवर मद्य सेवन करणे. पावसामुळे धोकादायक झालेली ठिकाणे, धबधबे, दऱ्यांचे कठडे, धोकादायक वळणे इत्यादी ठिकाणी सेल्फी काढणे व कोणत्याही स्वरुपाचे चित्रीकरण करणे तसेच धबधब्याच्या वरील बाजूस जाणे अथवा धबधब्याच्या धोकादायकरीत्या पडणाऱ्या पाण्याच्या झोताखाली बसणे अशी कोणतीही कृती करण्यास प्रशासनाने बंदी घातली आहे.


तसेच महिलांची छेडछाड करणे, टिंगलटवाळी करणे, महिलांशी असभ्य वर्तन करणे, असभ्य व अश्लिल हावभाव करणे, शेरेबाजी करणे अथवा लज्जा निर्माण होईल, असे कोणतेही वर्तन करणे, सार्वजनिक ठिकाणी मोठ्या आवाजात संगीत यंत्रणा वाजवणे, डी. जे. सिस्टीम वाजवणे, गाडीमधील स्पिकर/ बफर वाजविणे व त्यामुळे ध्वनिप्रदूषण करणे, ज्या कृतीमुळे ध्वनी, वायू व जल प्रदूषण होईल असे कोणतेही वर्तवणूक करण्यास प्रशासनाने बंदी घातली आहे.

Comments
Add Comment

जोश हेझलवूडची एमसीजीवर 'ड्रीम स्पेल'!

मेलबर्न: ऑस्ट्रेलियाचा दिग्गज वेगवान गोलंदाज जोश हेझलवूड याने शुक्रवार, ३१ ऑक्टोबर २०२५ रोजी मेलबर्न क्रिकेट

अरबी शिकवणाऱ्या व्यक्तीवर अल्पवयीन विद्यार्थिनींशी गैरवर्तन केल्याचा आरोप; पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल

मुंबई: अल्पवयीन मुलींशी गैरवर्तन केल्याच्या गंभीर आरोपाखाली मुंबई पोलिसांनी शिवडी येथील एका धार्मिक संस्थेतून

छत्तीसगडला १४,२६० कोटींचे बुस्टर डोस!

पंतप्रधान मोदींकडून पायाभूत सुविधा, आरोग्य आणि ऊर्जेच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पांचे भूमिपूजन नवी दिल्ली:

आयसीसी महिला क्रिकेट विश्वचषक २०२५ अंतिम सामन्यासाठी पंचांची घोषणा

नवी मुंबई: आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद (ICC) ने भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील विश्वचषक २०२५ च्या अंतिम

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनी चैत्यभूमीवर सोयी-सुविधांची कमतरता नको!

महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी यांचे निर्देश मुंबई : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा ६९ वा

महिला संघाने विश्वचषक जिंकल्यास गावस्कर करणार हे विशेष काम

नवी दिल्ली : भारतीय महिला क्रिकेट संघ वर्ल्डकपच्या अंतिम सामन्यात दिमाखात दाखल झाला आहे. भारतीय महिला संघ आता