Gold Rate : सोन्याने एक लाखाची पातळी केली पार! सोने 'गगनपार'

प्रतिनिधी: सोन्याच्या किंमतीत पुन्हा एकदा जबरदस्त वाढ झाली आहे. सोन्याने आज जोरदार उसळी मारल्याने सोन्याने एक लाख किंमत पार केली आहे. सलग तिसऱ्यांदा झालेली ही वाढ आहे. अमेरिकेची अर्थव्यवस्था पंगु झालेली असताना अमेरिकेतील नवी आ कडेवारी मजबूत आल्याने गुंतवणूकदारांनी मोठ्या प्रमाणात बाजारात उत्साहाचे वातावरण दर्शविले. आपली गुंतवणूक वाढवितानाच घसरलेल्या किंमतीत नफा बुकिंग केली होती. आता सोन्याने पुन्हा वाढत्या डॉलरच्या किंमतीबरोबरच नवी उसळी घेतली. घट लेल्या मागणीनंतर नफा बुकिंगमध्ये झालेल्या वाढीनंतर सोने नव्या उच्च स्तरावर पोहोचले आहे.


सगळ्या प्रकारच्या सोन्याच्या किंमतीत वाढ झाली होती. भारतीय सराफा बाजारात 'गुडरिटर्न्स' संकेतस्थळावरील माहितीनुसार, २४ कॅरेट सोन्याच्या प्रति ग्रॅम दरात ६६ रूपये वाढ झाली आहे. २२ कॅरेट सोन्याच्या प्रति ग्रॅम दरात ६० रूपये वाढ झाली आहे. १८ कॅ रेट सोन्याच्या प्रति ग्रॅम दरात ४९ रूपये वाढ झाली आहे. त्यामुळे अनुक्रमे सोन्याचे २४ कॅरेट प्रति ग्रॅम दर १०००४, २२ कॅरेट सोन्याचे प्रति ग्रॅम दर ७५०३ रूपये आहेत.


संकेतस्थळावरील माहितीनुसार, २४ कॅरेट सोन्याच्या प्रति तोळा किंमतीत ६६० रूपयांनी वाढ झाल्याने दरपातळी १०००४० रूपयांवर, २२ कॅरेट सोन्याच्या प्रति तोळा किंमतीत ६०० रूपयांनी वाढ झाल्याने दरपातळी ९१७०० रूपयांवर, १८ कॅरेट सोन्याच्या प्रति तोळा किंमतीत ४९० रूपये वाढ झाल्याने दरपातळी ७५०३० रूपयांवर गेली आहे.


मुंबईसह मुख्य शहरातील सराफा बाजारात २४ कॅरेट सोन्याचे प्रति ग्रॅम दर सरासरी १०००४ रूपयांवर, २२ कॅरेट सोन्याचे प्रति ग्रॅम दर ९१७० रूपयांवर, १८ कॅरेट सोन्याचे प्रति ग्रॅम दर ७५०३ रूपयांवर आहे. शनिवारी संध्याकाळपर्यंत जागतिक सोन्याच्या गोल्ड फ्युचर निर्देशांक (Gold Futures Index) यामध्ये ०.३९% वाढ झाली आहे. सोन्याच्या गोल्ड स्पॉट दरात ०.३४% वाढ झाल्याने सोन्याची दर पातळी युएसमध्ये प्रति डॉलर ३३५०.४० औंसवर पोहोचली आहे. भा रतीय कमोडिटी बाजारातील एमसीएक्स (Multi Commodity Exchange MCX) यामध्ये सोन्याच्या निर्देशांकात ०.५६% वाढ झाल्याने एमसीएक्स दरपातळी ९८०१५.०० रूपयांवर गेली आहे.


युएसमध्ये अस्थिरतेचे वातावरण असले तरी युएसमध्ये मजबूत आकडेवारीमुळे सातत्याने पुन्हा सोन्यात वाढ होत आहे. युएस मध्ये किरकोळ विक्रीत (Retail Sales) आकडेवारीत ०.६% वाढ झाली आहे. मजबूत आर्थिक आकडेवारीवरून असे दिसून आले की जगातील सर्वात मोठी अर्थव्यवस्था स्थिर स्थितीत पुन्हा येत असल्याने फेडरल रिझर्व्हने चलनविषयक धोरण सरलता करण्यास पुन्हा सुरू केल्याने ही वाढ अपेक्षित होती. तथापि, फेड गव्हर्नर क्रिस्टोफर वॉलर म्हणाले की अर्थव्यवस्थेला वाढत्या जोखमींमुळे या म हिन्याच्या अखेरीस अमेरिकन मध्यवर्ती बँकेने व्याजदरात कपात करावी असे त्यांचे मत आहे. मात्र युएस फेड गव्हर्नर जेरोमी पॉवेल व इतर समितीचे दरकपातीसाठी बहुमत नाही. इथे भारतात पुन्हा रूपयांची घसरण झाल्याने सोन्याच्या पातळीला सपोर्ट लेवल न मिळाल्याने व अस्थिरतेच्या तोंडावर सोन्याच्या सुरक्षित गुंतवणूकीकडे ग्राहकांचा कल गेल्याने पुन्हा ही दरवाढ झाली आहे.

Comments
Add Comment

मनसे दीपोत्सवात ड्रोन उडवणाऱ्यांवर गुन्हा दाखल

मुंबई : शिवाजी पार्क पोलिसांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या दीपोत्सव कार्यक्रमात ड्रोन उडवणाऱ्या अनेक

मुंबई मेट्रो ३ मध्ये 'उतरण्यासाठी' जिना नाही; प्रवाशांना त्रास

मुंबई : मुंबईच्या नवीन मेट्रो लाईन ३ (Aqua Line) च्या मेट्रो स्टेशनवर खाली उतरण्यासाठी सरकते जिने (Escalators) नाहीत. ऑक्टोबर

भारतानंतर आता अफगाणिस्तान पाकिस्तानचे पाणी अडवणार!

काबूल : भारतानंतर आता तालिबानशासित अफगाणिस्तान पाकिस्तानला होणारा पाणीपुरवठा मर्यादित करण्याची आणि नदीवर धरणे

महादेवाच्या पिंडीवर अवतरली नागदेवता! बघ्यांची उसळली गर्दी

वाडा: तालुक्यातील दुपारेपाडा या गावातील श्री गणेश मंदिरात बुधवारी सायंकाळच्या सुमारास या मंदिरातील श्री

पुण्याच्या NDA मध्ये गूढ! एकाच आठवड्यात दोन विद्यार्थ्यांचा मृत्यू: नेमकं चाललंय तरी काय?

पुणे : पुण्यातील खूप मोठ्या आणि महत्त्वाच्या असलेल्या राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीमध्ये (NDA) पोहण्याचा सराव करत

मुंबई पोलिसांचा दाऊदच्या टोळीला मोठा झटका! ड्रग्सचा कारखाना सांगलीत तर मास्टरमाइंड दुबईतून पकडला

मुंबई : मुंबई पोलिसांच्या क्राईम ब्रँचने (गुन्हे शाखेने) एक मोठे ड्रग्सचे आंतरराष्ट्रीय जाळे पकडून दाऊद