डाक विभागाची डिजिटल क्रांती : महत्त्वाच्या पोस्ट ऑफिसमध्ये ‘IT २.० APT अप्लिकेशन’चा शुभारंभ

पोस्ट ऑफिस आता आणखी स्मार्ट होणार!



डाक विभागाकडून डिजिटल परिवर्तनाच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यात आले असून, ‘APT (Advanced Platform for Transformation) अप्लिकेशन’ हे पुढच्या पिढीतील नवीन सॉफ्टवेअर २२ जुलै २०२५ रोजी काही निवडक प्रमुख पोस्ट ऑफिसमध्ये राबवण्यात येणार आहे. या योजनेअंतर्गत खालील मुख्य पोस्ट ऑफिस आणि त्याअंतर्गत येणाऱ्या सब पोस्ट ऑफिस आणि शाखा पोस्ट ऑफिसमध्ये नव्या प्रणालीची अंमलबजावणी केली जाईल.


या पोस्टऑफिसमध्ये होणार नव्या प्रणालीची अंमलबजावणी




  • महिम मुख्य पोस्ट ऑफिस

  • ठाणे मुख्य पोस्ट ऑफिस


  • श्रीरामपूर मुख्य पोस्ट ऑफिस


  • जळगाव मुख्य पोस्ट ऑफिस


  • अमरावती मुख्य पोस्ट ऑफिस


  • कोल्हापूर मुख्य पोस्ट ऑफिस




सर्व व्यवहार तात्पुरते बंद



नवीन प्रणालीच्या सुरळीत अंमलबजावणीसाठी २१ जुलै २०२५ रोजी पोस्ट ऑफिसमधील सर्व व्यवहार तात्पुरते बंद ठेवण्यात येणार आहेत. या काळात डेटा माइग्रेशन, सिस्टीम तपासणी आणि आवश्यक कॉन्फिगरेशनची प्रक्रिया पार पाडली जाणार आहे.



 APT अप्लिकेशनची वैशिष्ट्ये काय?




  • अधिक वेगवान आणि प्रभावी सेवा

  • ग्राहकांसाठी वापरायला सुलभ आणि आधुनिक इंटरफेस

  • जलद सेवा वितरणाची हमी

  • कार्यक्षम, स्मार्ट आणि भविष्योन्मुख पोस्ट सेवा प्रणाली




 ग्राहकांना विनंती 



सर्व ग्राहकांनी आपल्या पोस्ट ऑफिस भेटीचे नियोजन वेळापत्रकानुसार करावे. दिलगिरी व्यक्त करत आहोत की या प्रक्रियेमुळे थोडा त्रास होऊ शकतो, मात्र या डिजिटल परिवर्तनामुळे भविष्यात आणखी जलद, सुरक्षित आणि सोयीच्या सेवा मिळणार आहेत.

Comments
Add Comment

मुंबईत काही अपवाद वगळता शांततेत मतदान

तब्बल १ हजार ७०० उमेदवारांचे भवितव्य आज ठरणार मुंबई : मुंबई महापालिकेच्या २२७ जागांसाठी झालेल्या निवडणुकीच्या

गुजराती मतदार पोहोचले गावाला

मुंबई : मकरसंक्रांत अर्थात "उत्तरायण" हा गुजरात आणि राजस्थानमधील प्रमुख सण आहे. या काळात जवळपास जागोजागी भव्य

BMC Election 2026 : मुंबई महापालिकेसाठी मतमोजणी कधी सुरू होणार ? कशी असेल प्रक्रिया ?

मुंबई : देशाची आर्थिक राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंबई महापालिकेसाठी मतमोजणी शुक्रवार १६ जानेवारी २०२६

‘टपाली मतपत्रिकांच्या पेट्या मतमोजणीच्या दिवशीच गोदामातून बाहेर काढणार’

मुंबई : बृहन्मुंबई महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५ - २६ अंतर्गत, निवडणूक निर्णय अधिकारी - २१ (प्रभाग क्रमांक

मतदानाची वेळ संपली, आतापर्यंत झाले किती टक्के मतदान ?

मुंबई : देशाची आर्थिक राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंबईसह राज्यातील २९ महापालिकांसाठी मतदान करण्याची वेळ

शाई पुसून पुन्हा मतदान करणे शक्य नाही!

राज्य निवडणूक आयुक्तांचे स्पष्टीकरण; मतदारांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न मुंबई : महापालिका