Pankaja Munde : अधिवेशन संपताच पंकजा मुंडे यांनी घेतली कांदळवनाच्या कत्तलीची तात्काळ दखल!

अनधिकृत भराव करणाऱ्यावर गुन्हे दाखल करण्याचे पर्यावरण मंत्र्यांचे आदेश


सभागृहात आमदारांना दिलेला शब्द पाळला


मुंबई : अंधेरी पश्चिम येथील लोखंडवाला बॅक रोड परिसरातील कांदळवनाच्या कत्तलीप्रकरणी पर्यावरण व वातावरणीय बदल विभागाच्या मंत्री पंकजा मुंडे यांनी थेट जागेवर जाऊन पाहणी करत गंभीर स्थितीची नोंद घेतली. बेकायदेशीर भराव टाकणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याचे आणि संबंधित जागेवरील भराव हटवून मूळ कांदळवनाची पुन:स्थापना करण्याचेही आदेशही त्यांनी यावेळी दिले.

आमदार अनिल परब यांच्या लक्षवेधी सूचनेनंतर विधानभवनात दिलेल्या आश्वासनाची पूर्तता करत अधिवेशन संपल्यावर दुसऱ्याच दिवशी पर्यावरण मंत्री श्रीमती मुंडे संबंधित घटनास्थळी पाहणीसाठी पोहोचल्या. सी.टी.एस. क्रमांक १६१, पहाडी गोरेगाव परिसरात झालेल्या पाहणीत आमदार श्री. परब, पर्यावरण व वातावरणीय बदल विभागाच्या सचिव जयश्री भोज, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे (एमपीसीबी) सदस्य सचिव अविनाश ढाकणे आणि विविध खात्यांचे अधिकारी उपस्थित होते.

यावेळी बफर झोनमध्ये कोणतीही परवानगी न घेता मोठ्या प्रमाणात भराव टाकल्याचे निदर्शनास आले. प्रत्यक्ष दर्शनी नियमांचे उल्लंघन झाल्याचे आढळून आल्याचे सांगून ही जागा काही वर्षांपूर्वी नॉन डेव्हलपमेंट झोनमध्ये होती. ती डेव्हलपमेंट झोन कशी झाली?, असा थेट सवाल करत श्रीमती मुंडे यांनी विभागाला जमीन नॉन डेव्हलपमेंट झोन असण्याची कारणे काय होती याचा तपशीलवार शोध घेण्याचे आदेश दिले.


हे प्रकार थांबायला हवेत : मंत्री पंकजा मुंडे


तसेच, जे कंत्राटदार बेकायदेशीर भरावासाठी जबाबदार आहेत, त्यांच्यावर तात्काळ गुन्हे दाखल करण्याचे निर्देश दिले. संबंधित ठिकाणी भराव हटवून मूळ कांदळवनाची पुन:स्थापना करण्याचेही आदेशही त्यांनी यावेळी दिले. कांदळवनाची कत्तल करून मोठ्या प्रमाणात अतिक्रमण सुरू असल्याच्या तक्रारी लक्षात घेता, अशा सर्व प्रकरणांचे संकलन करून तात्काळ कारवाई करण्याच्या सूचनाही पर्यावरण मंत्री श्रीमती मुंडे यांनी अधिकाऱ्यांना दिल्या. "हे प्रकार थांबायला हवेत, पर्यावरणाच्या रक्षणासाठी यंत्रणांनी जलद गतीने काम केले पाहिजे," असे श्रीमती मुंडे यांनी स्पष्टपणे नमूद केले.
Comments
Add Comment

फास्टटॅग नसलेल्या वाहनचालकांना आजपासून दुप्पट पैसे मोजावे लागणार

यूपीआयद्वारे पेमेंट करणाऱ्यांना १.२५ पट जास्त रकमेचा दंड मुंबई  : नॅशनल हायवे अथॉरिटी ऑफ

सैन्याने १६ हजार फूट उंचीवर मोनोरेल चालवली

ईटानगर : भारतीय लष्कराच्या गजराज कॉर्प्सने एक इन-हाऊस हाय-अल्टिट्यूड मोनोरेल सिस्टम विकसित केली आहे. हे स्मार्ट

बिहारमधील विजयानंतर बोलले पंतप्रधान मोदी, सर्वपक्षीय नेत्यांचे आणि नागरिकांचे मागितले सहकार्य

नवी दिल्ली : बिहार विधानसभा निवडणुकीच्या निकालांमध्ये एनडीएने मिळवलेल्या विजयाचा उत्सव आज दिल्लीत रंगला. निकाल

पोटनिवडणुकांमध्ये भाजपचा दोन जागांवर विजय

नवी दिल्ली : देशातील सात राज्यांतील आठ विधानसभा मतदारसंघामधे झालेल्या पोटनिवडणुकीची मतमोजणी झाली. भाजप आणि

CSMT परिसरात सापडलेल्या त्या बॅगेत नेमकं काय सापडलं ?

मुंबई : देशातील प्रमुख शहरांमध्ये सुरक्षेची परिस्थिती अधिक ताणलेली असताना, मुंबईत आज पुन्हा एकदा संशयास्पद

देशभरात सहा कोटी मृतांचे आधारकार्ड सक्रिय

नवी दिल्ली : आधारकार्ड ओळखीचा पुरावा ग्राह्य धरला जातो. आधारकार्ड असेल तरच बँक खाते उघडले जाते. सरकारी योजनांचा