Devendra Fadanvis : "कुणाचा बाप आला... बापाचा बाप आला... तरी मुंबई...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा झणझणीत इशारा

  79

मुंबई : विरोधकांकडून सातत्याने मुंबई महाराष्ट्रापासून तोडण्याचा भाजपचा डाव असल्याचा मुद्दा मांडला जातो. याच मुद्द्यावर बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत खडसावून सांगितले की, मुंबई महाराष्ट्राचीच आहे. कुणाचा बाप आला, बापाचा बाप आला, त्याचा आजोबा आला तरी मुंबई महाराष्ट्राचीच राहील", अशी ठाम भूमिका मुख्यमंत्री फडणवीसांनी सांगितले.



अंतिम आठवडा प्रस्तावाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत उत्तर दिले. मुंबईच्या विकासाबद्दल त्यांनी राज्य सरकारची भूमिका मांडली.
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, "प्रत्येकवेळी वर्ष-दीड वर्षांनी आलेल्यांना मुंबई बदलेली पाहायला मिळतंय. अण्णाभाऊ साठेंनी जी व्यथा मुंबईत अनुभवली, ती व्यथा कुणाच्या वाट्याला येऊ नये असा प्रयत्न आपण करतो. म्हणून अण्णाभाऊ साठेंची एक कविता आहे, मुंबईवर. त्यांनी काय अनुभवलं', असे म्हणत देवेंद्र फडणवीस ती कविता वाचून दाखवली.




"याच कवितेमध्ये संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीची नांदी केलेली आहे. ही कविता वाचण्याचं कारण एवढंच आहे की, ४ महिन्यांनंतर भाषणं सुरू होतील महाराष्ट्रापासून मुंबईला तोडण्याचं षडयंत्र सुरू झालेलं आहे", असा टोला फडणवीसांनी विरोधकांना लगावला.



मुंबई महाराष्ट्राचीच आणि हजारो पिढ्या राहील


फडणवीस पुढे म्हणाले की, "आताच सांगतो. मुंबईला महाराष्ट्रापासून कोणीही तोडू शकत नाही. कुणाचा बाप... बापाचा बाप... त्याचा बाप... त्याचा बाप... त्याचा आजोबा आला तरीही मुंबई महाराष्ट्राचीच आहे. मुंबई महाराष्ट्राचीच राहील आणि हजारो पिढ्या राहील. या महाराष्ट्रात आणि मुंबईमध्ये मराठी माणसाचा आवाज बुलंद राहील", असे फडणवीस विधानसभेत बोलताना म्हणाले.

Comments
Add Comment

विवाह नोंदणीसाठी आता रविवारीही महापालिकेची सेवा

जोडप्यांना सुट्टीच्या दिवशीही करता येणार नोंदणी विवाह मुंबई (खास प्रतिनिधी) : मुंबईत दरवर्षी

Mumbai Goa Highwayवरील कशेडी बोगद्याजवळ मोठी दुर्घटना, कोकणात जाणाऱ्या खासगी बसला आग

मुंबई: गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्यांची गर्दी आता सुरू झाली आहे. याच दरम्यान, मुंबई गोवा हायवेवर मोठी दुर्घटना

बेस्ट पाठोपाठ मुंबई महापालिका बँकेच्या निवडणुकीत उबाठाच्या जय सहकारचा धुव्वा

युवा सेनेच्या प्रदीप सावंत यांच्यासह अनेकांचा पराभव मुंबई : बेस्ट पाठोपाठ दि म्युनिसिपल को-ऑपरेटिव्ह बँकेच्या

गणेशोत्सवासाठी रात्रभर रस्त्यावर धावणार बेस्ट बसेस

दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांची गैरसोय टाळण्यासाठी सुविधा मुंबई : मुंबईतील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी

ढोल-ताशांच्या गजरात गणेशमूर्तींचे आगमन

मुंबई : गणेशोत्सवाला अवघे काही दिवस उरले असून मुंबईतील अनेक गणेश मंडळांनी मूर्ती मंडपात नेण्यास सुरुवात केली

महाराष्ट्रात गणेशोत्सवाला राज्य महोत्सवाचा मान; घरबसल्या दर्शनासाठी विशेष पोर्टल सुरू

मुंबई : सार्वजनिक गणेशोत्सव, घरगुती गणेशोत्सव, महाराष्ट्रातील गणेशोत्सवाला आता राज्याने प्रथमच महाराष्ट्र