मुंबई: विधानभवनात गुरूवारचा दिवस हा आमदार पडळकर आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांच्यातील वादामुळे चांगलाच गाजला. दिवसभर हाच मुद्दा सुरू होता. मात्र मध्यरात्रीही विधानभवनाच्या बाहेर पुन्हा एकदा मोठा राडा पाहायला मिळाला.
विधानभवनात गुरूवारी राडा झाल्यानंतर मध्यरात्री जितेंद्र आव्हाड यांचे कार्यकर्ते नितीन देशमुख यांना पोलिसांनी अटक केली. रात्री साडे तीन वाजता नितीन देशमुख याला जे जे मध्ये मेडिकल साठी नेण्यात आले. यावेळी राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड, रोहित पवार यांनी कार्यकर्त्यांसह ठिय्या आंदोलन केले. नितीन देशमुखला घेऊन जात असताना जितेंद्र आव्हाड हे पोलिसांच्या गाडीसमोर आडवे झोपले. यावेळी पोलिसांनी त्यांना अक्षरश: खेचून बाहेर काढले.
जितेंद्र आव्हाड म्हणणं होतं की रात्री देशमुख यास सोडून देतो असं सांगितले होते पण अटक करत असल्याने अचानक विधानभवन येथे आंदोलन सुरू केले. एकीकडे आव्हाड आणि त्यांचे कार्यकर्ते पोलिसांनी नितीन देशमुखला बसवलेल्या कारसमोर आंदोलन करत असतानाच अचानक त्याला दुसऱ्या कारमध्ये बसवलं. या गोंधळादरम्यान आव्हाड आणि त्यांचे कार्यकर्ते या दुसऱ्या गाडीसमोर आंदोलन करण्यासाठी उठले. त्यावेळी पोलिसांनी त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला. आव्हाड दुसऱ्या गाडीच्या पुढील बाजूस आव्हाड यांनी स्वत:ला झोकून दिलं. आव्हाड ही कार इंचभरही हलू देणार नाही अशा भूमिकेत थेट कारच्या खाली घुसले.