निफ्टी क्षेत्रीय निर्देशांकात केवळ आयटी (०.०१%), मिडिया (०.९६%), मेटल (०.३७%) समभागातील किरकोळ वाढ वगळता इतर समभागात घसरण झाली आहे. सर्वाधिक घसरण खाजगी बँक (१.४६%),एफएमसीजी (०.५९%),कंज्यूमर ड्युरेबल्स (०.९५%), हेल्थकेअर (०.६५%), पीएसयु बँक (०.६६%), फायनांशियल सर्व्हिसेस २५/५० (०.९३%) समभागात झाली. आज बीएसई (BSE) बाजारात ४२०८ समभागांपैकी १६६० समभागात वाढ झाली आहे तर २३९० समभागात घसरण झाली. एनएसईत (NSE) ३०३७ समभागापैकी ११३३ समभागात वाढ झाली आहे तर १८२० समभागात घसरण झाली आहे. विशेष म्हणजे बीएसईत १७७ समभाग लोअर सर्किटवर राहिले आहेत. खासकरून तिमाही निकालांच्या पार्श्वभूमीवर नाराज झालेल्या गुंतवणूकदारांना निराश करणारी आणखी एक बाब म्हणजे डिफेन्स समभागात झालेले नुकसान होय. तेजीत असलेल्या संरक्षण (Defence) क्षेत्रातील कंपन्यांच्या शेअर्सनी या आठवड्यात उलट दिशा घेतली. आठवड्यात निफ्टी संरक्षण निर्देशांक ४% पेक्षा जास्त घसरला आहे. माझगाव डॉक, भारत इलेक्ट्रॉनिक्स आणि बीडीएल समभागात घसरण झाली. विप्रोत मात्र २% पर्यंत वाढ झाल्याने आयटी समभगात आज आधार प्राप्त झाला. टाटा स्टील, एनएमडीसी सारख्या कंपनीच्या शेअर्समध्ये वाढ झाल्याने मेटल सेक्टरचा आधार निर्देशांकात राहिला.
अमेरिकेतील बाजारात काल आयटी समभागात झालेल्या वाढीमुळे रॅली होणे शक्य झाले होते. युएस राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या सततच्या अतिरिक्त टेरिफ वाढीच्या धमक्यांमुळे बाजारात अभूतपूर्व अस्थिरता कायम आहे. जपानमध्ये निर्यात आकडेवारीनंतर आशियाई बाजारात संमिश्र वातावरण होते. बँक ऑफ जपानकडून महागाई आकडेवारीही (Inflation 3.3%) कमी दर्शविली गेली असली तरी अजूनही बँकेच्या मर्यादा पातळीत (Tolerance Band) मध्ये नाही. परिणामी संमिश्रित आकडेवारी आशियाई बाजा रात कायम आहे. मात्र युएसमधील नव्या मजबूत आकडेवारीमुळे बाजारात आशावाद कायम आहे. MSCI Pacific Index हा आज ०.२% सकारात्मक पातळीवर असल्याने वाढीचा अंडरकरंट आशिया पॅसिफिक बाजारात दिसला. संध्याकाळपर्यंत आशियाई बाजारातील गिफ्ट निफ्टी (०.४६%), निकेयी (०.२१%), कोसपी (०.१३%) बाजारात घसरण झाली आहे तर वाढ हेंगसेंग (१.३२%), तैवान वेटेड (१.१५%), सेट कंपोझिट (०.७०%), शांघाई कंपोझिट (०.५०%), स्ट्रेट टाईम्स (०.६७%) समभागात वाढ झाली आहे. युरोपियन व युएस बाजारातील सुरूवातीच्या कलात सगळ्याच बाजारात वाढ झाली होती. युरोपियन बाजारात एफटीएसई (०.०९%), सीएसी (०.३५%), डीएएक्स (०.०७%) समभागात वाढ झाली आहे. सुरूवातीच्या कलात युएस बाजारात डाऊ जोन्स (०.१५%), एस अँड पी ५०० (०.१४%), नासडाक (०.७४%) वाढ झाली.
संध्याकाळपर्यंत सोन्याच्या जागतिक निर्देशांकात ०.३५% वाढ झाली असली तरी भारतीय बाजारपेठेत आज सोन्याच्या दरात घसरण झाली आहे. प्रामुख्याने सोन्याची घटती मागणी, ईटीएफ गुंतवणूकीला दिलेले प्राधान्य, टेरिफची अनिश्चितता, तसेच फेड गव्हर्नर क्रिस्तोफर वॉलर यांचे व्याजदरात कपात करण्याचे आश्वासक वक्तव्य या कारणांमुळे सोने स्वस्त झाले. चांदीतही घसरण कायम आहे. वाढत्या मागणीमुळे चांदी महागत असताना घटत्या मागणीमुळे आज पुन्हा चांदी स्वस्त झाली. औद्योगिक क्षेत्रातील वाढत्या मागणीमुळे सोन्याला पर्याय म्हणून चांदीकडे वळलेले गुंतवणूकदार,फेड गव्हर्नर क्रिस्तोफर वॉलर यांच्या व्याजदरावरील वक्तव्य या कारणांमुळे चांदी या आठवड्यातील सुरुवातीच्या काळात नव्या उच्चांकावर पोहोचली होती. आज मात्र चांदी घसरण्याबरोबर जागतिक सिल्वर फ्युचर निर्देशांकात घसरण सकाळी झाली तरी संध्याकाळपर्यंत वाढलेल्या Contract व्यवहारांमुळे निर्देशांक ०.९८%% वधारला आहे.
कच्च्या तेलाच्या निर्देशांकातही अनिश्चिततेमुळे संध्याकाळपर्यंत वाढ झाली आहे जी सकाळी घसरली होती. पुरवठ्याचा प्रमाणात दबाव पातळी निर्माण झाल्याने ही वाढ पुन्हा सुरू झाली. मध्यपूर्वत इस्त्राईलने आहे केलेल्या हल्ल्यानंतर पुन्हा चित्र बदलत आहे. तर रशियाच्या अंतर्गत अर्थव्यवस्थेला धोका निर्माण झाल्यानेही बाजारात अस्थिरता कायम आहे परिणामी कच्चे तेल महागात आहे. संध्याकाळपर्यंत कच्च्या तेलाच्या WTI Future निर्देशांकात ०.८६% वाढ झाली असून Brent Future निर्देशांकात संध्याकाळपर्यंत ०.६६% वाढ झाली आहे.आजही परदेशी युएस डॉलरच्या तुलनेत रुपयाची ४ पैशाने घसरण झाल्यानंतर परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी गुंतवणूक होल्ड किंवा विक्री केली असल्याची शक्यता आहे. शुक्रवारी रुपया सुरुवातीच्या वाढीला मागे टाकत ४ पैशांनी घसरून ८६.१६ (तात्पुरता) वर स्थिरावला. परदेशी निधीचा बाहेर पडण्याचा प्रवाह, जागतिक स्तरावर कच्च्या तेलाच्या वाढत्या किमती आणि देशांतर्गत शेअर बाजारातील मोठी घसरण यामुळे रुपयाचे मूल्य घसरले असल्याची शक्यता तज्ज्ञांकडूनही वर्तवली जात आहे.
अखेरच्या सत्रात सर्वाधिक वाढ जीएमडीसी (१४.७३%), सारेगामा इंडिया (४.०६%), पीव्हीआर आयनॉक्स (४.४३%), दालमिया भारत (२.८४%), एनएमडीसी (२.०७%),सम्मान कॅपिटल (३.९६%), रेमंड (३.१७%), विप्रो (२.४४%), बजाज फायनान्स (२.०३%), एचडीएफसी एएमसी (१.४५%), एमआरपीएल (१.१६%), आयआयएफएल फायनान्स (१.१३%),झेन टेक्नॉलॉजी (१.०२%), नेटवर्क १८ मिडिया (०.१८%), सिमेन्स (०.५८%), एचसीएल टेक्नॉलॉजी (०.३२%), बजाज फायनान्स (२.०३%), टाटा स्टील (१.५४%), इंटरग्लोब एव्हिऐशन (१.११%), ओएनजीसी (१.००%), इन्फोसिस (०.१६%) समभागात वाढ झाली आहे.
अखेरच्या सत्रात सर्वाधिक घसरण क्लिन सायन्स अँड टेक्नॉलॉजी (८.७५%), न्यूजेन सॉफ्टवेअर (६.१४%), आलोक इंडस्ट्रीज (५.५४%), डेटा पँटर्न (४.७७%), ॲक्सिस बँक (५.२२%),सीजी पॉवर (३.१६%), हिंदुस्थान एरोनॉटिक्स (२.८७%), पिरामल फार्मा (२. ६३%), रेमंड लाईफस्टाईल (२.३३%),माझगाव डॉक (२.१७%),मोतीलाल ओसवाल फायनान्स (२.१५%),अनंतराज (२.०३%), भारती एअरटेल (१.०५%), श्रीराम फायनान्स (३.००%), भारत इलेक्ट्रॉनिक्स (२.३४%), बजाज होल्डिंग्स (१.७९%),मदर्सन (१.५७%), टाटा पॉवर (१.३४%), कोटक महिंद्रा बँक (१.२८%), ब्रिटानिया इंडस्ट्रीज (१.२४%) समभागात झाली.
आजच्या बाजारातील परिस्थितीवर विश्लेषण करताना ज्येष्ठ बाजार अभ्यासक अजित भिडे म्हणाले,' आज आठवड्याचा शेवटचा दिवस, त्यामुळे आज मोठ्या पोझिशन पुढे नेण्यापेक्षा आजच सेटलमेंट करून बरेच मोठे फंड शनिवार रविवारपर्यंत काही टेरिफ संबंधित घोषणा होईल या भीतीने पोझिशन क्लिअर करताना आढलले. ब्रिक्स देशांवर १०%+२६= ३६% टेरिफ भारतावर अपेक्षित आहे. भारत या सगळ्यातून बाहेर पडेल. पण तात्पुरता बाजार खाली येण अपेक्षित आहेच. तसा तो आज आला.अनिश्चित वा तावरणात फार अपेक्षा बाजाराकडून ठेऊ शकत नाही.तसा हा काहीसा कल आहे. इतर देशांची टेरिफप्रमाणे कोणत्या उत्पादनावर आपल्याला कमी टेरिफ असावे, या सर्व गोष्टींचा अभ्यास सरकार करत आहेच. सुदैवाने विदेशी गुंतवणूकदारांकडून विक्री बऱ्या पैकी कमी झाली आहे. पण आपले टेरिफचे आकडे जाहीर झाल्यानंतर काय होईल हे पहाणे महत्वाचे आहे. 'सो फार सो गुड' अशी परिस्थिती आहे. आता खरा आपल्याला आपल्या म्युचल फंडांचा आधार असणार आहे. काही काल बाजार स्थिर रहाण्याकरिता एसआयपी (SIP) बंद न करीता लोकांनी सहकार्य करीत रहावे लागेल.बॅकांची ग्रोथ स्लो झाली आहे. नुवामाच्या रिपोर्टनुसार सर्व क्षेत्रात स्लो डाउन दिसत आहे. त्यामुळे आज अपेक्षेनुसार बाजार खाली आला आहे. पुढील आठवड्यात जर युकेशी झीरो ड्युटी टेरिफ करार भारताबरोबर झाला किंवा कसे अशा काही सकारात्मक बातम्यांवर बाजार अबलंबून आहे.'
आजच्या बाजारातील परिस्थितीवर विश्लेषण करताना बजाज ब्रोकिंग रिसर्चने आहे की,'१८ जुलै रोजी भारतीय बेंचमार्क निर्देशांक कमकुवत स्थितीत बंद झाले, व्यापक विक्रीच्या दबावामुळे निफ्टी २५,००० च्या महत्त्वपूर्ण पातळीच्या खाली घसरला. सेन्से क्स ५०१ .५१ अंकांनी किंवा ०.६१% ने घसरून ८१,७५७.७३ वर बंद झाला, तर निफ्टी १४३.०५ अंकांनी किंवा ०.५७% ने घसरून २४,९६८.४० वर बंद झाला. मीडिया आणि मेटल वगळता, सर्व क्षेत्रीय निर्देशांक लाल रंगात बंद झाले, फार्मा, खाजगी बँका, सार्वज निक क्षेत्रातील बँका, एफएमसीजी, भांडवली वस्तू, ग्राहक टिकाऊ वस्तू आणि दूरसंचार या निर्देशांकांमध्ये स्पष्ट कमकुवतपणा दिसून आला, ज्यांचे प्रमाण ०.५% आणि १% दरम्यान कमी झाले. व्यापक बाजारात नफाही वाढला, निफ्टी मिडकॅप आणि स्मॉलकॅप निर्देशांक अनुक्रमे ०.७% आणि ०.८% ने कमी झाले. संस्थात्मक आघाडीवर, काही महिन्यांच्या सततच्या गुंतवणूकीनंतर जुलैमध्ये एफआयआय निव्वळ विक्री करणारे बनले, जे जागतिक जोखीम टाळण्याकडे झुकण्याचे आणि सावध गुंतवणूक धोरणाचे संकेत देते. दरम्या न गुंतवणूकदारांचे लक्ष आर्थिक वर्ष २६ च्या पहिल्या तिमाहीच्या उत्पन्न हंगामाकडे वळले आहे, जिथे अपेक्षा अजूनही कमी आहेत.'
बाजारातील निफ्टीवर विश्लेषण करताना बजाज ब्रोकिंग रिसर्चने आहे की,' साप्ताहिक चार्टवरील निफ्टीने कमी उच्चांक आणि कमीत कमी निर्देशांकांसह मंदीचा मेणबत्ती (Weak Candle) बनवला, ज्यामुळे सलग तिसऱ्या आठवड्यात सुधारात्मक घसरणीचे संकेत मिळत राहिले. बाजारातील क्रियाकलाप मोठ्या प्रमाणात स्टॉक-विशिष्ट होते, मॅक्रो आणि मायक्रो दोन्ही आघाड्यांवर ठोस संकेतांची वाट पाहत होते. रिलायन्स इंडस्ट्रीज, आयसीआयसीआय बँक आणि एचडीएफसी बँक या प्रमुख निर्देशांकांच्या तिमाही निकालांमुळे सोमवारीच्या सत्रात बाजार अस्थिर राहण्याची अपेक्षा आहे. हे उत्पन्न पाहण्यासाठी एक महत्त्वाचे ट्रिगर म्हणून काम करेल. ट्रॅक करण्यासाठी महत्त्वाची पातळी २४९०० पातळीवर कायम आहे. त्याखाली सतत घसरण झाल्यास सुधारात्मक टप्पा २४ ६००-२४४०० पर्यंत वाढू शकतो. उलटपक्षी, वरचे होल्डिंग गेल्या आठवड्याच्या उच्चांकाकडे (२५२५५) तांत्रिक पुनरागमन सुरू करू शकते. तथापि, गेल्या आठवड्याच्या उच्चांकापेक्षा जास्त ब्रेकआउट केल्याने चालू सुधारणा थांबेल आणि जवळच्या काळात २५५००-२५६०० पर्यंत वाढण्याची शक्यता उघडेल.'
आजच्या बाजारातील बँक निफ्टीवर विश्लेषण करताना बजाज ब्रोकिंग रिसर्चने आहे की, बँक निफ्टीने सलग दुसऱ्या सत्रात उच्च पातळीवर नफा बुकिंग दर्शविणारा एक मोठा बेअर कॅन्डल तयार केला. शुक्रवारीच्या सत्रात निर्देशांकाने गेल्या १० सत्रांच्या एकत्रीकरण श्रेणी ५६५००-५७६०० ओलांडली आणि विस्तारित घसरण दर्शविली. त्यानंतरच्या कमकुवतपणामुळे ५५००० पातळींकडे आणखी घसरण होईल. ५६०००-५५५०० क्षेत्रावर महत्त्वाचा अल्पकालीन आधार ठेवण्यात आला आहे, जो ५०-दिवसांच्या EM A (Exponential Moving Average EMA)आणि प्रमुख रिट्रेसमेंट पातळीचा संगम (Consolidation) दर्शवितो.'
आजच्या बाजारातील निफ्टीवर भाष्य करताना एलकेपी सिक्युरिटीजचे वरिष्ठ तंत्रज्ञान विश्लेषक रूपक डे म्हणाले की, निफ्टी विक्रीच्या दबावाखाली राहिला, तो २४,९०० पर्यंत घसरला जिथे त्याला सुरुवातीचा आधार मिळाला. निर्देशांक ५० दिवसांच्या घातांकीय मूव्हिंग सरासरी (५०EMA) वर राहिला आणि तीव्र सुधारणांनंतर अल्पकालीन पुलबॅकसाठी सज्ज असल्याचे दिसून येते. तथापि, जोपर्यंत तो २५,२६० च्या खाली व्यवहार करतो तोपर्यंत तो 'विक्रीवर वाढ' राहतो. नकारात्मक बाजूने, जर तो २४,९०० च्या खाली आला तर विक्री तीव्र होऊ शकते."
आजच्या बाजारातील रूपयांच्या हालचालींवर भाष्य करताना एलकेपी सिक्युरिटीजचे उपाध्यक्ष रिसर्च विश्लेषक जतीन त्रिवेदी म्हणाले की,' अलिकडच्या सत्रांमध्ये कच्च्या तेलाच्या किमतींमध्ये वाढ होत राहिल्याने रुपया ०.०७% ने घसरला आहे ज्यामु ळे देशांतर्गत चलनावर दबाव वाढला आहे. भांडवली बाजारातील कमकुवत भावनांचा रुपयावर आणखी परिणाम झाला आहे, तर डॉलर निर्देशांकातील सकारात्मक संकेतांमुळे तो सतत दबावाखाली राहिला आहे. रुपयाची व्यापार श्रेणी आता ८५.८०-८६.४५ पर्यं त खाली सरकली आहे.'
आजच्या बाजारातील परिस्थितीवर विश्लेषण करताना जिओजित इन्व्हेसमेंट लिमिटेडचे हेड ऑफ रिसर्च विनोद नायर म्हणाले की,' वित्त आणि आयटी क्षेत्रातील निराशाजनक सुरुवातीच्या कमाई दरम्यान राष्ट्रीय बाजारात व्यापक विक्री दिसून आली. लार्जकॅप समभागांमधील वाढलेले मूल्यांकन आणि एफआयआयच्या महत्त्वपूर्ण निव्वळ शॉर्ट पोझिशन्समुळे गुंतवणूकदारांमध्ये सावधगिरीची भावना निर्माण झाली आहे. शिवाय रशियासोबतच्या व्यापार संबंधांवर अतिरिक्त टॅरिफ धोके देखील भारतावर सावली टाकत आहेत. या दबावांना न जुमानता कमी चलनवाढ पातळी आणि आर्थिक वाढ टिकवून ठेवण्यासाठी वचनबद्ध सक्रिय चलन प्राधिकरणामुळे भारतासाठी मध्यम ते दीर्घकालीन दृष्टीकोन आशावादी आहे.'
यामुळे विक्री दबावामुळे आठवड्याची अखेर घसलणीत झाली असली तरी तिमाही निकालानंतर बाजारातील पुन्हा पुढल्या आठवड्याची दिशा कशी असेल ते आगामी काळातील ब्लू चिप्स कंपनी, तसेच मिडकॅप,स्मॉलकॅपमधील क्षेत्रीय विशेष समभागातील एक त्रित कामगिरीबरोबरच युएस बाजारातील टेरिफ परिस्थितीचा भारतातील बाजारावर कितपत परिणाम होतो यावर पुढील आठवड्यात बाजाराचे भविष्य अवलंबून असणार आहे.