Gopichand Padalkar : मारहाण करणाऱ्या कार्यकर्त्याला का अडवलं नाही? प्रश्न विचारताच पडळकर म्हणाले...

मुंबई : विधान भवनाच्या प्रवेशद्वारावर १६ जुलै रोजी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड आणि भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांच्यात झालेल्या शाब्दिक चकमकीचे तीव्र पडसाद दुसऱ्या दिवशी, १७ जुलै रोजी उमटले. आव्हाड यांचा कार्यकर्ता नितीन देशमुख आणि पडळकर यांचा कार्यकर्ता ऋषिकेश टकले यांच्यात आधी शिवीगाळ झाली आणि त्यानंतर दोन्हीकडील कार्यकर्त्यांमध्ये प्रवेशद्वाराजवळील लॉबीत तुंबळ हाणामारी झाली.


या घटनेचे काही व्हिडिओ आता समोर आले आहेत. या व्हिडिओमध्ये पडळकर हे नितीन देशमुख यांच्याकडे पाहून कार्यकर्त्यांना काही निर्देश देताना दिसत असल्याने त्यांच्यावर संशयाची सुई फिरत आहे. याबद्दल पडळकर यांना विधिमंडळ परिसरात प्रसारमाध्यमांनी प्रश्न विचारले.


नितीन देशमुख यांना खुणवून कार्यकर्त्यांना मारहाणीचे आदेश दिले, असा थेट आरोप आमदार आव्हाड यांनी केला आहे. या आरोपावर विचारले असता पडळकर म्हणाले, "नितीन देशमुख हा माझ्या ओळखीचा कार्यकर्ता नाही. माझी लक्षवेधी होती, पण संबंधित मंत्री उपस्थित नसल्याने मी तेथून निघालो होतो, तेव्हा तो प्रसंग घडला. मला याबद्दल अजिबात काही बोलायचे नाही."


पडळकर यांनी आपली भूमिका स्पष्ट करताना सांगितले, "मी माझी भूमिका व्यक्त केली आहे. अध्यक्षांकडे जाऊन दिलगिरी व्यक्त केली आहे. माझ्या सहकाऱ्यांकडून चूक झाली आहे. तुम्ही कारवाई करावी. त्यामुळे हा अध्यक्षांच्या अधिकारातील कट आहे. संबंधित कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल झाला आहे. शेवटी कायदा सर्वश्रेष्ठ आहे." विधानसभा अध्यक्ष आणि सभापतींनी घेतलेल्या भूमिकेवर आमचे कुठलेही मत नाही, आम्ही कायद्याला मानणारे आहोत. जी कारवाई झाली, त्याला न्यायालयात सामोरे जाऊ, असेही पडळकर यांनी सांगितले.


तुम्ही मारहाण करणाऱ्या कार्यकर्त्यांना अडवायला का गेला नाहीत, असा प्रश्न विचारल्यावर पडळकर यांनी उत्तर देणे टाळत काढता पाय घेण्याचा प्रयत्न केला. 'ठीक आहे..' एवढेच म्हणत पडळकर यांनी हिंदीत बोलण्यास सुरुवात केली आणि ते तातडीने विधिमंडळात निघून गेले.

Comments
Add Comment

आयआयटी बॉम्बेकडून भारतासाठी ‘स्वदेशी एआय’ची तयारी

भारतीय भाषांसाठी नव्या तंत्रज्ञान युगाची सुरुवात मुंबई : देशातील कृत्रिम बुद्धिमत्ता क्षेत्रात ऐतिहासिक पाऊल

भोसरी भूखंड घोटाळ्यात एकनाथ खडसे यांना दणका

दोषमुक्तीबाबतचा अर्ज विशेष न्यायालयाने फेटाळला मुंबई : एकनाथ खडसे यांनी महसूल मंत्री असताना आपल्या पदाचा

कस्तुरबा रुग्णालयातील बर्न्स केअर कक्षाची होणार सुधारणा

आयसीयूसह सर्वसाधारण खाटांची जागा सुसज्ज मुंबई : संसर्गजन्य रोगाच्या आजारांसाठी असलेल्या कस्तुरबा

जुनी शालेय इमारत पाडताना पोर्टेबल पर्यायी शाळा आसपासच सुरु करणार

पुनर्विकास करण्यात येणाऱ्या शालेय इमारतींसाठी महापालिकेने उचलले असे पाऊल मुंबई : माहिममधील महापालिका शाळा

मुंबईतील पूर्व उपनगरातील ८ नाल्यांवर ट्रॅश बूम

उर्वरीत ८ नाल्यांवर सीएसआर निधीतून बसवणार ही प्रणाली मुंबई : उपनगरामधील विविध नाल्यांतील तरंगता कचरा जमा करणे,

GPS Tracker : नातवाच्या हुशारीमुळे सापडली हरवलेली आजी ,माळेतल्या जीपीएस ट्रॅकरची कमाल !

मुंबई : नातवाने GPS ट्रॅकर वापरून हरवलेल्या आजीला शोधून काढले.मोबाइलच्या तंत्रज्ञानाचा योग्य वापर करत त्याने