मुंबईतील पूर्व उपनगरातील ८ नाल्यांवर ट्रॅश बूम

उर्वरीत ८ नाल्यांवर सीएसआर निधीतून बसवणार ही प्रणाली


मुंबई : उपनगरामधील विविध नाल्यांतील तरंगता कचरा जमा करणे, बाहेर काढणे व त्याची विल्हेवाट लावण्याकरीता ट्रॅश बुमसहित तराफा आरुढ कचरा वाहक प्रणालीचा बसवण्यात आली आहे. परंतु मुंबईत १६ ठिकाणी या प्रणालीचा वापर करण्यात येणार होता, पण प्रत्यक्षात ८ ठिकाणीच याचा वापर करण्यात येत आहे. त्यामुळे उर्वरीत ठिकाणी सीएसआर निधीतून ही प्रणाली बसवण्यात येत आहे. त्यामुळे यावर होणारा महापालिकेचा कोट्यवधी रुपयांचा खर्च वाचला गेला आहे.


राष्ट्रीय हरित न्यायाधिकरण यांनी ऑक्टोबर २०२० रोजी पारित केलेल्या आदेशात मुंबई महानगरपालिकेला खारफुटीचा भाग प्लास्टिक मुक्त ठेवण्याकरिता नाले आणि नद्यांमधील तरंगता कचरा वाहून समुद्रात थेट जाण्यापासून रोखण्याकरीता योग्यती कार्यवाही करण्याचे निर्देश दिलेले आहेत. तसेच तरंगता प्लास्टिक व इतर कचरा जमा करुन त्याची विल्हेवाट लावण्याकरिता ट्रॅश बुम बसविण्याची शिफारस केलेली होती.


त्या अनुषंगाने पुर्व उपनगरातील एकुण १६ नाल्यांमधील तरंगता कचरा जमा करणे, बाहेर काढणे व त्याची विल्हेवाट लावण्याकरीता ट्रॅश बुमसहित तराफा आरुढ कचरा वाहक प्रणाली बसवणे आणि त्याचा पुढील ०५ वर्षांची देखभाल करणे करणे यासाठी निविदा मागवून कंत्राटदारांची निवड केली. पण या१६ ठिकाणी ट्रॅश बुम बसविण्याऐवजी आवश्यकतेनुसार ८ ठिकाणी ट्रॅश बुम प्रणाली कंत्राटदार व्हर्गो स्पेशालिटीज प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीकडून बसवण्यात आली. यासाठी ४३.८९ कोटी रुपये मंजूर करण्यात आले होते. त्यानुसार पूर्व उपनगरातील बॉम्बे ऑक्सिजन नाला, पंत नगर नाला, ब्राऊंड्री नाला, नानेपाडा नाला, मानखुर्द नाला, वाशीनाका नाला आणि सोमय्या नाला आदी ठिकाणी या ट्रॅश बूमचा वापर करण्यात आला आहे.


अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, १६ ठिकाणी ट्रॅश बूम बसवण्याचा निर्णय घेतला होता, परंतु कंत्राट मंजूरीच्या वेळी या कामाचे स्वरुप कमी करण्यात आली आहे. त्यामुळे ८ ठिकाणी या ट्रॅशबूमचा वापर केला गेला आहे. त्यानुसार आता सीएसआर निधीतून सुभाष नगर नाला, राहुल नगर,माहुल खाडी आदी ठिकाणी ट्रॅशबूम बसवण्यात आले असून उर्वरीत ठिकाणीही बसवण्याचा विचार सुरु असल्याचे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. दरम्यान, हे ट्रॅशबूमचे तंत्रज्ञान नवीन असल्याने तसेच प्रथमच याचा वापर केला जात असल्याने याचे थर्ड पार्टी ऑडीट करण्यासाठी भारतीय तंत्रज्ञान संस्था मुंबई (आय आय टी मुंबई) यांची नेमणूक करण्यात आली असल्याचेही अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.

Comments
Add Comment

Chandrashekhar Bawankule : विरार-अलिबाग बहुउद्देशीय मार्गिकेसाठी पालघरमधील जमीन देण्याचा निर्णय

मुंबई : फडणवीस सरकारच्या महत्त्वाकांक्षी 'विरार ते अलिबाग बहुउद्देशीय वाहतूक मार्गिका' प्रकल्पाच्या कामाला गती

Nitesh Rane : मंत्री नितेश राणे यांनी घेतला वाढवण बंदर प्रकल्पाच्या आराखड्याचा आढावा

मुंबई : पालघर जिल्ह्यात केंद्र व राज्य शासनाच्या संयुक्त सहभागातून विकसित होत असलेल्या अत्यंत महत्त्वाकांक्षी

Cashless Petrocard : राज्यातील रुग्णवाहिकांसाठी आता 'कॅशलेस पेट्रोकार्ड'

- आरोग्यमंत्र्यांचे हस्ते उद्घाटन; इंधनाच्या कारणांवरून होणारे रुग्णांचे हाल थांबणार मुंबई : "राज्यातील आरोग्य

Nitesh Rane : 'नीट' हे निमित्त, 'एफसीआरए' विधेयक रोखण्याचे उद्दिष्ट!

- मंत्री नितेश राणे यांचे परखड भाष्य; देशविरोधी शक्तींकडून 'जेन झी' तरुणांचा वापर मुंबई : ‘नीट’ पेपरफुटीच्या आधारे

Mumbai News : पास्तात निघाले झुरळ! लोअर परळमधील लोकप्रिय प्ले झोनमध्ये खळबळ; व्हिडिओ व्हायरल

मुंबई : मुंबईतील लोअर परळ येथील एका लोकप्रिय मुलांच्या प्ले झोनमध्ये दिलेल्या पास्तामध्ये झुरळ आढळल्याचा गंभीर

Aggregator License : 'ॲग्रीगेटर लायसन्स'शिवाय ओला, उबर धावल्यास कारवाई

१ सप्टेंबरची डेडलाईन; प्रवासासाठी वापर होणाऱ्या बाईक, रिक्षा, कॅबची व्यावसायिक वाहन म्हणून नोंदणी