अनुभवी गुंतवणूकदारांसाठी स्मार्टर इन्व्हेस्टिंग
नवी दिल्ली: डीएसपी म्युचल फंड (DSP MF) ने आज एंड्युरन्स एसआयएफ (Specialised Investment Fund SIF) लाँच केले आहे. हे एक नवीन गुंतवणूक व्यासपीठ असणार आहे. ज्यांना गुंतवणूकीतील अनुभव आहे अशांसाठी हा अधिक पूरक असणार आहे असे कंपनीने लाँच दरम्यान म्हटले आहे. जो पारंपारिक म्युच्युअल फंड आणि वैयक्तिकृत पोर्टफोलिओ व्यवस्थापन (Personalised Portfolio Management) यांच्यातील अंतर भरून काढतो. हे एका मजबूत नियामक चौकटीसह बेस्पोक पोर्टफोलिओ (Bespoke Portfolio)धोरणांची लवचिकता (Flexibility) देते, ज्यामुळे नवोपक्रम शिस्त किंवा गुंतवणूकदारांच्या संरक्षणाच्या किंमतीवर येत नाही याची खात्री होते. 'एंड्युरन्स नावाप्रमाणेच गुंतवणूकदारांना परिपूर्ण परतावा देण्याचा दृष्टिकोन देण्यासाठी आणि त्यांना दीर्घकाळ गुंतवणूक करण्यास मदत करण्यासाठी गुंतवणूक आणि जोखीम व्यवस्थापनाची पहिली तत्त्वे लागू करण्याचा उद्देश आहे जेणेकरून ते चक्रवाढीचा फायदा घेऊ शकतील. येथे आपण आमच्या २८ वर्षांच्या म्युच्युअल फंड कौशल्याचा आणि गेल्या १२ वर्षांच्या हेज फंड कौशल्याचा - वापर करू ज्याचा आमच्या काही जागतिक गुंतवणूकदारांनी फायदा घेतला आहे,' असे डीएसपी म्युचल फंडचे व्यवस्थापकीय संचालक आणि सीईओ कल्पेन पारेख लाँच दरम्यान म्हटले आहेत.
यापूर्वी इतर म्युचल फंड कंपन्यांनीही एसआयएफ फंड बाजारात आणला होता. यापूर्वी डीएसपी म्युचल फंडाने पहिलावहिला जागतिक दर्जाचा ऑफशोअर ग्लोबल इक्विटी फंड गिफ्ट सिटीत काढला आहे. ५००० डॉलर पर्यंत विविधता असलेली गुंतवणूक एका फंडातून काढण्यासाठी कंपनीने हा ग्लोबल फंड यापूर्वी बाजारात आणला होता. आता ग्राहकांची नवी गरज ओळखून कंपनीने एसआयएफ फंड आणला आहे. नुकतेच डीएसपी असेट मॅनेजरने ओएनडीसी (Open Network for Digital Commerce ONDC) माध्यमातून सायब्रिला (Cybrilla) कंपनीशी हातमिळवणी केली होती. अधिक जाणून घेण्यासाठी, https://www.dspim.com/endurancesif ला भेट द्या आणि DSP MF प्रतिनिधींशी संपर्क साधा असे कंपनीने म्हटले.
SIF म्हणजे नक्की काय?
एसआयएफ (Systematic Investment Fund) हा सिक्युरिटीज एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया (SEBI) ने लवचिक, थीम-आधारित धोरणे ऑफर करण्यासाठी सादर केलेला एक नवीन गुंतवणूक उत्पादन आहे. ते नेहमीच्या फंडांच्या पलीकडे पोर्टफोलिओ शोध णाऱ्या अत्याधुनिक रिटेल आणि उच्च उत्पन्न गुंतवणूक गट (High Net Income HNI) गुंतवणूकदारांना लक्ष्य करतात.अधिक लवचिकता प्रदान करताना एसआयएफ (SIF) अजूनही SEBI ने स्थापित केलेल्या नियामक चौकटीत काम करतात मात्र ते चांगल्या उत्पन्नासाठी वेगळ्या प्रकारे बनवले असतात जे गुंतवणूकदारांना काही प्रमाणात संरक्षण देतात. परंतु या फंडांला संख्या त्मकदृष्ट्या जोखीम (Risk) देखील असते. परंतु सोप्या गुंतवणूक पर्यायांच्या तुलनेत त्यात वाढलेली जोखीम देखील असते. एसआयएफ मध्ये सामान्यतः १० लाखांची किमान गुंतवणूक आवश्यक असते.
DSP म्युच्युअल फंडबद्दल -
DSP म्युचल फंड २५ वर्षांहून अधिक काळ या क्षेत्रात कार्यरत आहे. सगळ्या प्रकारच्या गुंतवणूकदारांच्या पोर्टफोलिओचे व्यवस्थापन कंपनी करते. यापूर्वी कंपनीने दिलेल्या माहितीनुसार कंपनीला ६० लाखांहून अधिक गुंतवणूकदारांसाठी पैसे व्यवस्थापित कर ण्याचा मान मिळाला आहे. कष्टकरी पगारदार व्यक्ती, उच्च संपत्ती असलेल्या व्यक्ती, अनिवासी भारतीय, लहान आणि मध्यम आकाराचे व्यवसाय मालक, मोठ्या खाजगी आणि सार्वजनिक कंपन्या, ट्रस्ट आणि परदेशी संस्था सगळ्या उत्पन्न गटातील ग्राहकांनी म्युचल फंड गुंतवणूक केली आहे. डीएसपी म्युचल फंड (DSP Mutual Fund) कंपनीला १६०+ वर्षे जुन्या डीएसपी ग्रुपचे पाठबळ आहे. गेल्या दीड शतकांपासून,भारतात भांडवल बाजार आणि पैसा व्यवस्थापन व्यवसायाच्या वाढीमध्ये, व्यावसायिकीकरणात समूहामागील डीएसपी कुटुंब समुह कार्यरत आहे.