अमरावती : अमरावती मधी वलगांव येथे नव्याने पुलाचे बांधकाम करण्यात आले आहे. या पुलाला संरक्षक कठडे नसल्याने दारूच्या नशेत धुंद व्यक्ती ७० फूट खाली पडला. मात्र, नंतर या बेवड्याने सर्वांना चकित करणारा थरारक प्रकार घडवला. पुलावरून तब्बल ७० फुट खाली हा इसम कोसळला. तेथे उपस्थित नागरिकांनी धैर्य दाखवत त्याला खांद्यावर उचलून रस्त्यावर आणले. पण यानंतर घडलेल्या प्रकाराने सर्वांचे डोळे विस्फारले!
रस्त्यावर आणल्यानंतर हा इसम नशेत नागमोडी चालत स्वत:च्या पायाने गाडीकडे निघाला. असं की त्याला काहीच झालं नाही. उपस्थित लोकांनी या बेपर्वा वृत्तीवर संताप व्यक्त केला. पण तो नशेत तरर्र असल्याने काही पावलं चालताच पुन्हा जमिनीवर कोसळला.
यावेळी वलगांव पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली आणि या व्यक्तीला प्राथमिक उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. हा प्रकार परिसरात चर्चेचा विषय बनला आहे.सदर ईसम हा दुचाकीने अमरावतीहून परतवाडाकडे जात होता. नव्याने बांधलेल्या वलगांव येथील पुलाचा सुरूवातीला आणि शेवटी संरक्षक कठडे नसल्याने तोल जाऊन हा अपघात घडला.