Ujjwal Nikam : "निवडणूक हरलो जरी तरी मी विझलो नव्हतो", खासदार उज्वल निकम झाले भावुक

मुंबई : "जरी मी निवडणूक हरलो होतो तरी मी विझलो नव्हतो", पण "त्यांना" हे कळले नाही... अशा भावना राज्यसभेचे नवनियुक्त खासदार एँड उज्वल निकम यांनी आपल्या सत्काराला उत्तर देताना व्यक्त केल्या.

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या १२ किल्ल्यांना युनोस्कोचा जागतिक मानांकन मिळण्याच्या कार्यात मोठे योगदान दिल्याबद्दल सांस्कृतिक कार्य मंत्री एँड आशिष शेलार यांचा आणि राज्यसभेत नियुक्ती झाल्याबद्दल एँड उज्वल निकम यांचा काल संध्याकाळी. सांताक्रूझ येथे भाजपा उत्तर मध्य मुंबई जिल्ह्यातर्फे जाहीर सत्कार करण्यात आला.



यावेळी बोलताना एँड उज्वल निकम यांनी सांगितले की, मुंबई महापालिकेची निवडणूक आपल्याला जिंकायची आहे. पण कार्यकर्त्यांनी सावध राहायला हवे, रात्र वैऱ्याची आहे. कारण फेक नेरेटीव्ह आणि खोट्या अफवा पसरवणाऱ्यांपासून आपल्याला सावध रहायला हवे. भाषेच्या नावाने असेच फेक नेरेटीव्ह पसरवले जात आहे, असे सांगतानाच लोकसभेच्या वेळी आपण या फेक नेरेटीव्हचे बळी पडलो. म्हणून अधिक सावध रहायला हवे, मला तर काँग्रेसने निवडणूकीत देशद्रोही ठरवले. माझ्यासाठी हा धक्काच होता. देशाच्या विरोधात मी विचार ही करु शकत नाही. मला त्या रात्री झोप लागली नाही. मी न्यायालयात जाऊन त्यांच्या विरोधात लढलो असतो पण त्याने आरोप करणाऱ्यांनाच अधिक प्रसिद्ध मिळाली असती म्हणून मी टाळले. त्यामुळे अशा लोकांपासून भाजपा कार्यकर्त्यांनी सावध रहायला हवे, असे आवाहन एँड निकम केले.

भाजपा आणि अन्य पक्षात फरक : मंत्री आशिष शेलार


यावेळी मंत्री एँड आशिष शेलार म्हणाले की, राज्य सभेवर पाठवण्याची वेळ आली त्यावेळी शरद पवार यांच्या पक्षाने त्यावेळी मुंबईकरांसाठी लढणाऱ्या वकिलाला पाठवले नाही. मुंबई बाँम्ब स्फोटातील आरोपी याकूब आणि अन्य देशविरोधी खटल्यातील आरोपींची बाजू घेऊन लढणाऱ्या वकिलाला तुम्ही राज्यसभेत पाठवलेत. भाजपाने याकूब, कसाबला फाशीची शिक्षा व्हावी म्हणून लढणाऱ्या मुंबईकरांच्या वकिल एँड उज्वल निकम यांना भाजपाने पाठवले हा फरक आहे. तसेच उबाठाने तर बाँम्ब स्फोटातील शिक्षा भोगून आलेल्या मुसा याला घेऊन प्रचार केला तर याकूबला फाशी होऊ नये म्हणून काँग्रेसचे आमदार स्वाक्षरी मोहीम राबवत होते, त्यांना मंत्री करण्याचे काम काँग्रेसने केले. उद्धव ठाकरे यांच्या मंत्री मंडळात हे सहभागी होते. म्हणून भाजपा आणि अन्य पक्षात फरक आहे, अशा शब्दांत मंत्री आशिष शेलार यांनी विरोधी पक्षावर हल्ला चढवला. सांताक्रूझ येथे झालेल्या कार्यक्रमाला आमदार एँड पराग अळवणी, संजय उपाध्याय, जिल्हा अध्यक्ष विरेंद्र म्हात्रे, सुशम सावंत, महेश पारकर, अँड दिनानाथ तिवारी आणि जिल्ह्यातील पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Comments
Add Comment

BMC News : मालाड धारवलीत अनधिकृत डेब्रीज टाकणाऱ्यांविरोधात एफआयआर; महापालिकेने कंबर कसली, आता यापुढे गय केली जाणार नाही!

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई महानगरपालिकेने बांधकाम व पाडकामाचा रोडारोड्याची अनधिकृत विल्हेवाट

BMC News : मुंबईत स्मार्ट कृत्रिम टर्फ धोरणाची मागणी; महापालिकेचा महसूल वाढवण्यासाठी नगरसेवकाने केली सूचना

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबईकरांचे मोकळे मैदान, सार्वजनिक शांतता आणि आरोग्य अबाधित ठेवण्यासाठी, 'कृत्रिम टर्फ'

Railways Act : रेल्वे कायदा, १९८९ मध्ये सुधारणा, विनातिकीट प्रवास आणि आरक्षित डब्यात प्रवेशावर वाढला दंड

मुंबई : रेल्वे कायदा, १९८९ मधील काही प्रमुख तरतुदींमध्ये सुधारणा करण्यात आली असून, अनधिकृत प्रवास, आरक्षित

PoP ban : पीओपी बंदीवर अंतिम निर्णयाची प्रतीक्षा, राज्य सरकारच्या भूमिकेवर न्यायालयाचे ताशेरे

मुंबई : पर्यावरणस्नेही सण-उत्सवांना प्रोत्साहन देण्याच्या पार्श्वभूमीवर प्लास्टर ऑफ पॅरिस (पीओपी)

Minister Gulabrao Patil : सिंधुदुर्गला मोठा दिलासा! वेंगुर्ला-चिपी पाणीपुरवठा योजनेला गती; एका महिन्यात अहवाल सादर करण्याचे गुलाबराव पाटील यांचे निर्देश

मुंबई : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तिलारी प्रकल्पावर आधारित वेंगुर्ला ते चिपी विमानतळ पाणीपुरवठा योजनेच्या

Devendra Fadnavis : २०३० पर्यंत राज्यात ३०० किमी नवे मेट्रो मार्ग सुरू होणार

- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस; प्रत्येक प्रकल्प तीन वर्षांत पूर्ण करण्याचे नियोजन मुंबई : "राज्यातील मुंबई, पुणे