विधानसभेत गाजला हनीट्रॅपचा मुद्दा, पटोलेंनी दाखवला पेनड्राईव्ह


मुंबई : राज्याच्या पावसाळी अधिवेशनाचा शेवटचा आठवडा सुरू आहे. विधानसभेत गुरुवारी हनीट्रॅपचा मुद्दा उपस्थित झाला. काँग्रेस आमदार नाना पटोले यांनी हा मुद्दा उपस्थित केला. 'मुंबईत मंत्रालय, तसेच नाशिक आणि ठाणे जिल्हा ही हनीट्रॅपची केंद्र झाली आहेत. राज्यातील किमान ७२ महत्त्वाच्या व्यक्ती हनीट्रॅपला बळी पडल्या आहेत. राज्याशी संबंधित महत्त्वाची माहिती हनीट्रॅपमुळे आता चुकीच्या लोकांच्या हाती पडली आहे. महाराष्ट्राची बदनामी होत आहे. या बाबत महाराष्ट्र शासनाचे मंत्री काही उत्तरही दे नाहीत' असा गंभीर आरोप नाना पटोले यांनी केला.


हनीट्रॅपमुळे राज्यातील गोपनीय शासकीय कागदपत्रे आणि माहिती चुकीच्या लोकांच्या हाती पडली आहे. गोपनीय माहिती राज्याबाहेर गेली आहे. काही आयएसएस अधिकारी, मंत्री हे पण हनीट्रॅपला बळी पडल्याचा आरोप करत नाना पटोले यांनी सभागृहात एक पेनड्राईव्ह दाखवला. पेनड्राईव्ह दाखवून कोणाचे चरित्रहनन करायचे नाही. पण एवढ्या गंभीर प्रश्नावर सरकार साधे निवेदनही करत नाहीत. या राज्यात नेमके काय सुरु आहे ? असा प्रश्न नाना पटोलेंनी उपस्थित केला.


नानांच्या वक्तव्यावर राज्य शासनाने पावसाळी अधिवेशन संपण्याआधी निवेदन द्यावे, असे निर्देश विधानसभाध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिले. तर विधानसभाध्यक्षांच्या आदेशाचे पालन होईल असे आश्वासन राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले. राज्य शासनाने आरोप गांभीर्याने घेतले आहेत, असेही ते म्हणाले.


राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आश्वासन दिल्यानंतरही शिउबाठाचे आमदार भास्कर जाधव उभे राहिले आणि म्हणाले, “गुरुवारी राज्याचे गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी माध्यमांसमोर जाहीर विधान केले आहे की, नाशिकच्या आणि ठाण्याच्या माणसानेसुद्धा दिलेली तक्रार मागे घेतली. सेटलमेंट करून प्रकरण मिटवले आहे. तर आता उपमुख्यमंत्री म्हणतात की, आम्ही हे प्रकरण गांभीर्याने घेऊ. हे सरकार सभागृहाचे आणि राज्याच्या जनतेची दिशाभूल करत आहे का?” असा गंभीर आरोप केला. यावर स्पष्टीकरण देताना गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी स्पष्टीकरण दिले की, “मी ज्या प्रकरणाची माहिती दिली ते वेगळे प्रकरण आहे. ती तक्रार हनीट्रॅपची नव्हती.” यावरून विरोधकांनी गोंधळ घातला. भास्कर जाधव यांनी आमच्याकडे नावे असल्याचा दावा केला. त्यानंतर विरोधकांनी सत्ताधाऱ्यांविरोधात घोषणाबाजी केली.


Comments
Add Comment

पाऊस पडल्यामुळे मुंबईची हवा झाली एकदम 'स्वच्छ'!

मुंबई : मुंबईत रात्री झालेल्या पावसामुळे मुंबईकरांना काही दिवसांपासूनच्या उष्णतेपासून आणि प्रदूषणापासून थोडा

शेतकऱ्यांप्रमाणे मच्छीमारांना सवलतीच्या दरात वीज

मंत्री नितेश राणेंच्या प्रयत्नांना यश; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वीज सवलतीची केली घोषणा मुंबई : राज्य

मुंबईनजिक बांधणार देशातील सर्वाधिक लांबीची भिंत! पण यामागचे कारण काय?

मुंबई : पालघर जिल्ह्यात बांधले जाणारे वाढवण बंदर हा केंद्र सरकारचा एक खूप महत्त्वाचा प्रकल्प आहे. या बंदरात

दिवाळी रोजगार मेळाव्यात मोदींनी ५१,००० हून अधिक जणांना दिली नोकरी

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज 'रोजगार मेळाव्यात' ५१,००० हून अधिक तरुणांना नोकरीची पत्रे दिली.

मतदारांसाठी निवडणूक आयोगाचे नवे नियम; गरजेच्या किमान सुविधा देणे बंधनकारक

नवी दिल्ली : भारतीय निवडणूक आयोगाने सर्व राज्यांच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांना एक महत्त्वाचा आदेश दिला आहे.

मनसे दीपोत्सवात ड्रोन उडवणाऱ्यांवर गुन्हा दाखल

मुंबई : शिवाजी पार्क पोलिसांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या दीपोत्सव कार्यक्रमात ड्रोन उडवणाऱ्या अनेक