UAPA कायद्याविरोधातील याचिका उच्च न्यायालयाने फेटाळली

मुंबई : वंचित बहुजन आघाडीने UAPA कायद्याविरोधात दाखल केलेली याचिका आज मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळली आहे. या कायद्याच्या विरोधात सर्वोच्च न्यायालयात जाण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे, असे वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी सांगितले.

ॲड. आंबेडकर म्हणाले की, “UAPA कायद्याअंतर्गत प्रतिबंधात्मक अटकेखाली अटक करून व्यक्तींवर गुन्हेगारी कारवाई केली जाते. राज्यघटनेनुसार केवळ संरक्षण, परराष्ट्र व्यवहार आणि देशाची सुरक्षा या तीन मुद्द्यांवरच प्रतिबंधात्मक अटक केली जाऊ शकते. परंतु UAPA कायदा या तत्त्वांचे उल्लंघन करून व्यक्तींच्या मूलभूत अधिकारांचा छळ करतो, म्हणूनच आम्ही या कायद्याला आव्हान दिले होते.” त्यांनी स्पष्ट केले की, मुंबई उच्च न्यायालयाने ही याचिका कोणत्या मुद्द्यांवर फेटाळली हे आम्ही तपासून पाहणार आहोत व या विरोधात सर्वोच्च न्यायालयात लढा देणार आहोत.
Comments
Add Comment

एसटी बसस्थानक स्वच्छतेसाठी दर १५ दिवसांनी विशेष मोहीम — प्रवाशांच्या सुरक्षित, आरोग्यदायी प्रवासासाठी एसटी महामंडळाचा पुढाकार

मुंबई : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या सर्व बसस्थानकांवर, बसस्थानक परिसरात तसेच प्रशासकीय

उमेदवारी अर्ज, प्रचार रथ, झेंडे आणि प्रचार साहित्यांची खरेदी आणि उबाठाने कापला पत्ता...

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : वडाळ्यातील माजी नगरसेवक अमेय घोले यांनी उबाठाला राम राम ठोकत शिवसेनेत प्रवेश

भांडुप बेस्ट अपघात प्रकरणी बेस्टतर्फे चौकशी

मृतांना बेस्ट तर्फे २ लाख,र मुख्यमंत्र्यांकडून ५ लाखांची मदत मुंबई : सोमवारी रात्री भांडुप पश्चिम या

आज मध्यरात्री उशिरापर्यंत धावणार 'मेट्रो १'

मुंबईकरांना इच्छितस्थळी जाणे सुकर होणार मुंबई : घाटकोपर,वर्सोवा,अंधेरी मेट्रो-१ मार्गिकेवरील सेवा उद्या

१ ते ३१ जानेवारी दरम्यान राज्यात ‘रस्ता सुरक्षा अभियान’

मुंबई : रस्ते अपघातांमध्ये होणारी जीवितहानी कमी करण्यासाठी आणि नागरिकांमध्ये रस्ता सुरक्षेविषयी जनजागृती

मतदानाच्या दिवशी, १५ जानेवारी रोजी भरपगारी सुट्टी

मुंबई : राज्यातील सर्व सरकारी,निमसरकारी आणि खासगी आस्थापना मधील सर्व कर्मचाऱ्यांना यंदाची संक्रात पावली आहे. १५