प्रतिनिधी: आजपासून मोनिका अल्कोबेव लिमिटेड कंपनीचा एसएमई आयपीओ (SME IPO) बाजारात गुंतवणूकदारांसाठी दाखल होत आहे. १६५.६३ कोटींचा लघु मध्यम उद्योग कंपनीचा आयपीओ एसएमई (BSE SME) प्रवर्गात सादर होणार आहे. १६ ते १८ जुलैपर्यंत या आयपीओत गुंतवणूकदार आपली बोली (Bidding) लावू शकतात. कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, आयपीओसाठी कंपनीने २७१ ते २८६ रूपये प्रति समभाग इतका प्राईज बँड (Price Band) कंपनीने निश्चित केला आहे.
माहितीनुसार,कंपनीच्या आयपीओत किरकोळ गुंतवणूकदारांना कमीत कमी २१६८०० रूपयांची गुंतवणूक करणे अनिवार्य असणार आहे. १२०० शेअर्सचे ३ गठ्ठे (Lot) किरकोळ गुंतवणूकदार (Retail Investors) यांच्यासाठी खरेदी करणे आवश्यक असेल.
कंपनीच्या माहितीनुसार, २३ जुलैपर्यंत कंपनी शेअर बाजारात सूचीबद्ध (Listed) होण्याची शक्यता आहे. पात्र गुंतवणूकदारांना समभागाचे वाटप २१ जुलैपर्यंत करण्यात येणार आहे. मारवाडी चंद्रना इंटरमिजियरीज ब्रोकर्स लिमिटेड ही कंपनी आयपीओसाठी बुक लिडिंग मॅनेजर म्हणून कार्यरत राहणार असून एमयुएफजी इनटाईम इंडिया प्रायव्हेट लिमिटेड (MUFG Intime India private limited) कंपनी आयपीओसाठी रजिस्ट्रार म्हणून काम करणार आहे. मार्केट मेकर (Market Maker) म्हणून भन्साली व्हॅल्यु क्रिऐशन प्रायव्हेट लिमिटेड कंपनी काम पाहणार आहे. किरकोळ गुंतवणूकदारांना अर्ज करण्यासाठी ८०० शेअर खरेदीसाठी अर्ज करावा लागणार आहे. एकूणच ५७९१२०० समभागांचा (Shares) चा पब्लिक इश्यू असणार आहे ज्यामध्ये ४१७६०० समभाग मार्केट मेकरसाठी आरक्षित असणार आहेत व ४३७३६०० समभागांचा हा इश्यू विक्रीसाठी उपलब्ध असेल. आयपीओसाठी ऑफर फॉर सेल (OFS) साठी २८.६० कोटी मूल्यांकनाचे समभाग उपलब्ध असणार आहेत. आयपीओपूर्वीच कंपनीने ४६.०६ कोटी निधीची उभारणी अँकर गुंतवणूकदारांकडून केली आहे.
एकूण आयपीओतील गुंतवणूकीसाठी उपलब्ध असलेल्या हिस्सापैकी, मार्केट मेकरसाठी ७.२१%, पात्र संस्थात्मक गुंतवणूकदारांसाठी (Qualified Institutional Buyers QIB) ४६.३७%, विना संस्थात्मक गुंतवणूकदार (Non Institutional Investors NII) १३.९२%, किरकोळ गुंतवणूकदारांसाठी (Retail Investors) ३२.४९% वाटा गुंतवणूकीसाठी उपलब्ध असणार आहे.
कंपनीबद्दल -
भिमजी नानजी पटेल, कुणाल भिमजी पटेल हे कंपनीचे प्रवर्तक (Promoter) आहेत. आयपीओआधी प्रवर्तकांचा हिस्सा ७९.९६% होता जो आयपीओ सूचीबद्ध झाल्यानंतर ६२.०८% वर खाली येऊ शकतो.
२०१५ साली ही कंपनी स्थापन झाली होती. लक्झरी सेगमेंटमधील मद्य व्यवसायाशी कंपनी संबंधित आहे. भारतीय उपखंडात कंपनी मद्य आयात करून त्याचे वितरण प्रामुख्याने करते. ७० पेक्षा अधिक मद्य ब्रँडचे कंपनी वितरण करते.
कंपनीच्या आर्थिक परिस्थितीबद्दल -
अधिकृत माहितीनुसार, कंपनीला आर्थिक वर्ष मार्च २०२४ ते मार्च २०२५ मध्ये ३९% करोत्तर नफा (Profit after tax PAT) प्राप्त झाला होता तर कंपनीच्या महसूलात गतवर्षीच्या तुलनेत २५% वाढ झाली होती. आर्थिक वर्ष २०२५ मधील मार्च महिन्यात कंपनीच्या महसूलात गेल्या वर्षीच्या मार्च महिन्यातील १९१.२८ कोटी तुलनेत वाढत २३८.३६ कोटींचा महसूल मिळाला होता. गेल्या वर्षीच्या मार्च महिन्यातील करोत्तर नफा १६.६० कोटी झाला होता तो या मार्च महिन्यात वाढत २३.११ कोटींवर पोहोचला आहे. कंपनीमध्ये इबीटीडीए (करपूर्व कमाईत EBITDA) गेल्या मार्च महिन्यातील ३२.१४ कोटींच्या तुलनेत या मार्च तिमाहीत वाढ होत कंपनीला मार्च तिमाहीत ४६.१९ कोटींची कमाई झाली होती. बाजारातील माहितीनुसार, सध्या कंपनीचे बाजार भांडवल ६१३.४७ कोटी रुपये आहे.
कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, या आयपीओतील निधीचा वापर खेळत्या भांडवलासाठी (Working Capital Requirements), पूर्वीची थकीत देणी चुकवण्यासाठी, तसेच दैनंदिन कामकाजासाठी करण्यात येणार आहे.
पहिल्या दिवशी किती मिळाले सबस्क्रिप्शन?
पहिल्या दिवशी कंपनीच्या आयपीओला किरकोळ गुंतवणूकदारांकडून फारसा प्रतिसाद मिळालेला दिसत नाही. कंपनीच्या आयपीओला सत्र अखेरीस पात्र संस्थात्मक गुंतवणूकदारांकडून १.०९ पटीने, विना संस्थात्मक गुंतवणूकदारांकडून ४.०२ पटीने, किरकोळ गुंतवणूकदारांनी ०.२६ पटीने सबस्क्राईब केले आहे.
किती आहे जीएमपी (Grey Market Price GMP Price)
कंपनीला पहिल्या दिवशी बिडिंगमध्ये कुठलाही प्रतिसाद न मिळाल्याने प्राईज बँडहून अधिक एक रूपयाही प्रिमियम दर मिळालेला नाही. त्यामुळे पहिल्या दिवशी आयपीओला थंड प्रतिसाद मिळाला आहे.