मुंबई: अभिनेत्री कियारा अडवाणीच्या घरी पाळणा हलला आहे. कियारा आई बनली आहे. तिने चिमुकल्या परीला जन्म दिला आहे. छोट्या परीचे वेलकम करताना सिद्धार्थही प्रचंड खुश आहे.
कियाराची डिलीव्हरी मुंबईतील रिलायन्स रूग्णालयात झाली. फेब्रुवारीमध्ये कियारा आणि सिद्धार्थने सोशल मीडियावर प्रेग्नंसीची घोषणा केली होती. नवी सुरूवात असे त्यांनी म्हटले होते.
कियारा आणि सिद्धार्थ यांची लव्हस्टोरी २०१८मध्ये आलेल्या लस्ट स्टोरीजच्या रॅप अप पार्टीजपासून सुरू झाली होती. या पार्टीमध्ये दोघांमध्ये जे कनेक्शन बनले होते ते शेरशाह सिनेमात दिसले होते. दोघांनी काही वर्षे एकमेकांना डेट केल्यानंतर फेब्रुवारी २०२३मध्ये लग्न गाठ बांधली होती.
कियारा अडवाणीच्या कामाबद्दल बोलायचे झाल्यास प्रेग्नंसीमुळे तिने अनेक मोठ्या बजेट फिल्म्स नाकारल्या होत्या. या लिस्टमध्ये फरहान अख्तरच्या डॉन सिनेमाचाही समावेश आहे. अशा बातम्या होत्याकी डॉनमध्ये ती रणवीरसोबत स्क्रीन शेअऱ करणार आहे. मात्र तिने आपल्या खाजगी जीवनाला अधिक महत्त्व दिल्याने ती प्रोजेक्टबाहेर झाली. तर दुसरीकडे सिद्धार्थ मल्होत्रा जान्हवी कपूरसोबत परमसुंदरी मध्ये दिसणार आहे.