Eknath Shinde: विशेष मुलांचे प्रश्न सोडवण्यासाठी शासन लागेल ते सहकार्य करणार

  59

'सितारे जमीन पर' सिनेमाच्या स्पेशल शोला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची उपस्थिती


मुंबई: विशेष मुलांचे प्रश्न सोडवण्यासाठी शासन लागेल ते सर्व सहकार्य करायला तयार असून त्यासाठी मुंबई महानगरपालिकेच्या स्तरावर काही निर्णय घ्यावा लागला तर तोही नक्की घेऊ असा विश्वास उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला. शिवसेना प्रवक्त्या शायना एनसी यांच्या पुढाकाराने आयोजित करण्यात आलेल्या आमिर खान निर्मित 'सितारे जमीन पर' या सिनेमाचा विशेष खेळ आज आयनॉक्स सिनेमागृहात आयोजित करण्यात आला होता. यानिमित्ताने आपले मनोगत व्यक्त करताना त्यांनी हे मत व्यक्त केले.



अभिनेता आणि निर्माता आमिर खान दिग्दर्शक पी एस प्रसन्ना यांचे केले कौतुक


यावेळी बोलताना त्यांनी, विशेष मुलांच्या आयुष्यावर आधारित 'सितारे जमीन पर' हा सिनेमा तयार केला असून, त्यातून एक अत्यंत महत्त्वाचा सामाजिक प्रश्न अत्यंत संवेदनशीलतेने हाताळण्यात आला आहे. विशेष मुलांना देखील सर्वसामान्य मुलांसोबत त्याच शाळेत शिकता यावं याबाबत या सिनेमातून भाष्य करण्यात आले आहे. विशेष मुले ही इतर मुलांच्या तुलनेत अजिबात वेगळी नसून त्यांनाही इतर मुलांप्रमाणे सर्वसामान्य शाळेत शिकण्याचा तेवढाच अधिकार असल्याचे यावेळी शिंदे यांनी स्पष्ट केले. तसेच, अभिनेता आणि निर्माता आमिर खानसह दिग्दर्शक पी. एस. प्रसन्ना यांनाही हा विषय हाती घेऊन सिनेमा बनवल्याबद्दल शिंदे यांनी शुभेच्छा दिल्या. तसेच हा अवघड विषय तितक्याच तरलतेने मांडल्याबद्दल त्यांचे आभार मानले.


शिवसेना प्रवक्त्या शायना एनसी यांनी हा शो आयोजित करून शासनाचे लक्ष या प्रश्नाकडे वेधले आहे. देशात दिव्यांग मंत्रालय सुरू करणारे पहिले राज्य हे आपले महाराष्ट्र राज्य आहे. तसेच पालिका स्तरावर याबाबत काही निर्णय घ्यायचा असेल तर शासन त्यासाठी नक्की सहकार्य करेल असेही शिंदे यांनी यावेळी बोलताना स्पष्ट केले. यावेळी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक, अभिनेता आणि निर्माता आमिर खान, शिवसेना प्रवक्त्या शायना एनसी, अनिल त्रिवेदी आणि शिवसेनेचे सर्व प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.

Comments
Add Comment

विवाह नोंदणीसाठी आता रविवारीही महापालिकेची सेवा

जोडप्यांना सुट्टीच्या दिवशीही करता येणार नोंदणी विवाह मुंबई (खास प्रतिनिधी) : मुंबईत दरवर्षी

Mumbai Goa Highwayवरील कशेडी बोगद्याजवळ मोठी दुर्घटना, कोकणात जाणाऱ्या खासगी बसला आग

मुंबई: गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्यांची गर्दी आता सुरू झाली आहे. याच दरम्यान, मुंबई गोवा हायवेवर मोठी दुर्घटना

बेस्ट पाठोपाठ मुंबई महापालिका बँकेच्या निवडणुकीत उबाठाच्या जय सहकारचा धुव्वा

युवा सेनेच्या प्रदीप सावंत यांच्यासह अनेकांचा पराभव मुंबई : बेस्ट पाठोपाठ दि म्युनिसिपल को-ऑपरेटिव्ह बँकेच्या

गणेशोत्सवासाठी रात्रभर रस्त्यावर धावणार बेस्ट बसेस

दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांची गैरसोय टाळण्यासाठी सुविधा मुंबई : मुंबईतील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी

ढोल-ताशांच्या गजरात गणेशमूर्तींचे आगमन

मुंबई : गणेशोत्सवाला अवघे काही दिवस उरले असून मुंबईतील अनेक गणेश मंडळांनी मूर्ती मंडपात नेण्यास सुरुवात केली

महाराष्ट्रात गणेशोत्सवाला राज्य महोत्सवाचा मान; घरबसल्या दर्शनासाठी विशेष पोर्टल सुरू

मुंबई : सार्वजनिक गणेशोत्सव, घरगुती गणेशोत्सव, महाराष्ट्रातील गणेशोत्सवाला आता राज्याने प्रथमच महाराष्ट्र