विवाहबाह्य संबंधांसाठी क्रूर हत्या: स्वतःला वाचवण्यासाठी वेडसर महिलेचा बळी!

  99

मंगळवेढा: पंढरपूर तालुक्यातील मंगळवेढा येथील पाठकळ गावातून माणुसकीला कलंक लावणारी एक अत्यंत धक्कादायक घटना समोर आली आहे. एका विवाहितेने आपले विवाहबाह्य संबंध आणि अनैतिक कृत्य झाकण्यासाठी, प्रियकराच्या मदतीने एका निष्पाप वेडसर महिलेची क्रूरपणे हत्या केली. स्वतःच्या आत्महत्येचा बनाव रचून गुन्ह्यावरून लक्ष विचलित करण्याचा हा प्रयत्न पोलिसांनी उधळून लावला आहे. एखाद्या सस्पेन्स चित्रपटासारख्या या घटनेने संपूर्ण परिसरात थरकाप उडाला असून, पोलिसांनी विवाहिता आणि तिच्या प्रियकराला अटक केली आहे.



प्रेमप्रकरणासाठी रचला कट: तिसऱ्याच महिलेचा मृतदेह जाळला


पाठकळ गावात राहणाऱ्या किरण सावंत (वय २३) या विवाहितेचे काही महिन्यांपासून निशांत सावंत (वय २०) या प्रियकरासोबत प्रेमसंबंध होते. किरणला दोन वर्षांची एक मुलगीही आहे. या दोघांनी कायमचे पळून जाण्याचे ठरवले, पण समाजापासून आणि आपल्या कृत्यापासून वाचण्यासाठी त्यांनी एक भयानक कट रचला. किरणने स्वतःच आत्महत्या केल्याचा बनाव करायचा आणि गवताच्या गंजीत पेटवून मृत्यू झाल्याचे दाखवायचे, असे ठरले. मात्र, यासाठी कोणाचा तरी मृतदेह आवश्यक असल्याने किरण आणि निशांतने एका बेवारस वेडसर महिलेचा शोध सुरू केला.



वेडसर महिलेचा बळी: पंढरपूरमधून आणून गळा दाबला


आठ दिवसांच्या शोधानंतर निशांतला पंढरपूरच्या गोपाळपूरजवळ एक वेडसर महिला आपल्या मुलाच्या शोधात फिरताना दिसली. त्याने तिला तिचा मुलगा शोधून देतो असे आमिष दाखवून पाटकळ येथील सावंत वस्तीवर आणले. त्यानंतर दोन दिवसांपूर्वी दोघांनी तिचा गळा दाबून खून केला. १४ जुलै रोजी पहाटेच्या सुमारास, या वेडसर महिलेचा मृतदेह गवताच्या गंजीत ठेवला आणि गंजीला आग लावली. मृतदेहाजवळ किरणचा मोबाईलही ठेवण्यात आला. रात्री अडीचच्या सुमारास आग लावण्यापूर्वी किरणला घरातून बाहेर बोलावून डाळिंबाच्या बागेत लपायला सांगितले. त्यानंतर निशांत आग लावून निघून गेला.



पोलिसांनी उघड केला थरारक 'सस्पेन्स'


आग भडकलेली पाहून परिसरातील ग्रामस्थ आग विझवण्यासाठी धावले, ज्यात निशांतही सामील होता. गंजीमध्ये एका महिलेचा मृतदेह दिसल्याने, किरणनेच आत्महत्या केली असे कुटुंबाला वाटले. किरणचा पती नागेश पत्नीच्या वियोगाने रडत होता, तर माहेरकडील वडिलांनाही आपल्या मुलीचा मृतदेह ओळखता आला नाही. पण किरणच्या वडिलांना संशय आल्याने त्यांनी पोलिसांना तपासाची विनंती केली. पोलिसांनी जळालेल्या मोबाईलवरून तपास सुरू केला. पतीची चौकशी केल्यानंतर त्यात त्याचा हात नसल्याचे दिसल्याने, मोबाईलच्या सीडीआरवरून पोलीस निशांतपर्यंत पोहोचले. निशांतने पोलिसांना सर्व खरी हकीकत सांगितल्यावर किरण आणि निशांतने केलेला हा थरारक खून उघडकीस आला.


सध्या किरण आणि तिचा प्रियकर निशांत पोलिसांच्या ताब्यात असून, त्यांच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. स्वतःचे अनैतिक संबंध लपवण्यासाठी एका निष्पाप जीवाला संपवणाऱ्या या क्रूर जोडप्याने समाजमन सुन्न केले आहे.

Comments
Add Comment

‘सरकारचा पैसा आहे, आपल्या बापाचं काय जातंय?’

अकोला : काही दिवसांपूर्वी वादग्रस्त वक्तव्य आणि हाती सिगारेट घेतलेला व्हिडीओ व्हायरल झाल्याने चर्चेत असलेल्या

MSBTE च्या विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी! निकाल रोखून ठेवलेल्या, अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांना पुन्हा परीक्षा देण्याची संधी - लोढा

मुंबई: महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळाच्या जुलै २०२५ या सत्रातील एक वर्ष कालावधी अभ्यासक्रमाच्या निकाल

श्री तुळजाभवानी मंदिरातील तलवार चोरीच्या बातम्या खोट्या, अफवांवर विश्वास ठेवू नका!

धाराशिव : श्री तुळजाभवानी मंदिरात सध्या जतन,संवर्धन व विविध विकासकामे मोठ्या प्रमाणावर सुरू असून,या अनुषंगाने

Daund Yawat Tension: ५०० जणांविरुद्ध गुन्हा दाखल, १७ जणांना अटक, कलम १६३ लागू...

पुण्यातील जातीय हिंसाचारावर कारवाई पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यामधील यवत गावात शुक्रवारी एका सोशल मीडिया

महाराष्ट्रात ४.१७ कोटींची बेनामी मालमत्ता उघड!

मुंबई : महाराष्ट्र लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) यावर्षी भ्रष्ट लोकसेवक आणि खाजगी व्यक्तींविरुद्ध चार

पतीची न्यायालयीन कोठडीत रवानगी, रोहिणी खडसेंनी घेतली शरद पवारांची भेट

पुणे : पुण्यातील खराडी परिसरातल्या रेव्ह पार्टीवर पोलिसांनी धाड टाकली. घटनास्थळावरुन अमली पदार्थ जप्त केले. या